Home नरेंद्र मोदी

Political Leader: नरेंद्र मोदी

Post

मॉरिशसमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

नवी दिल्ली, 1 मे (हिं.स.) : मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात असलेली अभिमानाची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी आपल्या ट्विटसंदेशात म्हटले आहे, “भारतीयांसाठी अभिमानाची बाब! छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जागतिक पातळीवर पोहचत आहेत. पंतप्रधान @KumarJugnauth यांच्या स्वागतार्ह उपस्थितीने...

Post

भारताची वाणिज्य, लॉजिस्टिक्स क्षेत्रातील मोठे केंद्र म्हणून विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल : पंतप्रधान

नवी दिल्ली, 1 मे (हिं.स.) : केंद्रीय बंदरे, नौवहन तसेच जलमार्ग मंत्रालयाने ट्विट संदेशात म्हटले आहे की, जागतिक बँकेच्या एलपीआय 2023 या अहवालातील माहितीनुसार, इतर अनेक देशांपेक्षा भारतातील बंदरांनी कमी वेळेत अधिक चांगल्या पद्धतीने कार्य पूर्ण केले असून त्यांची कार्यक्षमता तसेच उत्पादकता यांना अधिक चालना मिळाली आहे. या ट्विट संदेशावर प्रतिक्रिया नोंदवत पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Post
देशात 3.25 लाख 'मोदी मित्र' करणार प्रचार... भाजप मुस्लीम मोर्चाचे 10 मे पासून अभियान

देशात 3.25 लाख ‘मोदी मित्र’ करणार प्रचार… भाजप मुस्लीम मोर्चाचे 10 मे पासून अभियान

नवी दिल्ली, 01 मे (हिं.स.) : भारतीय जनता पक्षाच्या मुस्लीम मोर्चातर्फे अशरफ ते पसमांदापर्यंत (उच्चभ्रू ते दुर्बल) पोहचण्यासाठी आगामी 10 मे पासून देशव्यापी अभियान सुरू होतेय. या अभियानंतर्गत 3 लाख 25 हजार मुस्लीम ‘मोदी मित्र’ 65 मुस्लीम बहुल मतदारसंघात पक्षाचा प्रचार करणार आहेत. भाजप मुस्ली मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी ही माहिती दिली. केंद्र...

Post
सुदानमध्ये 3,000 हून अधिक भारतीयांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष, पंतप्रधानांनी घेतला आढावा

सुदानमध्ये 3,000 हून अधिक भारतीयांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष, पंतप्रधानांनी घेतला आढावा

नवी दिल्ली, 22 एप्रिल (हिं.स.) : सुदानमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्चस्तरीय बैठक झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, सुदानमधील भारताचे राजदूत आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीदरम्यान, पंतप्रधानांनी सुदानमधील सद्य घडामोडींचा आढावा घेतला आणि तिथे असलेल्या 3,000 हून अधिक भारतीय नागरिकांच्या...

Post
राष्ट्रीय क्वांटम अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

राष्ट्रीय क्वांटम अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 20 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2023-24 ते 2030-31 या कालावधीसाठी एकूण रु.6003.65 कोटी खर्चाच्या राष्ट्रीय क्वांटम अभियानाला (एनक्यूएम ) मंजुरी दिली. क्वांटम तंत्रज्ञानाशी संबंधित वैज्ञानिक आणि औद्योगिक क्षेत्रात संशोधन आणि विकासाचे बीजारोपण करणे ते विकसित करणे आणि प्रगती करणे आणि त्याच्याशी संबंधित एक सचेत आणि सर्जनशील व्यवस्था...

Post
भारताच्या अध्यक्षपदाच्या कालावधीतील 100व्या G20 बैठकीचे पंतप्रधानांकडून कौतुक

भारताच्या अध्यक्षपदाच्या कालावधीतील 100व्या G20 बैठकीचे पंतप्रधानांकडून कौतुक

नवी दिल्ली, 18 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या G20 अध्यक्षीय कालावधी दरम्यान झालेल्या 100 व्या G20 बैठकीचे कौतुक केले आहे. G20 इंडियाच्या ट्विट मालिकेला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, “‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या तत्त्वाने मार्गदर्शित आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या आमच्या मूल्याच्या अनुषंगाने, भारताच्या G20 अध्यक्षीय कारकिर्दीने जगाचे कल्याण वृद्धींगत...

Post
मन की बात @100 प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी व्हा - पंतप्रधान

मन की बात @100 प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी व्हा – पंतप्रधान

नवी दिल्ली, 12 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मन की बात @100 प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी ट्विट केले, “#MannKiBaat प्रश्नमंजुषेचे शेवटचे काही दिवस राहिले आहेत…तुम्ही अजून सहभागी झाला नसाल तर यात भाग घ्या आणि मागील 99 भागांचा शानदार प्रवास पुन्हा जगा , ज्यामध्ये प्रेरणादायी सामूहिक प्रयत्न अधोरेखित करण्यात आले...

Post
पंतप्रधान मोदी यांनी दिला वन्यजीवांविषयीच्या जनतेच्या उत्साहाला समाजमाध्यमांतून प्रतिसाद

पंतप्रधान मोदी यांनी दिला वन्यजीवांविषयीच्या जनतेच्या उत्साहाला समाजमाध्यमांतून प्रतिसाद

नवी दिल्ली, 10 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवांविषयीच्या जनतेच्या उत्साहाला समाजमाध्यमांतून प्रतिसाद दिला. बांदीपूर व्याघ्रप्रकल्पाला पंतप्रधानांनी काल दिलेल्या भेटीदरम्यान तिथल्या हत्तीने दिलेल्या आशीर्वादाबाबत परशुराम एम जी या नागरिकाने केलेल्या ट्विट ला पंतप्रधानांनी उत्तर दिले, “ हो, हा प्रसंग माझ्यासाठी फारच वैशिष्ट्यपूर्ण होता.” प्रियांका गोयल यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय वन्यजीव उद्यानाला दिलेल्या भेटीबद्दल...

Post
तामिळनाडूतील सालेम रेल्वे जंक्शनवर वंदे भारतच्या नेत्रदीपक स्वागत, पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त

तामिळनाडूतील सालेम रेल्वे जंक्शनवर वंदे भारतच्या नेत्रदीपक स्वागत, पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त

नवी दिल्ली, 10 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील सालेम रेल्वे जंक्शनवर वंदे भारतचे लोकांकडून शानदार स्वागत झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सालेम रेल्वे जंक्शन येथे वंदे भारत एक्सप्रेसचे मोठ्या उत्साहात स्वागत करत लोकांनी या गाडीवर पुष्पवृष्टी केली. तामिळनाडूतील पीआयबीच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले. “सालेममध्ये नेत्रदीपक स्वागत! वंदे भारत जिथे पोहोचते...

Post
भ्रष्टाचार हा न्याय आणि लोकशाहीच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा - पंतप्रधान

भ्रष्टाचार हा न्याय आणि लोकशाहीच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा – पंतप्रधान

नवी दिल्ली, 3 एप्रिल (हिं.स.) : बहुआयामी आणि बहु-शाखीय तपास संस्था म्हणून केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) आपली ओळख निर्माण केली आणि त्याच्या कक्षा आणखी विस्तारत आहेत. देशाला भ्रष्टाचारमुक्त करणे ही सीबीआयची प्रमुख जबाबदारी आहे. भ्रष्टाचार हा काही सामान्य गुन्हा नाही, तो गरीबांचे हक्क हिरावून घेतो, त्यातून इतर अनेक गुन्हे जन्माला येतात, भ्रष्टाचार हा न्याय आणि...