Home राजकारण

Category: राजकारण

Post
एनआयएचे पथक नागपुरात दाखल... नितीन गडकरी धमकी प्रकरणाचा तपास

एनआयएचे पथक नागपुरात दाखल… नितीन गडकरी धमकी प्रकरणाचा तपास

नागपूर, 25 मे (हिं.स.) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना फोनवरून खंडणी आणि ठार करण्याची धमकी दिल्या प्रकरणी चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक आज, गुरुवारी नागपुरात दाखल झाले. बेळगाव तुरुंगात बंद असलेला दहशतवादी संघटनेचा सदस्य अकबर पाशा याच्या सांगण्यावरूनच जयेश कांथा उर्फ शाकीरने गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली होती....

Post
दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन व्हेंटिलेटरवर

दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन व्हेंटिलेटरवर

नवी दिल्ली, 25 मे (हिं.स.) : भ्रष्टाचाराच्या आरोपात तिहार जेलमध्ये असलेले दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालवली आहे. जैन यांना दिनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. यापूर्वी देखील कारागृहातील बाथरूमध्ये घसरून पडल्यामुळे जैन यांच्या मणक्याला दुखापत झाली होती. मनी लाँड्रिंग सत्येंद्र जैन यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे....

Post
संसदेच्या नूतनवास्तू उद्घाटनावर बहिष्कार ही विरोधी पक्षांची कृती वैफल्यग्रस्ततेचे निदर्शक - राहुल नार्वेकर

संसदेच्या नूतनवास्तू उद्घाटनावर बहिष्कार ही विरोधी पक्षांची कृती वैफल्यग्रस्ततेचे निदर्शक – राहुल नार्वेकर

मुंबई, 25 मे (हिं.स.) : लोकशाहीचे पवित्र मंदिर म्हणून गौरविण्यात येणाऱ्या भारतीय संसदेच्या नूतनवास्तूचे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनी म्हणजेच २८ मे, २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते उदघाटन होत आहे, ही अत्यंत अभिमानाची घटना आहे. मात्र या ऐतिहासिक समारंभावर बहिष्कार घालण्याची काही विरोधी पक्षांची कृती ही अत्यंत गैर आणि त्यांच्यातील वैफल्यग्रस्ततेची निदर्शक आहे, असे...

Post
सावरकर जयंतीला पर्यटन विभागाच्या पुढाकारातून भव्य पदयात्रा

सावरकर जयंतीला पर्यटन विभागाच्या पुढाकारातून भव्य पदयात्रा

मुंबई, 25 मे (हिं.स.) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक तेजस्वी पर्व, महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनकार्य अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या पुढाकारातून राज्यभरात विविध ठिकाणी ‘वीरभूमी परिक्रमा’अंतर्गत ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’चे आयोजन दि. २१ ते २८ मे दरम्यान करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी म्हणजेच स्वा. सावरकरांच्या १४० व्या जयंतीदिनी...

Post
नवी मुंबईच्या स्वच्छता कामांचा मुख्यमंत्र्यांकडून राज्यस्तरीय कार्यशाळेत विशेष उल्लेख

नवी मुंबईच्या स्वच्छता कामांचा मुख्यमंत्र्यांकडून राज्यस्तरीय कार्यशाळेत विशेष उल्लेख

नवी मुंबई, 25 मे (हिं.स.) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने आयोजित नमस्ते (National Action for Macanized Sanitation EcoSystem) या कार्यशाळेप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिका सफाई मित्रांच्या कामातील सुरक्षेविषयी घेत असलेल्या काळजीबद्दल प्रशंसा केली. भारताच्या स्वच्छता परिसंस्थेत यांत्रिकी पध्दतीने स्वच्छता तंत्रज्ञानाला...

Post
ग्राहकांसाठी गुणवत्तेपेक्षा अन्य कोणतीही गोष्ट महत्त्वाची असू शकत नाही - पियुष गोयल

ग्राहकांसाठी गुणवत्तेपेक्षा अन्य कोणतीही गोष्ट महत्त्वाची असू शकत नाही – पियुष गोयल

नवी दिल्ली, २५ मे (हिं.स.) : गुणवत्ता हीच आजच्या ग्राहकांची मागणी असून, ग्राहकांसाठी गुणवत्तेपेक्षा अन्य कोणतीही गोष्ट महत्त्वाची असू शकत नाही, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. ते बुधवारी नवी दिल्ली येथे 44 व्या आयएसओ कोपोल्को (ISO COPOLCO), अर्थात आंतरराष्ट्रीय मानक संघटनेच्या ग्राहक धोरण समितीच्या वार्षिक बैठकीच्या उद्घाटनपर सत्रात बोलत होते....

Post
नव्या संसदेत करणार सेंगोलची स्थापना –अमित शहा

नव्या संसदेत करणार सेंगोलची स्थापना –अमित शहा

नवी दिल्ली, 24 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेद्र मोदी आगामी 28 मे रोजी नव्या संसद भावनाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी संसदेत सेंगोला (राजदंड) स्थापण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. याबाबत अमित शाह म्हणाले की, संसद भवनाच्या उद्घाटनासोबतच एक ऐतिहासिक परंपरा देखील पुनरुज्जीवित केली जाईल. या परंपरेला सेंगोल म्हणतात, ही युगानुयुगे जोडलेली...

Post
गणेशोत्सव काळात अतिरिक्त गाड्या सोडण्याची अजित पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

गणेशोत्सव काळात अतिरिक्त गाड्या सोडण्याची अजित पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

मुंबई, 24 मे (हिं.स.) : गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण अवघ्या एका मिनीटात फुल्ल होत आहे. रेल्वे अधिकारी आणि तिकिटांच्या दलालांच्यातल्या अभद्र युतीमुळेच हे होत असावे. सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करुन चढ्या दराने त्याची विक्री करण्याचे रॅकेट सुरु आहे. यामध्ये कोणा-कोणाचे हितसंबध गुंतले आहेत, या...

Post
शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटीबद्ध - प्रविण दरेकर

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटीबद्ध – प्रविण दरेकर

सातारा, 24 मे (हिं.स.) – शेतकरी यात्रेला वारी एवढ्यासाठी म्हटले आहे की पांडुरंगाकडे जाताना वारी केली की विश्वास असतो, पांडुरंग पावेल तसाच विश्वास आताचे जे शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे. त्या सरकारवर सर्वसामान्य लोकांचा विश्वास आहे. सदाभाऊ खोत हे घटक पक्ष जरी असले तरी पूर्णपणे सरकार त्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटीबद्ध असून ज्या मागण्या...

Post
रब्बी हंगामातील धान खरेदीचा मार्ग मोकळा, वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

रब्बी हंगामातील धान खरेदीचा मार्ग मोकळा, वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

चंद्रपूर 24 मे (हिं.स.)- माजीमंत्री आ. वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केली असून रब्बी हंगामातील धान खरेदीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळावा याकरिता आधारभूत धान खरेदी व त्यावरील बोनस असा दुहेरी लाभ देण्यात येत होता. मात्र त्यानंतरच्या काळात आधारभूत धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्था...