Home India

Tag: India

Post
दहशतवाद्यांचा बीमोड अखेर दहशतवादानेच होतो - डॉ. जितेंद्र सिंह

दहशतवाद्यांचा बीमोड अखेर दहशतवादानेच होतो – डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्ली, 23 मार्च (हिं.स.) : दहशतवाद्यांचा बीमोड अखेर दहशतवादानेच होतो. जम्मू आणि काश्मीरचा असल्यामुळे ते खात्रीने सांगू शकतात की दहशतवादी पळून जात आहेत आणि दहशतवाद अंतिम टप्प्यात आला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले. शहीद-ए-आझम भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी नवी दिल्ली येथे आयोजित...

Post
पंतप्रधान शुक्रवारी वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला करणार संबोधित

पंतप्रधान शुक्रवारी वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला करणार संबोधित

नवी दिल्ली, 23 मार्च (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (24 मार्च) वाराणसीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला संबोधित करतील. पंतप्रधान दुपारी 12 वाजता, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या मैदानावर 1780 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. वन वर्ल्ड टीबी शिखर परिषद...

Post
वनक्षेत्रात वाढ करण्याची जलदूताचीच मंत्र्यांकडे मागणी

वनक्षेत्रात वाढ करण्याची जलदूताचीच मंत्र्यांकडे मागणी

रत्नागिरी, 22 मार्च, (हिं. स.) : जिल्ह्यातील वनक्षेत्रामध्ये वाढ करून संरक्षण करावे, अशी मागणी चिपळूण येथील जलदूत आणि वाशिष्ठी जगबुडी नदी प्रहरी सदस्य शाहनवाज शाह यांनी वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात प्रामुख्याने अत्यल्प वनक्षेत्र आहे. खासगी जंगलातून चाललेल्या अमर्याद वृक्षतोडीमुळे ऑक्सिजन निर्मितीवर परिणाम होत आहे....

Post
दृढ निरोगी पिढी निर्माण करणे ही काळाची गरज - रोहिणी शेंडगे

दृढ निरोगी पिढी निर्माण करणे ही काळाची गरज – रोहिणी शेंडगे

अहमदनगर, 22 मार्च (हिं.स.):- महानगरपालिकेच्या माध्यमातून बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलने महिलांसाठी आरोग्य सुविधा देऊन नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.गेल्या अनेक वर्षापासून देशपांडे हॉस्पिटलने गोर गरीब रुग्णांसाठी आरोग्य सुविधा दिल्या आहे.केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना थेट रुग्णांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाते.जिल्हाभरातून महिला प्रसुतीसाठी मोठ्या संख्येने येत आहे.त्यांच्या आरोग्याची व नवजात बालकाची काळजी घेतली जाते.बाळासाहेब देशपांडे रुग्णालयामधील...

Post
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबध्द - आ.संग्राम जगताप

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबध्द – आ.संग्राम जगताप

अहमदनगर, 22 मार्च (हिं.स.):- नगर शहराची विकास कामांच्या माध्यमातून पायाभरणी सुरू आहे.नगरकरही मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या विकास कामांचे स्वागत करत आहे.नागरिकांचे विकासाचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून ते नियोजनबद्ध व कायमस्वरूपी सोडवण्यावर माझा भर आहे.मी फक्त विकास कामावरच बोलत असतो.या माध्यमातून आपल्या शहराचे उज्वल नाव देशपातळीवर घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू आहे.तरी प्रत्येकाने आपल्या शहरा चा अभिमान बाळगावा.टप्प्याटप्प्याने...

Post
शेतकऱ्यांच्या संकटासाठी एकदाच लाँग टर्म नियोजन करा - संभाजीराजे छत्रपती

शेतकऱ्यांच्या संकटासाठी एकदाच लाँग टर्म नियोजन करा – संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर, २२ मार्च (हिं.स.) : बळीराजा जगला तर आम्ही जगू शकतो. दरवर्षी वेगवेगळ्या संकटामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. त्यामुळे सरकारने एकदाच लाँग टर्म नियोजन करायला पाहिजे, अशी विनंती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. विधिमंडळात जाऊन कशाला बसता? आता खऱ्या अर्थाने हेलिकॉप्टरने फिरण्याची गरज आहे. कृषीमंत्र्यांनी ज्या पद्धतीने फिरायला पाहिजे...

Post
नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून लवकरच भरपाईची घोषणा करणार - अब्दुल सत्तार

नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून लवकरच भरपाईची घोषणा करणार – अब्दुल सत्तार

धुळे, 22 मार्च (हिं.स.) : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील काही जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, यात धुळे जिल्हाही आहे. जिल्ह्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, तसेच येत्या दोन दिवसात युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना पिकनिहाय योग्य भरपाईची घोषणा अधिवेशन काळातच दोन्ही सभागृहात केली जाईल, असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार...

Post
मुख्यमंत्र्यांनी केले आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे कौतुक

मुख्यमंत्र्यांनी केले आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे कौतुक

ठाणे, 22 मार्च, (हिं.स.) आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे 60 सायकलप्रेमी नववर्ष स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. या सायकल रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग नोंदवून सर्व सायकलप्रेमी यांच्यासह पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले चिमुकले, ६३ वर्षीय दुर्गा गोरे यांच्यासह आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे कौतुक केले. 9 वर्षांच्या मुलीपासून 71 वर्षाच्या सायकल प्रेमी पर्यंत सर्वांनीच उपस्थित...

Post
गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात राज्य सरकारच्या वतीने 'आनंदाचा शिधा'चे वाटप

गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात राज्य सरकारच्या वतीने ‘आनंदाचा शिधा’चे वाटप

ठाणे, 22 मार्च, (हिं.स.) गुढीपाडव्यानिमित्ताने राज्य सरकारच्या वतीने ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या हस्ते कोपरीत या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारने सर्वसामान्यांचे सण आनंदात जावेत, यासाठी ‘आनंदाचा शिधा हा उपक्रम सुरू केला आहे त्या अंतर्गत ठाणे शहरातील नागरिकांना आनंदाचा शिधावाटप करण्यास आज कोपरी येथे सुरुवात...

Post
चंद्रपुरातील रामभक्तांचे अयोध्येत असणार रामनाम जाप खाते-मुनगंटीवार

चंद्रपुरातील रामभक्तांचे अयोध्येत असणार रामनाम जाप खाते-मुनगंटीवार

चंद्रपूर 22 मार्च (हिं.स.)- अयोध्येच्या मंदिरासाठी लागणारे सागवान(काष्ठ)लाकूड चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील असणार आहे. या काष्ठ सोबत १० रामभक्तांनीं लिहिलेल्या एक कोटी रामनामाचा जाप लिहिलेल्या पुस्तिका पाठविण्यात येणार आहे.या काष्ठ सोबत रामाच्या नावाचा प्रवास व्हावा.या पुस्तिकेच्या माध्यमातून अयोध्येतील रामनाम जपाच्या बँकेत चंद्रपुरातील रामनाम जपाचे १० हजार खाते उघडले जातील, अशी घोषणा कॅबिनेट व पालकमंत्री सुधीर...