Home Devendra Fadanvis

Tag: Devendra Fadanvis

Post
सोलापुरात फडणवीसांना निवेदन देण्यासाठी आलेल्या वृद्धाला भोवळ

सोलापुरात फडणवीसांना निवेदन देण्यासाठी आलेल्या वृद्धाला भोवळ

सोलापूर , 25 मे, (हिं.स.) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महसूल भवनाचं लोकार्पण होणार आहे. यावेळी पक्षाचा मेळावा देखील होणार आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या वृद्ध सामाजिक कार्यकर्त्याला भोवळ आली, हा वृद्ध फडणवीसांना निवेदन देत होता, यावेळी तो खाली कोसळला.देवेंद्र फडणवीस यांनी वृद्धाची विचारपूस केली. व...

Post
सोलापूर - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सोलापूर – जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सोलापूर , 25 मे (हिं.स.) सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले. महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी नूतन इमारतीच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या संविधान कोनशिलेचे अनावरण उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात...

Post
पीक कर्जासाठी लावण्यात आलेली सीबील अट रद्द करा - शेतकरी जागर मंच

पीक कर्जासाठी लावण्यात आलेली सीबील अट रद्द करा – शेतकरी जागर मंच

अकोला, 23 मे(हिं.स.)पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना लावण्यात येणारी सीबील अट रद्द करण्याच्या मागणीसाठी 25 मे रोजी बार्शीटाकळी येथील तहसील कार्यालयावर शेतकरी जागर मंच च्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आज विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली. यावेळी शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे, अक्षय राऊत आदी उपदाधिकारी उपस्थित...

Post
'ईएसआयसी' रुग्णालयांसाठी जागा व आवश्यक सुविधा देणार - उपमुख्यमंत्री

‘ईएसआयसी’ रुग्णालयांसाठी जागा व आवश्यक सुविधा देणार – उपमुख्यमंत्री

मुंबई, 22 मे (हिं.स.) : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून ‘ईएसआयसी’ (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य आवश्यक सोयीसुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत बीकेसी येथील ‘ओएनजीसी’ संकुल येथे महाराष्ट्र आणि पश्चिम...

Post
दंगलीचा कट रचणाऱ्यांवर कारवाई करा- काँग्रेस

दंगलीचा कट रचणाऱ्यांवर कारवाई करा- काँग्रेस

अमरावती, 16 मे (हिं.स.) : अमरावतीत जातीय दंगल घडवण्याचा कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी काँग्रेसने केलीय. यासंदर्भात काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आलेय. काँग्रेसच्या निवेदनानुसार अमरावती शहर तसेही जातिय दंगलीच्या दृष्टीकोनातून राज्यातील संवेदनशिल शहरामध्ये मोडतं आणि जिथे जातिय दंगली घडतात त्याठिकाणीं व्यापार,रोजगार,जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या जीवनाची सुरक्षा,शहरातील व्यापार,उद्योग...

Post
उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते निरंजन डावखरेंचा `कर्तव्यपथ' अहवाल प्रकाशित

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते निरंजन डावखरेंचा `कर्तव्यपथ’ अहवाल प्रकाशित

ठाणे, 24 एप्रिल (हिं.स.) : कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेत प्रतिनिधीत्व करताना आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी पाच वर्षात केलेल्या कार्यावरील `कर्तव्यपथ’ अहवालाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अहवालाचे प्रकाशन करून आमदार निरंजन डावखरे यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. कोकण पदवीधर मतदारसंघात तलासरीपासून दोडामार्ग पर्यंतच्या...

Post
ठाण्यात 13 एप्रिल रोजी एकदिवसीय राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन

ठाण्यात 13 एप्रिल रोजी एकदिवसीय राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन

ठाणे, १२ एप्रिल, (हिं.स) : महाराष्ट्रातील सर्व मत निर्माते आणि शिक्षणतज्ञांना एकत्र आणण्यासाठी (ठाणे, मुंबई आणि एमएमआर वर लक्ष केंद्रीत करून) एनईपी च्या युगात शैक्षणिक जगताच्या बदलत्या परिस्थितीवर चर्चा व विचारमंथन करण्यासाठी IScholar Knowledge Services Pvt. Ltd. मुंबई यांच्यासंयुक्त विद्यमाने हिरानंदानी मेडोज्, ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृह येथे गुरुवार दि. 13 एप्रिल, 2023 रोजी...

Post
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येत घेतले प्रभू रामचंद्र यांचे दर्शन

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येत घेतले प्रभू रामचंद्र यांचे दर्शन

लखनौ, 9 एप्रिल (हिं.स.) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अयोध्या शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मंत्री, महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार यासह स्थानिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री....

Post
राहुल गांधींनी एक दिवस कोठडीत राहुन दाखवावे- फडणवीस

राहुल गांधींनी एक दिवस कोठडीत राहुन दाखवावे- फडणवीस

नागपूर, 04 एप्रिल (हिं.स.) : अंदमानात सावरकर राहिले त्या कोठडीत एसी लावून देतो, राहुल गांधींनी फक्त एक दिवस त्या कोठडीत राहून दाखवावे असे थेट आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. स्थानिक शंकर नगर चौकात सावरकरांच्या पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टीचे...

Post
नदीलगतच्या गावामध्ये संरक्षक भिंत बांधण्यात येणार - उपमुख्यमंत्री

नदीलगतच्या गावामध्ये संरक्षक भिंत बांधण्यात येणार – उपमुख्यमंत्री

मुंबई, 23 मार्च (हिं.स.) कन्नड -सोयगाव परिसरामध्ये मागील तीन वर्षांमध्ये सातत्याने अतिवृष्टी झाल्याने काही प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या परिसरातील नदीलगतच्या गावामध्ये संरक्षक भींत बांधण्याची मागणी होत असून येथे या संरक्षक भिंत बांधण्याचे काम करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. यासंदर्भात सदस्य उदयसिंग राजपूत यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. उपमुख्यमंत्री...