मुंबई, 10 एप्रिल (हिं.स.) : ‘ईझो’ कॉर्पोरेशनने व्हिज्युअल तंत्रज्ञानातील जागतिक आघाडीवर असलेल्या ‘ईझो’ प्रायव्हेट लिमिटेड या नवीन उपकंपनीची भारतातील विस्ताराची नुकतीच घोषणा केली. या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीची स्थापना ‘ईझो’च्या ११ व्या परदेशातील विक्री कार्यालयाला चिन्हांकित करते आणि उच्च श्रेणीतील व्हिज्युअल सोल्यूशन्सचा अग्रगण्य जागतिक प्रदाता म्हणून त्याचे स्थान मजबूत करते. यावेळी कंपनीचे वरिष्ठ संचालक काझुहिदे शिमुरा, मसातो नाकाशिमा यांसह भारतातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
‘ईझो’ प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी व्यवस्थापकीय संचालक रोहन चहांदे म्हणाले की , “भारतातील आर्थिक वाढ आणि विकास मध्य ते दीर्घ कालावधीत सुरू राहण्याची अपेक्षा असताना, भारतात संपूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन करण्याचा ‘ईझो’चा निर्णय कंपनीला सक्रियपणे गुंतवणूक करण्यास सक्षम करणार आहे. आम्हाला विश्वास आहे की, ईझो भारत आणि शेजारील देशांमधील भागीदारांसह आपला व्यवसाय पाया मजबूत करून आणि नवीन व्यवसाय संधी मिळवून दीर्घकालीन, शाश्वत वाढ साध्य करू शकणार आहे.”
ईझो मूळची जपानमधील कंपनी असून तिची स्थापना १९६८ मध्ये झाली. कंपनीकडून विशेषत: आरोग्य सेवा, हवाई वाहतूक नियंत्रण, सागरी, सुरक्षा, देखरेख ठेवणे आदी क्षेत्रांतील ग्राहकांसाठी प्राधान्याने सेवा दिली जाते.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply