Home Mumbai

Tag: Mumbai

Post
अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार - मुख्यमंत्री

अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार – मुख्यमंत्री

लखनौ, 9 एप्रिल (हिं.स.) : प्रभू श्री रामचंद्र यांचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्या नगरीमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्री श्री. शिंदे हे दोन दिवसीय उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी अयोध्येत प्रभू श्री रामच्रंद्र यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर आयोजित...

Post
यावर्षापासून "मच्छिमार दिन" साजरा केला जाणार - मुनगंटीवार

यावर्षापासून “मच्छिमार दिन” साजरा केला जाणार – मुनगंटीवार

मुंबई, 6 एप्रिल (हिं.स.) मच्छिमार दिन हा दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी असतो. यावर्षापासून हा दिन मोठया उत्साहात आणि आनंदात साजरा केला जाईल आणि मत्स्यव्यवसाय पर्यटनाला चालना दिली जाईल असे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सागरी किनारपट्टीवरील मत्स्य विभागाच्या समस्यांबाबत आज सहयाद्री अतिथिगृह येथे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली...

Post
शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री

मुंबई, 3 एप्रिल (हिं.स.) : शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील यादृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज नाबार्डतर्फे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्य पतपुरवठा चर्चासत्रात (स्टेट क्रेडिट सेमिनार) ते बोलत...

Post
पत्राचाळ प्रकरणी ईडीची मुंबईसह गोव्यात कारवाई

पत्राचाळ प्रकरणी ईडीची मुंबईसह गोव्यात कारवाई

मुंबई, 03 एप्रिल (हिं.स.) : खासदार संजय राऊत आरोपी असलेल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालायाने (ईडी) आज, सोमवारी मुंबई आणि गोव्यात कारवाई केली. ईडीने राकेश कुमार आणि सारंग कुमार वाधवन यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर असलेली 31.50 कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. ही मालमत्ता मुंबई आणि गोवा येथील आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार,...

Post
माउंट एव्हरेस्ट मोहीमेसाठी ठाणे - रायगडचे चौघे सज्ज; मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

माउंट एव्हरेस्ट मोहीमेसाठी ठाणे – रायगडचे चौघे सज्ज; मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

ठाणे, 1 एप्रिल (हिं.स.) भारतीय रेल्वे सेवेत काम करणारे आणि ठाण्याचे सुपुत्र असलेले हेमंत जाधव,संदीप मोकाशी आणि बँकेत काम करणारे धनाजी जाधव यांच्यासह रायगड जिल्ह्यातील कर्जत रहिवाशी असलेले संतोष दगडे असा चार जणांच्या समूहाने आज माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी आगेचूक केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या चमूला भारतीय ध्वज देऊन मोहिम यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा...

Post
वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामपंचायतींना ६९२.६७ कोटींचा निधी उपलब्ध - गिरीश महाजन

वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामपंचायतींना ६९२.६७ कोटींचा निधी उपलब्ध – गिरीश महाजन

मुंबई, 29 मार्च (हिं.स.) : पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार राज्यातील ग्रामपंचायतींना ६९२.६७ कोटी चा निधी उपलब्ध झाला असून आतापर्यंत जवळपास २५४३ कोटी रुपये येवढा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली. सन २०२२-२३ चा अबंधित निधी रु ७२२.२७ कोटीचे वितरण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्यात येणार असून सदर...

Post
एक सच्चा, निष्ठावंत, कडवट कार्यकर्ता हरवला- भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार

एक सच्चा, निष्ठावंत, कडवट कार्यकर्ता हरवला- भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार

मुंबई पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. भारतीय जनता पक्षाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या रूपाने एक सच्चा, निष्ठावंत, कडवट कार्यकर्ता हरवला आहे अशा शब्दांत भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी शोक व्यक्त केला आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या सुरुवातीच्या काळात कोणी कार्यकर्ता बनायला...

Post
मुंबईत जी 20 बैठकीत, व्यापार वित्तपुरवठा सहकार्यावर चर्चा

मुंबईत जी 20 बैठकीत, व्यापार वित्तपुरवठा सहकार्यावर चर्चा

मुंबई, 28 : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने 28 मार्च 2023 रोजी मुंबईत वांद्रे पश्चिम येथील ताज लँड्स एंड येथे जी20 सदस्य देशांमधील ‘व्यापार आणि वित्तीय सहकार्य’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. मुंबईत होत असलेल्या जी-20 व्यापार आणि गुंतवणूकविषयक कार्यगटाच्या पहिल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, इसीजीसी लिमिटेड आणि इंडिया एक्सीम...

Post
उज्ज्वला योजनेच्या सिलेंडर सबसिडीला मुदतवाढ

उज्ज्वला योजनेच्या सिलेंडर सबसिडीला मुदतवाढ

नवी दिल्ली, 25 मार्च (हिं.स.) : केंद्र सरकारने एलपीजी गॅसवर सबसिडी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उज्ज्वला योजनेंतर्गत सरकारने प्रति एलपीजी सिलिंडर 200 रुपये सबसिडी एक वर्षासाठी वाढवली आहे. हे अनुदान 14.2 किलोच्या 12 एलपीजी सिलेंडरवर देण्यात येईल. नव्या आर्थिक वर्षात ही सबसिडी लागू असेल. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी एलपीजी सिलेंडर स्वस्त होणार आहे. माहिती आणि...

Post
ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींविरोधात भाजपाचे आंदोलन

ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींविरोधात भाजपाचे आंदोलन

डोंबिवली, २५ मार्च, (हिं.स) : मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार असल्याचे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे याबद्दल काहीच बोलत नसल्याबद्दल कांबळे यांनी आश्चर्य...