अकोला 23 मे (हिं.स.) “Iternacia India Marketing pvt. Ltd.” या दिल्लीतील कंपनीच्या अकोला शाखेतर्फे नोकरी देण्याच्या नावाखाली ट्रेनिंगसाठी 50 हजाराची रक्कम उकळली जाते व प्रॉडक्ट विकण्यासाठी दबाव आणला जातो. प्रत्येक विद्यार्थ्याला आणखी ४ लोकांना जोडण्यासाठी दबाव आणल्या जातो. होस्टेलमध्ये बंदिस्त ठेवून तसे न केल्यास बदनामी करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यात येते. अशी तक्रार या ठिकाणी असलेल्या एका मुलीने मनसे पदाधिकारी यांना दिली असता हा प्रकार उघड करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयात धडक देऊन जाब विचारला. तर उलटसुलट उत्तरे मिळाल्याने मनसे सैनिक संतप्त झाले आणि व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. अश्या प्रकारे गोरगरीबांना फसवून लुबाडणाऱ्या कंपनी राज्यात चालू देणार नाही, असा इशारा मनसेने दिला. अशी फसवणूक झालेले शेकडो विद्यार्थी व नागरिक असून त्यांनी मनसे पदाधिकारी ह्यांना संपर्क साधला असून कंपनी विरुद्ध पोलीस तक्रार केली आहे. ह्या वेळी उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले,महानगर अध्यक्ष सौरभ भगत,महिला सेना जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे आदी मनसैनिक उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply