Home Metro

Region: Metro

Post
हायकोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत 'औरंगाबाद' हेच नाव, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

हायकोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत ‘औरंगाबाद’ हेच नाव, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

मुंबई / छत्रपती संभाजीनगर, १७ मे (हिं.स.) : केंद्र शासनाकडून छत्रपती संभाजीनगर नामांतराला मंजुरी मिळताच काही शासकीय कार्यालयांनी या नावाची अंमलबजावणी सुरू केली. तथापि मुंबई उच्च न्यायालयाचे नामांतरासंदर्भात पुढील आदेश येईपर्यंत नावात बदल न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याआधारे महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने ‘औरंगाबाद’ हेच नाव लिहावे, असे परिपत्रक छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी...

Post
राज्यस्थापना दिवस साजरे केल्याने एकात्मतेची भावना दृढ होईल : राज्यपाल

राज्यस्थापना दिवस साजरे केल्याने एकात्मतेची भावना दृढ होईल : राज्यपाल

मुंबई, १७ मे, (हिं. स) विविध भाषा, बोली, संगीत व खाद्य संस्कृतीने नटलेला भारत एक सुंदर पुष्पगुच्छ आहे. देशातील विविध राज्यांमध्ये सांस्कृतिक आदान प्रदान झाल्यास नागरिकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढून राष्ट्रीय एकात्माची भावना दृढ होईल. या दृष्टीने ”एक भारत श्रेष्ठ भारत” उपक्रमा अंतर्गत प्रत्येक राज्यात इतर राज्यांचे स्थापना दिवस साजरे करण्याचा शासनाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे...

Post
अमेरिकेसोबत वाणिज्यिक संबंध दृढ करण्यावर महाराष्ट्राचा भर - मुख्यमंत्री

अमेरिकेसोबत वाणिज्यिक संबंध दृढ करण्यावर महाराष्ट्राचा भर – मुख्यमंत्री

मुंबई, 16 मे (हिं.स.) महाराष्ट्रात कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात मोठी संधी असून अमेरिकेने या क्षेत्रात सहकार्य करावे. अमेरिकेसोबत महाराष्ट्राचे वाणिज्यिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृह येथे...

Post
मुंबई-गोवा मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस

मुंबई-गोवा मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस

मुंबई, 16 मे (हिं.स.) : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मंगळवारी (16 मे) यशस्वी चाचणी देखील आली. सध्या मुंबई ते शिर्डी धावणाऱ्या गाडीचा वापर चाचणीसाठी करण्यात आला. मुंबईहून पहाटे 5.35 वाजता गोव्याच्या दिशेने वंदे भारत एक्सप्रेस रवाना झाली. 16 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटी स्थानकातून सुटली, ही...

Post
मातृभूमीसाठी बलिदान देणारी परंपरा शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणा प्रतापसिंह यांनी स्थापित केली : राजनाथ सिंह

मातृभूमीसाठी बलिदान देणारी परंपरा शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणा प्रतापसिंह यांनी स्थापित केली : राजनाथ सिंह

मुंबई, 15 मे (हिं.स.) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापना करून शौर्याची जी परंपरा निर्माण केली, ती छत्रपती संभाजी महाराज यांनी अतिशय स्वाभिमानाने पुढे चालवली; तीच परंपरा महाराणा प्रतापसिंह यांनी देखील जपली होती. ज्यातून आपण आजही प्रेरीत होतो, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले. वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनात उपस्थित राहण्याठी...

Post
राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स, २२ मेला हजर राहण्याची सूचना

राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स, २२ मेला हजर राहण्याची सूचना

मुंबई, १५ मे (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. २२ मे रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना या समन्समध्ये करण्यात आली आहे. आयएल आणि एफएस प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. याआधी जयंत पाटील यांना गेल्या गुरुवारी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. मात्र त्यांनी वेळ वाढवून मागितली....

Post
मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव - मुख्यमंत्री

मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव – मुख्यमंत्री

मुंबई, १४ मे (हिं.स.) : मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे) ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ही घोषणा केली. या महोत्सवाला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आरोग्य मंत्री प्रा. डॅा.तानाजी...

Post
मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासा साठी राज्य सरकार कटिबद्ध

मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासा साठी राज्य सरकार कटिबद्ध

मुंबई, 14 मे (हिं.स.) – मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या परिषदेत दिली. तसेच हे सर्वसामान्य माणसाचे सरकार आहे. सामान्य मुंबईकरांना हक्काचे घर मिळवून देणे हेच आमचे लक्ष असून ते केल्याशिवाय शांत बसणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. भाजप विधान परिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष...

Post
मविआची 'वज्रमूठ' सभा पुन्हा सुरू करणार; नेत्यांच्या बैठकीत निर्णय - जयंत पाटील

मविआची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा सुरू करणार; नेत्यांच्या बैठकीत निर्णय – जयंत पाटील

मुंबई, 14 मे (हिं.स.) : उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगिती करण्यात आलेली महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची चर्चा आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. भविष्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्ष बसून जागा वाटपाबाबत...

Post
कोळसा मंत्रालयाच्या वतीने मुंबईत जस्ट ट्रान्झिशन रोडमॅपवर आधारित चर्चात्मक परिसंवादाचे आयोजन

कोळसा मंत्रालयाच्या वतीने मुंबईत जस्ट ट्रान्झिशन रोडमॅपवर आधारित चर्चात्मक परिसंवादाचे आयोजन

मुंबई, 14 मे (हिं.स.) : कोळसा मंत्रालय 15 मे रोजी मुंबईत भारताच्या जी-ट्वेंटी (G20) अध्यक्षपदा अंतर्गत ‘कोल इंडिया लिमिटेड’ (CIL) च्या सहकार्याने ‘जस्ट ट्रान्झिशन रोडमॅप’ या विषयावर आधारित चर्चासत्र आयोजित करणार आहे. हे तीन दिवसीय चर्चासत्र जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित केले जाईल. भारताच्या जी-ट्वेंटी (G20) अध्यक्षपदा अंतर्गत होणाऱ्या तिसर्या एनर्जी ट्रान्झिशन (ऊर्जा संक्रमण)...