Home राजकारण

Category: राजकारण

Post
संत चोखोबाराय मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार - मुख्यमंत्री

संत चोखोबाराय मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री

बुलडाणा, 13 मे (हिं.स.) : महाराष्ट्र संतांची भूमी आहे. समाजप्रबोधन तसेच लोकांचे जीवन प्रकाशमान करण्याचे काम संत विचारांनी केले आहे. याच विचारांचा वसा घेऊन शासन वाटचाल करीत आहे. इसरूळ येथील श्री संत चोखोबारायांचे मंदिर आणि ही भूमी तीर्थस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. संत...

Post
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

सातारा, 13 मे (हिं.स.) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभुराज देसाई आदी उपस्थित होते. पालकमंत्री देसाई यांनी यावेळी डॉक्टर आणि रुग्णांशी...

Post
राहुल गांधी यांनी कर्नाटकात मोहब्बत की दुकान सुरू करून दाखवली - बाळासाहेब थोरात

राहुल गांधी यांनी कर्नाटकात मोहब्बत की दुकान सुरू करून दाखवली – बाळासाहेब थोरात

मुंबई, 13 मे (हिं.स.) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे देशाचे राजकारण बदलणार आहे. जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळवून राजकीय यश मिळवता येणार नाही हे अधोरेखित झाले आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा देशाच्या राजकारणावर अत्यंत सकारात्मक परिणाम झाला असून धार्मिक द्वेष निर्माण करून निवडणुका जिंकण्याचा भाजपचा डाव कार्नाटकात यशस्वी झाली नाही. यात्रा मार्गावरील...

Post
पवारांनी मोदींवर बोलावले याला किती महत्त्व द्यावे...?

पवारांनी मोदींवर बोलावले याला किती महत्त्व द्यावे…?

मुंबई, 13 मे (हिं.स.) : कर्नाटकच्या निकालावर प्रतिक्रीया देताना पवारांनी भाजपवर तोंडसुख घेतले त्याला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीला कर्नाटक निवडणुकीत 0.5 टक्क्यांहून कमी मते मिळाली आहेत. तेव्हा पवारांच्या मोदींवर बोलण्याला किती महत्व द्यावे ? असा खोचक प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केलाय. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सुरू झालेला कलगीतुरा थांबण्याचे नाव घेत नाही....

Post
प्रकाश आंबेडकरांकडून सरपंचाला दुचाकी गिफ्ट

प्रकाश आंबेडकरांकडून सरपंचाला दुचाकी गिफ्ट

अकोला, 13 मे (हिं.स.) : घरची हलाखीची परिस्थिती असताना वंचित बहुजन आघाडीकडून सरपंच म्हणून निवडून आलेले दिगंबर पिंप्राळे जेवढा आनंद त्यांना सरपंच झाल्यावर झाला त्यापेक्षाही जास्त आनंद त्यांना आज झाला त्याच झालं असं वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी या सरपंचाला थेट दुचाकीच भेट म्हणून दिली. दिगंबर पिंप्राळे हे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील अकोलखेड...

Post
दोन लाख तरूणांना मिळणार शासकीय नोकरी -पालकमंत्री

दोन लाख तरूणांना मिळणार शासकीय नोकरी -पालकमंत्री

नंदुरबार , 13 मे (हिं.स.) देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात शासन ७५ हजार तरूणांना शासकीय नोकरीत संधी उपलब्ध करून देणार होते, आता ही संधी सुमारे दोन लाख तरूणांना उपलब्ध करून देणार असून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन आता आपल्या दारी आले आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे....

Post
कर्नाटक विजयाचा जळगावात जल्लोष

कर्नाटक विजयाचा जळगावात जल्लोष

जळगाव , 13 मे (हिं.स.) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मोठा व व एकतर्फी विजय याचा पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवक काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने मिठाईवाटून फटाके फोडून मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी काँग्रेसचे माजी...

Post
जळगाव एसटीच्या ताफ्यात 10 नवीन बस दाखल पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव एसटीच्या ताफ्यात 10 नवीन बस दाखल पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव, 13 मे (हिं.स.) : गाव, वाड्या आणि वस्त्यांना शहराशी जोडणारी, सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेली जिल्ह्यातील बससेवा अधिक सक्षम करण्यावर भर आहे. महिलांना बस प्रवासात 50% सवलतीचा निर्णय हा यशस्वी झाला आहे. उन्हाळी सुट्टी व लग्नसराई मध्ये जळगाव विभाग 10 दिवसात तब्बल 10 कोटी उत्पन्न मिळवून राज्यात प्रथम आला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

Post
कर्नाटक विजयासाठी पंतप्रधानांकडून काँग्रेसचे अभिनंदन

कर्नाटक विजयासाठी पंतप्रधानांकडून काँग्रेसचे अभिनंदन

नवी दिल्ली, 13 मे (हिं.स.) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 136 जिंकत सर्वत मोठा पक्ष बनला आहे. या विजयानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल अभिनंदन आणि लोकांच्या अपेक्षा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा ! असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेय. कर्नाटकात विधानसभेच्या 224 जागा असून बहुमतासाठी...

Post
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ‘विकासाची दिशा’ पॉकेट बुकचे प्रकाशन

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ‘विकासाची दिशा’ पॉकेट बुकचे प्रकाशन

वाशिम, 12 मे (हिं.स.) : पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या अल्पसंख्यांक योजनांची माहिती असलेल्या ‘विकासाची दिशा’ या पॉकेटबुक माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, अपर पोलीस अधिक्षक...