Home Mumbai

Region: Mumbai

Post
पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन कृती करण्याची गरज – भैय्याजी जोशी

पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन कृती करण्याची गरज – भैय्याजी जोशी

पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन कृती करण्याची गरज – भैय्याजी जोशी डोंबिवली, ११ एप्रिल, (हिं.स) : पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तीकडे पाहिल्यावर त्या पुरस्कारांचा सन्मान होताना दिसून येतो. या व्यक्तींनी त्यांच्या भौतिक गरजापेक्षा त्यांच्या सन्मानाचा स्तर वाढला पाहिजे यासाठी प्रयत्न केला आहे. या सगळ्या मंडळीचे काम प्रेरणा देणारे आहे. विचारांना दिशा देणारे काम आहे. ते...

Post
'ईझो'चा भारतात विस्तार

‘ईझो’चा भारतात विस्तार

मुंबई, 10 एप्रिल (हिं.स.) : ‘ईझो’ कॉर्पोरेशनने व्हिज्युअल तंत्रज्ञानातील जागतिक आघाडीवर असलेल्या ‘ईझो’ प्रायव्हेट लिमिटेड या नवीन उपकंपनीची भारतातील विस्ताराची नुकतीच घोषणा केली. या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीची स्थापना ‘ईझो’च्या ११ व्या परदेशातील विक्री कार्यालयाला चिन्हांकित करते आणि उच्च श्रेणीतील व्हिज्युअल सोल्यूशन्सचा अग्रगण्य जागतिक प्रदाता म्हणून त्याचे स्थान मजबूत करते. यावेळी कंपनीचे वरिष्ठ संचालक काझुहिदे शिमुरा,...

Post
पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

मुंबई, 10 एप्रिल (हिं.स.) : अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबुजी महाराज संस्थानात सभा मंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देखील त्यांनी जाहीर केली आहे. तसेच शासकीय खर्चाने सर्व जखमींवर व्यवस्थित उपचार करण्यात यावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. या दुर्घटनेत सात...

Post
भारत मोठा होणे ही विश्वाची आवश्यकता - सरसंघचालक

भारत मोठा होणे ही विश्वाची आवश्यकता – सरसंघचालक

मुंबई, 9 एप्रिल (हिं.स.) : तत्व व्यवहारात येथे तेच सत्य असते आणि अशोकरावांनी ते आपल्या व्यवहाराने सत्यात उतरवले. तसेच भारत मोठा होणे ही विश्वाची आवश्यकता आहे. येत्या वीस-तीस वर्षात भारत विश्वगुरु होईलच पण त्यासाठी सक्रिय राहावे लागेल आणि त्यासाठी अशोकजींचे प्रेरणादायी काम ज्याचे अनुकरण होण्यासाठीच या अमृत महोत्सवाचे प्रयोजन आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...

Post
देशाच्या एकूण ऊर्जासाठ्यातील नऊ टक्के वाटा आण्विक स्रोतांच्या माध्यमातून अपेक्षित - जितेंद्र सिंग

देशाच्या एकूण ऊर्जासाठ्यातील नऊ टक्के वाटा आण्विक स्रोतांच्या माध्यमातून अपेक्षित – जितेंद्र सिंग

मुंबई, 9 एप्रिल (हिं.स.) : वर्ष 2047 मध्ये भारत स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करत असताना विजेचा सुमारे नऊ टक्के वाटा भारताच्या आण्विक स्रोतांच्या माध्यमातून अपेक्षित आहे. यामुळे वर्ष 2070 मध्ये शून्य कार्बन उत्सर्जनाचं लक्ष गाठण्याच्या वचनबद्धतेच्या जवळ पोहोचायला सहाय्य होणार असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज...

Post
नौसेनेच्या मुख्य ध्वज अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

नौसेनेच्या मुख्य ध्वज अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, 9 एप्रिल, (हिं.स.) भारतीय नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे नवनियुक्त मुख्य ध्वज अधिकारी, व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. हिंदुस्थान समाचार

Post
Hindenburg foreign company, Supreme Court report more important for us - Sharad Pawar

हिंडनबर्ग परदेशी कंपनी, सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा – शरद पवार

मुंबई, ८ एप्रिल (हिं.स.) : हिंडनबर्ग ही परदेशी कंपनी आहे. या कंपनीचं नाव यापूर्वी कधीही ऐकलेलं नाही. त्यामुळे अशा कंपनीच्या अहवालापेक्षा या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अहवाल आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. ही आमची भूमिका असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. असे असताना या भूमिकेचा विरोधकांच्या एकजुटीवर काहीही...

Post
ठाणे जिल्ह्यातील 6 हजार 435 धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला 10 कोटींचा बोनस

ठाणे जिल्ह्यातील 6 हजार 435 धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला 10 कोटींचा बोनस

ठाणे, 6 एप्रिल (हिं.स.) ई पीक अँपवर पीक पेऱ्याची नोंद केलेल्या जिल्ह्यातील 6 हजार 435 धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 कोटी 29 लाख 6 हजार 195 रुपये एवढा बोनस जमा करण्यात आला असून उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच बोनसची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून राज्य...

Post
यावर्षापासून "मच्छिमार दिन" साजरा केला जाणार - मुनगंटीवार

यावर्षापासून “मच्छिमार दिन” साजरा केला जाणार – मुनगंटीवार

मुंबई, 6 एप्रिल (हिं.स.) मच्छिमार दिन हा दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी असतो. यावर्षापासून हा दिन मोठया उत्साहात आणि आनंदात साजरा केला जाईल आणि मत्स्यव्यवसाय पर्यटनाला चालना दिली जाईल असे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सागरी किनारपट्टीवरील मत्स्य विभागाच्या समस्यांबाबत आज सहयाद्री अतिथिगृह येथे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली...