Home Nagpur

Tag: Nagpur

Post
आगामी 5 वर्षात इलेक्ट्रिक बसेस सुरू करणार- नितीन गडकरी

आगामी 5 वर्षात इलेक्ट्रिक बसेस सुरू करणार- नितीन गडकरी

नागपूर, 04 जून (हिं.स.) : आगामी 5 वर्षात देशभरात सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रिक बसेसनी व्हावी असा प्रयत्न असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नागपुरात दिली. मोदी सरकारच्या 9 वर्षातील कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. मोदींच्या नेतृत्वातील 9 वर्षे भारताच्या विकासाचे सुवर्ण युग आहे असेही गडकरींनी सांगितले. याप्रसंगी गडकरी म्हणाले...

Post
एनआयएचे पथक नागपुरात दाखल... नितीन गडकरी धमकी प्रकरणाचा तपास

एनआयएचे पथक नागपुरात दाखल… नितीन गडकरी धमकी प्रकरणाचा तपास

नागपूर, 25 मे (हिं.स.) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना फोनवरून खंडणी आणि ठार करण्याची धमकी दिल्या प्रकरणी चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक आज, गुरुवारी नागपुरात दाखल झाले. बेळगाव तुरुंगात बंद असलेला दहशतवादी संघटनेचा सदस्य अकबर पाशा याच्या सांगण्यावरूनच जयेश कांथा उर्फ शाकीरने गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली होती....

Post
मंदिरात घुसखोरीचा प्रयत्न झाल्यास सडेतोड उत्तर देऊ – मिलींद परांडे

मंदिरात घुसखोरीचा प्रयत्न झाल्यास सडेतोड उत्तर देऊ – मिलींद परांडे

नागपूर, 17 मे (हिं.स.) : हिंदूंचे श्रद्धास्थान आणि 12 ज्योतीर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात शनिवारी रात्री मुस्लिम तरुणांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे ते अपयशी ठरले. मागील वर्षीही असाच असफल प्रयत्न झाला होता. यापुढे हिंदुंच्या मंदिरात कोणी अशी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यास हिंदु समाजाकडून सडेतोड उत्तर दिले जाईल असा इशारा विहिंपचे...

Post
राहुल गांधींनी एक दिवस कोठडीत राहुन दाखवावे- फडणवीस

राहुल गांधींनी एक दिवस कोठडीत राहुन दाखवावे- फडणवीस

नागपूर, 04 एप्रिल (हिं.स.) : अंदमानात सावरकर राहिले त्या कोठडीत एसी लावून देतो, राहुल गांधींनी फक्त एक दिवस त्या कोठडीत राहून दाखवावे असे थेट आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. स्थानिक शंकर नगर चौकात सावरकरांच्या पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टीचे...

Post
आमदार मिर्झांच्या नावाने लाच मागणाऱ्यांना अटक

आमदार मिर्झांच्या नावाने लाच मागणाऱ्यांना अटक

नागपूर, 28 मार्च (हि.स.) : विधानपरिषद सदस्य वजाहत मिर्झा यांच्या नावाने 25 लाखांची लाच घेताना दोघांना नागपुरात रंगेहाथ अटक करण्या आली आहे. विधीमंडळात प्रश्न उपस्थित न करण्यासाठी दोघांनी एका शासकीय अधिकाऱ्याला एक कोटींची लाच मागितली होती. लाच घेताना पकडण्यात आलेला एक आरोपी एमआयडीसीमध्ये तंत्रज्ञ असून दुसरा राजकीय कार्यकर्ता आहे. तक्रारदार अधिकारी ‘आरटीओ’तील असल्याची माहिती सूत्रांनी...

Post
मी आता फार लोणी लावायला तयार नाही"- नितीन गडकरी

मी आता फार लोणी लावायला तयार नाही”- नितीन गडकरी

नागपूर, 26 मार्च (हिं.स.) : विकासाच्या कामांना खीळ घालणाऱ्या प्रवृत्ती आणि अवास्तव दबावगट निर्माण करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शाब्दीक चपराक लगावली आहे. तुम्हाला पटले तर मतदान करा किंवा करू नका परंतु, मी आता कुणाला फार लोणी लावू शकत नाही अशा शब्दात गडकरींनी ताशेरे ओढले आहेत. पद्मविभूषण रघुनाथ माशेलकरांच्या हस्ते रविवारी गडकरींना मोहन धारिया राष्ट्रनिर्माण...

Post
महामेट्रोला 'आशिया बुक ऑफ रेकॉर्ड' प्रमाणपत्र प्रदान

महामेट्रोला ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ प्रमाणपत्र प्रदान

नागपूर, 19 मार्च (हिं.स.) : गेल्या 51 महिन्यात 24 किमीचे मेट्रो नेटवर्क, इंटिग्रेटेड वापरासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पातील पहिली सौर पीव्ही प्रणाली आणि शहरी भागातील रेल्वे ट्रॅकवर सर्वात जास्त वजनाच्या सिंगल स्पॅन डबल डेकर स्टील ब्रिज स्थापनेची नोंद घेत आशिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने आज महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...