Home राजकारण

Category: राजकारण

Post

अ. भा. साहित्य परिषदेच्या कोकण प्रांत कार्यकारिणीवर कोनकर, देवगोजी

रत्नागिरी, 15 मे, (हिं. स.) : अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या कोकण प्रांत कार्यकारिणीवर रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार बाळकृष्ण ऊर्फ प्रमोद कोनकर आणि लांजा येथील साहित्यिक सौ. विजयालक्ष्मी देवगोजी यांची निवड झाली आहे. अ. भा. साहित्य परिषदेच्या कोकण प्रांत कार्यकारिणीची बैठक मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारकात डॉ. नरेंद्र पाठक, प्रवीण देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी...

Post
राजपूत समाजापुढील 'भामटा' हा शब्द काढणार – मुख्यमंत्री

राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार – मुख्यमंत्री

औरंगाबाद, 15 मे (हिं.स.) : सर्वसामान्य, शेतकरी-कष्टकऱ्यांचे हे सरकार असून त्यांच्या कल्याणाचे विविध निर्णय घेऊन जनतेला न्याय देण्याचे काम हे सरकार करीत आहे. राजपूत समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, राजपूत समाजाच्या पुढील ‘भामटा’ हा शब्द काढण्यात येईल आणि केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान, महाराणा प्रतापसिंह...

Post
संगमनेर बाजार समिती सभापती पदी शंकरराव खेमनर पाटील यांची निवड

संगमनेर बाजार समिती सभापती पदी शंकरराव खेमनर पाटील यांची निवड

अहमदनगर, 14 मे (हिं.स.):- विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अग्रगण्य असलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शंकरराव पाटील खेमनर यांची फेरनिवड झाली असून उप सभापती पदी आश्वीचे गीताराम दशरथ गायकवाड यांची एकमताने निवड झाली आहे. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शंकरराव...

Post
मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव - मुख्यमंत्री

मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव – मुख्यमंत्री

मुंबई, १४ मे (हिं.स.) : मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे) ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ही घोषणा केली. या महोत्सवाला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आरोग्य मंत्री प्रा. डॅा.तानाजी...

Post
मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासा साठी राज्य सरकार कटिबद्ध

मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासा साठी राज्य सरकार कटिबद्ध

मुंबई, 14 मे (हिं.स.) – मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या परिषदेत दिली. तसेच हे सर्वसामान्य माणसाचे सरकार आहे. सामान्य मुंबईकरांना हक्काचे घर मिळवून देणे हेच आमचे लक्ष असून ते केल्याशिवाय शांत बसणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. भाजप विधान परिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष...

Post
मविआची 'वज्रमूठ' सभा पुन्हा सुरू करणार; नेत्यांच्या बैठकीत निर्णय - जयंत पाटील

मविआची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा सुरू करणार; नेत्यांच्या बैठकीत निर्णय – जयंत पाटील

मुंबई, 14 मे (हिं.स.) : उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगिती करण्यात आलेली महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची चर्चा आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. भविष्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्ष बसून जागा वाटपाबाबत...

Post
वैद्यकीय सुविधा अधिक बळकट करणार - डॉ. तानाजी सावंत

वैद्यकीय सुविधा अधिक बळकट करणार – डॉ. तानाजी सावंत

छत्रपती संभाजीनगर, 14 मे (हिं.स.) राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागात आवश्यक असलेल्या वैद्यकीय पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासोबतच आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला देशात अव्वल क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी आपण सर्व मिळून काम करूया, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनगर तसेच लातूर विभागातील...

Post
कर्नाटक निवडणुकीत आ. प्रणिती शिंदेंचा प्रचार : 8 पैकी 6 जागी काँग्रेस

कर्नाटक निवडणुकीत आ. प्रणिती शिंदेंचा प्रचार : 8 पैकी 6 जागी काँग्रेस

सोलापूर, 14 मे (हिं.स.) कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व भाजपने प्रतिष्ठा पणाला लावत प्रचाराची यंत्रणा लावली. त्यात सोलापुरातील काँग्रेस आणि भाजपचे आमदार कर्नाटकात प्रचारासाठी गेले. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे दावणगिरी येथील जबाबदारी होती. तेथे ८ पैकी ६ जागांवर काँग्रेसला यश मिळाले. यामुळे आ. शिंदे यांचा आगामी प्रगतीचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे. दावणगिरी येथे...

Post
केंद्रीय राज्यमंत्री डॉ एल. मुरुगन कान्स चित्रपट महोत्सवात शिष्टमंडळाचे करणार नेतृत्व

केंद्रीय राज्यमंत्री डॉ एल. मुरुगन कान्स चित्रपट महोत्सवात शिष्टमंडळाचे करणार नेतृत्व

नवी दिल्ली, 14 मे (हिं.स.) : केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यावर्षीच्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. कान चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवशी रेड कार्पेटवर पारंपारिक तमिळ पोशाख ‘वेष्टी’ मध्ये चालणाऱ्या, आपली समृद्ध भारतीय संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या डॉ. मुरुगन यांच्यासोबत द एलिफंट व्हिस्परर्स या प्रसिद्ध चित्रपटाच्या निर्मात्या गुनीत...

Post
कोळसा मंत्रालयाच्या वतीने मुंबईत जस्ट ट्रान्झिशन रोडमॅपवर आधारित चर्चात्मक परिसंवादाचे आयोजन

कोळसा मंत्रालयाच्या वतीने मुंबईत जस्ट ट्रान्झिशन रोडमॅपवर आधारित चर्चात्मक परिसंवादाचे आयोजन

मुंबई, 14 मे (हिं.स.) : कोळसा मंत्रालय 15 मे रोजी मुंबईत भारताच्या जी-ट्वेंटी (G20) अध्यक्षपदा अंतर्गत ‘कोल इंडिया लिमिटेड’ (CIL) च्या सहकार्याने ‘जस्ट ट्रान्झिशन रोडमॅप’ या विषयावर आधारित चर्चासत्र आयोजित करणार आहे. हे तीन दिवसीय चर्चासत्र जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित केले जाईल. भारताच्या जी-ट्वेंटी (G20) अध्यक्षपदा अंतर्गत होणाऱ्या तिसर्या एनर्जी ट्रान्झिशन (ऊर्जा संक्रमण)...