Home Shivsena

Political parties: Shivsena

Post
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येत घेतले प्रभू रामचंद्र यांचे दर्शन

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येत घेतले प्रभू रामचंद्र यांचे दर्शन

लखनौ, 9 एप्रिल (हिं.स.) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अयोध्या शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मंत्री, महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार यासह स्थानिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री....

Post
जालना - जिल्हाधिका-यांकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती व जीवनसुरक्षा योजनेचा आढावा

जालना – जिल्हाधिका-यांकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती व जीवनसुरक्षा योजनेचा आढावा

जालना, 7 एप्रिल, (हिं.स.) वित्तीय सेवा विभागामार्फत 1 एप्रिल ते 30 जून 2023 या कालावधी देशभरातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतस्तरावर जन सुरक्षा योजनेसाठी जनसंपर्क मोहिम राबविली जात आहे. पात्र नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती व प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजनेत सहभागी करुन घेत विमा सुरक्षा प्रदान करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात...

Post
ठाणे जिल्ह्यातील 6 हजार 435 धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला 10 कोटींचा बोनस

ठाणे जिल्ह्यातील 6 हजार 435 धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला 10 कोटींचा बोनस

ठाणे, 6 एप्रिल (हिं.स.) ई पीक अँपवर पीक पेऱ्याची नोंद केलेल्या जिल्ह्यातील 6 हजार 435 धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 कोटी 29 लाख 6 हजार 195 रुपये एवढा बोनस जमा करण्यात आला असून उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच बोनसची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून राज्य...

Post
शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री

मुंबई, 3 एप्रिल (हिं.स.) : शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील यादृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज नाबार्डतर्फे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्य पतपुरवठा चर्चासत्रात (स्टेट क्रेडिट सेमिनार) ते बोलत...

Post
समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात – मुख्यमंत्री

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात – मुख्यमंत्री

मुंबई, 3 एप्रिल (हिं.स.) : रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असून ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची 12 वी बैठक झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सार्वजनिक आरोग्य मंत्री...

Post
पत्राचाळ प्रकरणी ईडीची मुंबईसह गोव्यात कारवाई

पत्राचाळ प्रकरणी ईडीची मुंबईसह गोव्यात कारवाई

मुंबई, 03 एप्रिल (हिं.स.) : खासदार संजय राऊत आरोपी असलेल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालायाने (ईडी) आज, सोमवारी मुंबई आणि गोव्यात कारवाई केली. ईडीने राकेश कुमार आणि सारंग कुमार वाधवन यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर असलेली 31.50 कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. ही मालमत्ता मुंबई आणि गोवा येथील आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार,...

Post
तुम्ही म्हणालं तेच खरं ही मस्ती संपविण्यासाठी मविआची वज्रमूठ - उद्धव ठाकरे

तुम्ही म्हणालं तेच खरं ही मस्ती संपविण्यासाठी मविआची वज्रमूठ – उद्धव ठाकरे

छत्रपती संभाजीनगर, २ एप्रिल (हिं.स.) : सावरकर गौरव यात्रा जरुर काढा, आता हिंदू जनाक्रोश मोर्चा शिवसेना भवनाकडे आणला. या देशाचा पंतप्रधान शक्तीमान असूनही तुम्हाला हिंदू जन आक्रोश यात्रा का काढावी लागते. माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला गेला. घटनेची शपथ घेतल्यावर जातीय तेढ निर्माण करतात. मी काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडले असेल तर मुफ्ती मोहम्मद सोबत...

Post
माउंट एव्हरेस्ट मोहीमेसाठी ठाणे - रायगडचे चौघे सज्ज; मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

माउंट एव्हरेस्ट मोहीमेसाठी ठाणे – रायगडचे चौघे सज्ज; मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

ठाणे, 1 एप्रिल (हिं.स.) भारतीय रेल्वे सेवेत काम करणारे आणि ठाण्याचे सुपुत्र असलेले हेमंत जाधव,संदीप मोकाशी आणि बँकेत काम करणारे धनाजी जाधव यांच्यासह रायगड जिल्ह्यातील कर्जत रहिवाशी असलेले संतोष दगडे असा चार जणांच्या समूहाने आज माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी आगेचूक केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या चमूला भारतीय ध्वज देऊन मोहिम यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा...

Post
नगर - रिकाम्या खुर्चीला हार घालून नागरिकांचे अनोखे आंदोलन

नगर – रिकाम्या खुर्चीला हार घालून नागरिकांचे अनोखे आंदोलन

अहमदनगर, 30 मार्च (हिं.स.):- महापौरांच्या प्रभागातील वारुळाचा मारुती मंदिर परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असताना संतप्त नागरिकांनी खड्डेमय रस्त्यात रिकाम्या खुर्चीला हार घालून लोकप्रतिनिधी व प्रशास नाचा निषेध नोंदवला .खड्डेमय रस्ते,धुळीचा फुफाटा व पाणी टंचाईच्या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. युवा सेनेचे शहर प्रमुख महेश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या...

Post
ठाणे जिल्हा कोषागार अधिकारी राजेश भोईर यांची सहसंचालक पदी पदोन्नती

ठाणे जिल्हा कोषागार अधिकारी राजेश भोईर यांची सहसंचालक पदी पदोन्नती

ठाणे, 30 मार्च (हिं.स.) ठाणे जिल्ह्याचे जिल्हा कोषागार अधिकारी (उपसंचालक संवर्ग) राजेश भोईर यांची वित्त व लेखा सेवेच्या सहसंचालक पदावर पदोन्नती झाली असून मंत्रालयातील ग्रामविकास विभागाच्या उपसचिव व सहसंचालक पदावर नियुक्ती झाली आहे. पदोन्नतीबद्दल श्री. भोईर यांचे जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. हिंदुस्थान समाचार