ग्वाल्हेर, 10 एप्रिल (हिं.स.) : आज आपण ब्रिटीशकालीन गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर आलो आहोत, आज संपूर्ण परिस्थिती बदलली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले. ग्वाल्हेरमध्ये लघु उद्योग भारतीने आयोजित केलेल्या स्टार्टअप कॉन्क्लेव्ह-2023 चे रविवारी त्यांनी उद्घाटन केले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
एक काळ असा होता की आपल्या देशात प्रतिभा होती पण आपल्याला ती ओळखता येत नव्हती, असे तोमर म्हणाले. या प्रतिभावंतांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी पोषक वातावरण नव्हते. त्यामुळेच या प्रतिभावंतांची देशात निराशा होत होती आणि ते परदेशात जात होते, पण आज तशी परिस्थिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही परिस्थिती समजून घेऊन देशात सकारात्मक वातावरण निर्माण केले, त्यामुळे केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग बदलले आहे, असे तोमर यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply