Home New Delhi

Tag: New Delhi

Post
ओखळपत्राविना 2 हजारच्या नोटा बदलू नये – अश्विनी उपाध्यय

ओखळपत्राविना 2 हजारच्या नोटा बदलू नये – अश्विनी उपाध्यय

नवी दिल्ली, 22 मे (हिं.स.) : बँकांमध्ये ओखळपत्र दाखवल्याविना 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून देऊ नये अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय. भाजप नेते अश्विनी उपाध्यय यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेनुसार ओळखपत्राशिवाय दोन हजारांच्या नोटा बँकेमध्ये बदलून देणे हे तर्कहीन आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 चं उल्लंघन आहे. तसेच, यामध्ये...

Post
भावी पिढ्यांसाठी साधनसंपत्तीचे जतन करण्यात वस्तुसंग्रहालयांनी सक्रिय सहभाग घ्यावा - पंतप्रधान

भावी पिढ्यांसाठी साधनसंपत्तीचे जतन करण्यात वस्तुसंग्रहालयांनी सक्रिय सहभाग घ्यावा – पंतप्रधान

नवी दिल्ली, 18 मे (हिं.स.) : प्रत्येक राज्याच्या आणि समाजातील घटकांच्या वारश्यासह स्थानिक आणि ग्रामीण वस्तू संग्रहालयांचे संवर्धन करण्यासाठी शासन विशेष मोहीम राबवत आहे. आपल्या आजच्या प्रयत्नांमुळे युवा पिढीला त्यांच्या वारशाविषयी अधिक जाणून घेण्यात मदत होईल अशी आशा व्यक्त करत भावी पिढ्यांसाठी साधनसंपत्तीचे जतन करण्यात वस्तुसंग्रहालयांनी सक्रिय सहभाग घ्यावा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

Post
पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी आंतरराष्ट्रीय वस्तूसंग्रहालय प्रदर्शनाचे उद्घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी आंतरराष्ट्रीय वस्तूसंग्रहालय प्रदर्शनाचे उद्घाटन

नवी दिल्ली, 17 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 18 मे रोजी नवी दिल्लीत प्रगती मैदान इथे सकाळी साडे दहा वाजता आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत, हे आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, 47 व्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त त्याचे उद्घाटन होणार आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाची...

Post
येणाऱ्या पिढ्या आणि देशाच्या भविष्यासाठी व्यसनमुक्त भारत अतिशय महत्वाचा - अमित शाह

येणाऱ्या पिढ्या आणि देशाच्या भविष्यासाठी व्यसनमुक्त भारत अतिशय महत्वाचा – अमित शाह

नवी दिल्ली, 20 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनात 2047 मध्ये आपण व्यसनमुक्त भारत निर्माण करू. येणाऱ्या पिढ्या आणि देशाच्या भविष्यासाठी व्यसनमुक्त भारत अतिशय महत्वाचे आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. आज आपण व्यसनाविरुद्धच्या युद्धात अशा ठिकाणी आहोत की इथून दृढसंकल्प, सामूहिक प्रयत्न, एकसंघता आणि संपूर्ण सरकार हा दृष्टीकोन घेऊन पुढे गेलो तर...

Post
सर्व आव्हानांना तोंड देत जगाला अन्नधान्य पुरवणे आपली जबाबदारी - नरेंद्र सिंह तोमर

सर्व आव्हानांना तोंड देत जगाला अन्नधान्य पुरवणे आपली जबाबदारी – नरेंद्र सिंह तोमर

नवी दिल्ली, 20 एप्रिल (हिं.स.) : भारतासाठी कृषी क्षेत्र खूप महत्वाचे आहे. बदलत्या परिस्थितीत याचे महत्त्व वाढले आहे. पूर्वी शेतीद्वारे आपल्या गरजा पूर्ण करणे एवढेच आपले ध्येय होते, मात्र सध्या भारताकडून जगाच्या अपेक्षाही वाढत आहेत. अशा परिस्थितीत शेती, हवामान बदल आदी सर्व आव्हानांना तोंड देत जगाला अन्नधान्य पुरवणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय...

Post
राष्ट्रीय क्वांटम अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

राष्ट्रीय क्वांटम अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 20 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2023-24 ते 2030-31 या कालावधीसाठी एकूण रु.6003.65 कोटी खर्चाच्या राष्ट्रीय क्वांटम अभियानाला (एनक्यूएम ) मंजुरी दिली. क्वांटम तंत्रज्ञानाशी संबंधित वैज्ञानिक आणि औद्योगिक क्षेत्रात संशोधन आणि विकासाचे बीजारोपण करणे ते विकसित करणे आणि प्रगती करणे आणि त्याच्याशी संबंधित एक सचेत आणि सर्जनशील व्यवस्था...

Post
भारत गौरव ट्रेन आज रवाना होणार

भारत गौरव ट्रेन आज रवाना होणार

नवी दिल्ली, 07 एप्रिल (हिं.स.) : भारतीय रेल्वेने तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत गौरव डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून, “श्री रामायण यात्रा” सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे यात्रा आज, शुक्रवारी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकापासून सुरू होणार आहे. या प्रवासात भगवान श्री रामाच्या जीवनाशी संबंधित प्रमुख ठिकाणांचा समावेश असेल. ही प्रस्तावित रेल्वे यात्रा आधुनिक...

Post
देशातील आरोग्य मंत्र्यांची आज बैठक

देशातील आरोग्य मंत्र्यांची आज बैठक

नवी दिल्ली, 07 एप्रिल (हिं.स.) : गेल्या काही दिवसापासून देशभरात कोरोना रूग्णांचे आकडे वाढत आहेत. यापार्श्वभुमीवर आज, शुक्रवारी 7 एप्रिल रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीत विविध राज्यातील...

Post
देशात दहा अणुभट्ट्या उभारण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी

देशात दहा अणुभट्ट्या उभारण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली, 5 एप्रिल (हिं.स.) : नासा अर्थात राष्ट्रीय विमानोड्डाण तंत्रज्ञान आणि अवकाश प्रशासन विषयक संस्था आणि इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संघटना यांनी संयुक्तपणे निसार (नासा-इस्रो सिंथेटिक अॅपर्चर रडार) नामक भूविज्ञान उपग्रहाची निर्मिती केली आहे, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान,अणुउर्जा विभागाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत उपस्थित सदस्यांना दिली. देशभरात दहा अणुभट्ट्यांची...

Post
स्टँड-अप इंडिया योजनेंतर्गत 7 वर्षांत 1,80,630 हून अधिक खात्यांना 40,700 कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर

स्टँड-अप इंडिया योजनेंतर्गत 7 वर्षांत 1,80,630 हून अधिक खात्यांना 40,700 कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर

अनुसूचित जाती-जमाती, महिला वर्ग यांच्यामधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी स्टँड-अप इंडिया योजना अत्यंत महत्त्वाचा टप्पा – निर्मला सीतारामन नवी दिल्ली, 5 एप्रिल (हिं.स.) : स्टँड अप इंडिया योजनेचा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत, योजनेच्या प्रारंभापासून 21 मार्चपर्यंत देशभरातील 180,636 खात्यांना 40,710 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेची वैशिष्ठ्ये...