नवी दिल्ली, 10 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवांविषयीच्या जनतेच्या उत्साहाला समाजमाध्यमांतून प्रतिसाद दिला.
बांदीपूर व्याघ्रप्रकल्पाला पंतप्रधानांनी काल दिलेल्या भेटीदरम्यान तिथल्या हत्तीने दिलेल्या आशीर्वादाबाबत परशुराम एम जी या नागरिकाने केलेल्या ट्विट ला पंतप्रधानांनी उत्तर दिले, “ हो, हा प्रसंग माझ्यासाठी फारच वैशिष्ट्यपूर्ण होता.”
प्रियांका गोयल यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय वन्यजीव उद्यानाला दिलेल्या भेटीबद्दल केलेल्या ट्विटला पंतप्रधानांनी प्रतिसाद दिला, “ उत्तम. भारतातील वनस्पती व प्राणिजगतातील विविधता आश्चर्यकारक आहे आणि मला आशा आहे की जनतेला त्याविषयी अधिक जाणून घेण्याच्या संधी मिळतील.”
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply