नवी दिल्ली, 24 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेद्र मोदी आगामी 28 मे रोजी नव्या संसद भावनाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी संसदेत सेंगोला (राजदंड) स्थापण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.
याबाबत अमित शाह म्हणाले की, संसद भवनाच्या उद्घाटनासोबतच एक ऐतिहासिक परंपरा देखील पुनरुज्जीवित केली जाईल. या परंपरेला सेंगोल म्हणतात, ही युगानुयुगे जोडलेली परंपरा आहे. सेंगोल याचा अर्थ संपत्तीने संपन्न असा होतो. नवीन संसद भवनात ते स्पीकरच्या आसनाजवळ बसवले जाईल. संसद भवनात बसवण्यात येणार्या सेंगोलच्या शिखरावर नंदी विराजमान आहे सेंगोलचा इतिहास खूप जुना आहे. स्वतंत्र भारतात याला खूप महत्त्व आहे. इंग्रजांकडून 14 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा भारताकडे सत्ता हस्तांतरित झाली तेव्हा ती या सेंगोलने केली होती. एक प्रकारे सेंगोल हे भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. त्यावेळी सेंगोल हे सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक बनले.
जेव्हा लॉर्ड माउंटबॅटन यांनी 1947 मध्ये पंडित नेहरूंना विचारले की सत्ता हस्तांतरित कशी करावी. यासाठी पंडित नेहरूंनी सी राज गोपालाचारी यांचा सल्ला घेतला. सेंगोल प्रक्रियेबद्दल त्यांनी माहिती दिली. यानंतर ते तामिळनाडूहून आणण्यात आले आणि मध्यरात्री पंडित नेहरूंनी ते स्वीकारले. सेंगोल हा शब्द “संकु” या संस्कृत शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ “शंख” आहे. हिंदू धर्मातील शंख ही एक पवित्र वस्तू असून सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून ती वापरली जात असे. सेंगोल (राजदंड) हे भारतीय सम्राटाच्या सामर्थ्याचे आणि अधिकाराचे प्रतीक होते.हे सोन्याचे किंवा चांदीचे असायचे आणि बहुधा मौल्यवान रत्नांनी सजवलेले अले. सेंगोल राजदंड सम्राट औपचारिक प्रसंगी घेऊन जात असे आणि त्याचा वापर त्याच्या अधिकाराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केला जात असे.
भारतात सेंगोल राजदंडाचा पहिला ज्ञात वापर मौर्य साम्राज्याने केला होता. मौर्य सम्राटांनी त्यांच्या विशाल साम्राज्यावर त्यांचा अधिकार दर्शविण्यासाठी सेंगोल राजदंडाचा वापर केला. गुप्त साम्राज्य , चोल साम्राज्य आणि विजयनगर साम्राज्याने देखील सेंगोल राजदंड वापरला होता. सेंगोलच्या स्थापनेद्वारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात केंद्र सरकार भारताच्या प्राचिन गौरवशाली परंपरेला उजाळा देतेय.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply