Home NCP

Tag: NCP

Post
शहरात साफसफाईचा उडाला बोजवारा, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

शहरात साफसफाईचा उडाला बोजवारा, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

अमरावती, 16 मे, (हिं.स.) स्वच्छता सर्वेक्षणांत तसेच मानांकनात अमरावती महानगर पालिकेला विविध पुरस्कार मिळत असल्याचा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र शहरात कुठेही साफसफाई व स्वच्छता असल्याचे दिसत नाही.सद्यस्थितीत साफसफाई कंत्राटा बद्दल नवीन निविदा प्रक्रिया राबविल्यामुळे शहरात साफसफाईचा पूर्णता बोजबारा उडालेला आहे. महापालिकेने साफसफाई बाबत नव्याने परिपूर्ण धोरण राबविणे गरजेचे असल्याने यासंदर्भात शहर राष्ट्रवादी...

Post
मविआची 'वज्रमूठ' सभा पुन्हा सुरू करणार; नेत्यांच्या बैठकीत निर्णय - जयंत पाटील

मविआची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा सुरू करणार; नेत्यांच्या बैठकीत निर्णय – जयंत पाटील

मुंबई, 14 मे (हिं.स.) : उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगिती करण्यात आलेली महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची चर्चा आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. भविष्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्ष बसून जागा वाटपाबाबत...

Post
बजरंग दलावर बंदीची मागणी करणार्या काँग्रेस विरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा - विनोद बंसल, विहिंप

बजरंग दलावर बंदीची मागणी करणार्या काँग्रेस विरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा – विनोद बंसल, विहिंप

नवी दिल्ली, 8 मे (हिं.स.) : ‘बजरंग दला’ची ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) शी तुलना करून बजरंग दलावर बंदीची मागणी कर्नाटक काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्यात केली आहे. बजरंग दलाची बदनामी केली म्हणून बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषदेच्या चंदीगड प्रभागाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कायदेशीर नोटिस पाठवून काँग्रेस पक्षाच्या विरोधात 100 कोटी 10...

Post
हसन मुश्रीफ यांचा जामीन अर्ज फेटाळला, मनी लाँड्रिंग प्रकरणी सत्र न्यायालयातून दिलासा नाही

हसन मुश्रीफ यांचा जामीन अर्ज फेटाळला, मनी लाँड्रिंग प्रकरणी सत्र न्यायालयातून दिलासा नाही

मुंबई, 11 एप्रिल (हि.स.) : ईडीकडून दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने मुश्रीफांचा अटकपूर्व जामीन नाकारल्याने आताहसन मुश्रीफांवर अटकेची टांगती तलवार आहे. मुश्रीफ आता या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्यात येणार आहे. दरम्यान हसन मुश्रीफ यांना अटकेपासून तीन दिवसांचा अंतरिम दिलासा मिळाला आहे. जामीन...

Post
हसन मुश्रीफ प्रकरणी पुण्यात ईडीची मोठी कारवाई

हसन मुश्रीफ प्रकरणी पुण्यात ईडीची मोठी कारवाई

पुणे, 3 एप्रिल (हिं.स.) : माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अंमलबजावणी संचनालय यांनी पुण्यात मोठी कारवाई सुरू केली आहे. सोमवारी सकाळीच पुण्यात 9 ठिकाणी एकाचवेळी ईडीची मोठी छापेमारी सुरु झाल्याने खळबळ उडाली आहे. हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील व्यवसायिकांच्या घरी ही कारवाई करण्यात येत आहे. व्यवसायिक विवेक गव्हाणे, सी.ए. जयेश दुधेडीया...

Post
शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब - खा. सुप्रिया सुळे

शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब – खा. सुप्रिया सुळे

मुंबई, 31 मार्च (हिं.स.) हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली,त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे...

Post
मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला सरकारने कात्री लावण्याचे केले पाप - जयंत पाटील

मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला सरकारने कात्री लावण्याचे केले पाप – जयंत पाटील

मुंबई, 31 मार्च (हिं.स.) विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर, आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकार करत असून याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध केला आहे. महाविकास आघाडी सरकारने गेल्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयांच्या...

Post
विकास कामातून नगर शहरातील बाजारपेठांना चालना मिळत आहे - संग्राम जगताप

विकास कामातून नगर शहरातील बाजारपेठांना चालना मिळत आहे – संग्राम जगताप

अहमदनगर, 26 मार्च (हिं.स.) :- नगर शहरातील मुख्य बाजार पेठातील रस्ते अत्यंत खराब झाले होते. या रस्त्याच्या विकास कामासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या रस्त्याची कामे होऊ शकली नाही. आता या अडचणी दूर केल्या असून डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. जिल्हाभरातून ग्राहक व्यापारासाठी नगर शहरामध्ये येत असतात. व्यापार...

Post
आ.निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त बालघर प्रकल्पातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

आ.निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त बालघर प्रकल्पातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

अहमदनगर, 26 मार्च (हिं.स.):- नगर येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक संजय चव्हाण यांनी लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त नगरमधील तपोवन रोड येथील अनाथ,उपेक्षित वंचित आणि आदि वासी बालकांचा लोक सहभागातून चालविला जाणारा शैक्षणिक निवासी पुनर्वसन प्रकल्प बालघर प्रकल्प मधील बालकांना दैनंदिन अन्नधान्य,जीवनावश्यक वस्तू,वह्या,पेन,चित्रकला साहित्यासह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अतिशय खडतर आयुष्यातून गोरगरीब उपेक्षित...

Post
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात सरकार गंभीर नाही - अजित पवार

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात सरकार गंभीर नाही – अजित पवार

मुंबई, 25 मार्च (हिं.स.) मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अस्मितेचा विषय आहे. यावर्षी सप्टेबर महिन्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरु झाले आहे. हे अमृत महोत्सवी वर्ष संपायला अवघे पाच महिने राहिले तरी सरकार या अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात गंभीर नाही. मराठवाडा आणि मराठवाड्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाविषयी सरकारची अनास्था आहे, त्यांना यावषयी काही देणे-घेणे दिसत...