सोलापूर, 14 मे (हिं.स.) कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व भाजपने प्रतिष्ठा पणाला लावत प्रचाराची यंत्रणा लावली. त्यात सोलापुरातील काँग्रेस आणि भाजपचे आमदार कर्नाटकात प्रचारासाठी गेले. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे दावणगिरी येथील जबाबदारी होती. तेथे ८ पैकी ६ जागांवर काँग्रेसला यश मिळाले. यामुळे आ. शिंदे यांचा आगामी प्रगतीचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.
दावणगिरी येथे आ. शिंदे यांना मानणारा वर्ग नसला तरी तेथील कार्यकर्त्यांना दिलेले पाठबळ कामी आले. बेळगाव येथील शिंदे यांचा प्रचार चर्चेत राहिला. तेथेही यश मिळाले आहे. यापूर्वी शिंदे यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply