Home Indian National Congress

Political parties: Indian National Congress

Post
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुध्द सुशीलकुमार शिंदे गट आक्रमक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुध्द सुशीलकुमार शिंदे गट आक्रमक

सोलापूर, 4 जून, (हिं.स) सोलापुरात ज्यांना कोणी विचारत नाही त्यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या केबीनमध्ये घेऊन बसतात. यापुढील काळात असे होऊ नये, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांसमाेर केली. सोलापूरचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार शिंदे यांच्याकडे असावा, असेही नरोटे म्हणाले. काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली....

Post
लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदार संघ कॉंग्रेसलाच द्या - यशोमती ठाकूर

लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदार संघ कॉंग्रेसलाच द्या – यशोमती ठाकूर

अमरावती, 3 जून (हिं.स.) अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज मुंबई येथे प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवनात काँग्रेस अध्यक्ष प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार, सोशल मिडिया प्रमुख विशाल मुत्तेमवार, देवानंद पवार, पूनम पटेल, ओबीसी सेलचे प्रमुख अरविंद माळी, माजी मंत्री नसीम...

Post
सिंधी समाजाची जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात तक्रार

सिंधी समाजाची जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात तक्रार

नाशिक, ०३ जून (हिं.स.) : उल्हासनगर येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य केले होते. यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यासाठी सिंधी समाजाच्या वतीने नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास वांजळे यांना निवेदन देण्यात आले. गेल्या २७ मे रोजी उल्हासनगर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी...

Post
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तयार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह - नाना पटोले

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तयार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह – नाना पटोले

मुंबई, 3 जून (हिं.स.) केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. ९ वर्षांपासून लूट सुरु असून जनतेच्या खिशातील पैसा उद्योगपती मित्रांच्या घशात घातला जात आहे. जनता या लुटीला कंटाळली असून लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. देशात परिवर्तनाचे वारे वाहत असून काँग्रेस हाच पर्याय जनतेला दिसत आहे. काँग्रेसच्या दोन दिवसीय...

Post
लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीनंतर राज्याचा दौरा करणार - नाना पटोले

लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीनंतर राज्याचा दौरा करणार – नाना पटोले

मुंबई, 2 जून (हिं.स.) राज्यात सध्या महाविकास आघाडीला अनुकुल असे वातावरण आहे. काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांची मते अजमावून घेतली जात आहेत. दोन दिवसाच्या या बैठकीनंतर लवकरच राज्यातील सर्व जिल्ह्याचे दौरे केले जातील, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. शुक्रवारी सिंधुदुर्ग...

Post
शेतकऱ्यांना मदतच करायची असेल तर कृषी साहित्यातून होणारी जीएसटी लूट थांबवा - नाना पटोले

शेतकऱ्यांना मदतच करायची असेल तर कृषी साहित्यातून होणारी जीएसटी लूट थांबवा – नाना पटोले

मुंबई, 31 मे (हिं.स.) केंद्रातील भाजपा सरकार असो वा राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार दोन्हीही शेतकरी विरोधी आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीची घोषणा विधानसभेत करुनही अजून शेतकऱ्यांना ती मिळालेली नाही. राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर शेतकरी महासन्मान निधीच्या नावाखाली तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा डाव आहे परंतु शिंदे फडणवीस सरकारच्या या षडयंत्राला शेतकरी बळी पडणार नाहीत....

Post
कॉंग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

कॉंग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

चंद्रपूर, ३० मे (हिं.स.) : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ते ४८ वर्षांचे होते. धानोरकर यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले असा परिवार आहे....

Post
केंद्रातील भाजपा सरकार ९ वर्षापासून सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी - पी. चिदंम्बरम

केंद्रातील भाजपा सरकार ९ वर्षापासून सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी – पी. चिदंम्बरम

मुंबई, 29 मे (हिं.स.) : केंद्रातील भाजपा सरकारने ९ वर्ष पूर्ण केली असून या ९ वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत परंतु गेल्या नऊ वर्षांत एनडीए सरकारने त्यासाठी काहीही केलेले नाही आणि केंद्र सरकार आपल्या चुका सुधारून जनतेसाठी सुशासन करण्याचा प्रयत्नही...

Post
महाराष्ट्र सदनातून सावित्रीबाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक - नाना पटोले

महाराष्ट्र सदनातून सावित्रीबाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक – नाना पटोले

मुंबई, 29 मे (हिं.स.) : महाराष्ट्रात सदनात सावरकर जयंती साजरी करताना राजमाता अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला करण्यात आले. समाजाच्या प्रेरणास्रोत असलेल्या या दोन महान व्यक्तींचा अपमान होणे ही संताप आणणारी घटना असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले...

Post
खा. बाळू धानोरकर यांची प्रकृती स्थिर

खा. बाळू धानोरकर यांची प्रकृती स्थिर

चंद्रपूर 29 मे (हिं.स.):खासदार बाळू धानोरकर यांच्यावर दिल्ली येथे उपचार केले जात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असे धानोरकर यांचे जनसंपर्क कार्यालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील ”वेदांता हॉस्पिटल” येथे उपचार सुरू आहेत. ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत....