Home Bhartiya Janta Party

Political parties: Bhartiya Janta Party

Post
राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण

नवी दिल्ली, 05 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज, बुधवारी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये दुसऱ्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्यात 2023 वर्षासाठी 3 पद्मविभूषण, 5 पद्मभूषण आणि 47 पद्मश्री पुरस्कार प्रदान केले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड , पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री आणि मान्यवर...

Post
स्टँड-अप इंडिया योजनेंतर्गत 7 वर्षांत 1,80,630 हून अधिक खात्यांना 40,700 कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर

स्टँड-अप इंडिया योजनेंतर्गत 7 वर्षांत 1,80,630 हून अधिक खात्यांना 40,700 कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर

अनुसूचित जाती-जमाती, महिला वर्ग यांच्यामधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी स्टँड-अप इंडिया योजना अत्यंत महत्त्वाचा टप्पा – निर्मला सीतारामन नवी दिल्ली, 5 एप्रिल (हिं.स.) : स्टँड अप इंडिया योजनेचा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत, योजनेच्या प्रारंभापासून 21 मार्चपर्यंत देशभरातील 180,636 खात्यांना 40,710 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेची वैशिष्ठ्ये...

Post
राहुल गांधींनी एक दिवस कोठडीत राहुन दाखवावे- फडणवीस

राहुल गांधींनी एक दिवस कोठडीत राहुन दाखवावे- फडणवीस

नागपूर, 04 एप्रिल (हिं.स.) : अंदमानात सावरकर राहिले त्या कोठडीत एसी लावून देतो, राहुल गांधींनी फक्त एक दिवस त्या कोठडीत राहून दाखवावे असे थेट आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. स्थानिक शंकर नगर चौकात सावरकरांच्या पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टीचे...

Post
केंद्र सरकारने मागवला प. बंगाल दंगलीचा अहवाल

केंद्र सरकारने मागवला प. बंगाल दंगलीचा अहवाल

नवी दिल्ली, 04 एप्रिल (हिं.स.) : पंश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान झालेल्या हिंसाचाराची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी 4 एप्रिल रोजी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना 3 दिवसात दंगलीचा अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगालच्या भाजप अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून बंगालमध्ये हिंदूंना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याची...

Post
वनारक्षित जमिनीबाबत तक्रारी सोडवण्यासाठी 'एकल खिडकी योजना' आणणार - मुनगंटीवार

वनारक्षित जमिनीबाबत तक्रारी सोडवण्यासाठी ‘एकल खिडकी योजना’ आणणार – मुनगंटीवार

मुंबई, 3 एप्रिल (हिं.स.) : खाजगी वनांबाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच वन आरक्षित जमिन याबाबतच्या तक्रारी सोडवण्यासाठी आणि यामध्ये सुलभता आणण्यासाठी ‘एकल खिडकी योजना’ वन विभागामार्फत आणण्यात येईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. विधानसभेत दिलेल्या आश्वासनानुसार, खाजगी वनांबाबत येणाऱ्या अडचणी व त्याबाबत कायद्यात करावी लागणारी सुधारणा याबाबतची आढावा बैठक आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या...

Post
भ्रष्टाचार हा न्याय आणि लोकशाहीच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा - पंतप्रधान

भ्रष्टाचार हा न्याय आणि लोकशाहीच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा – पंतप्रधान

नवी दिल्ली, 3 एप्रिल (हिं.स.) : बहुआयामी आणि बहु-शाखीय तपास संस्था म्हणून केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) आपली ओळख निर्माण केली आणि त्याच्या कक्षा आणखी विस्तारत आहेत. देशाला भ्रष्टाचारमुक्त करणे ही सीबीआयची प्रमुख जबाबदारी आहे. भ्रष्टाचार हा काही सामान्य गुन्हा नाही, तो गरीबांचे हक्क हिरावून घेतो, त्यातून इतर अनेक गुन्हे जन्माला येतात, भ्रष्टाचार हा न्याय आणि...

Post
शिक्षणाची उपलब्धता वाढवणे, सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यात इग्नूसारख्या संस्थांची भूमिका महत्वाची - राष्ट्रपती

शिक्षणाची उपलब्धता वाढवणे, सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यात इग्नूसारख्या संस्थांची भूमिका महत्वाची – राष्ट्रपती

नवी दिल्ली, 3 एप्रिल (हिं.स.) : शिक्षणाची उपलब्धता वाढवण्यात, सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यात इग्नू सारख्या संस्थांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. नवी दिल्लीत इग्नू म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा 36 वा दीक्षांत समारंभ झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. दुर्गम भागातील, ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या मागास भागातील विद्यार्थ्यांना या संस्थांमुळे शिक्षणाची...

Post
परराष्ट्र व्यापार धोरण 2023 जाहीर

परराष्ट्र व्यापार धोरण 2023 जाहीर

नवी दिल्ली, 31 मार्च (हिं.स.) : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज परराष्ट्र व्यापार धोरण 2023 जारी केले. हे धोरण गतिशील आहे आणि काळाच्या ओघात उद्भवणाऱ्या नवनवीन गरजा पूर्ण करण्यासाठी ते खुले आहे असे ते म्हणाले. या धोरणावर दीर्घ काळ चर्चा सुरू होती आणि...

Post
संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स, वंदे भारत एक्सप्रेसला दाखवणार हिरवा झेंडा

संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स, वंदे भारत एक्सप्रेसला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली, 31 मार्च (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 एप्रिल रोजी भोपाळला भेट देत आहेत. सकाळी सुमारे 10 वाजता, पंतप्रधान भोपाळमधील कुशाभाऊ ठाकरे सभागृहात संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स-2023 ला उपस्थित राहतील. त्यानंतर, दुपारी 3:15 वाजता, पंतप्रधान भोपाळ आणि नवी दिल्ली दरम्यान राणी कमलापती रेल्वे स्टेशन,भोपाळ येथून सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवतील....

Post
देशातील सर्व 65,000 सक्रिय प्राथमिक कृषी पतसंस्थांचे संगणकीकरण सुरू - अमित शाह

देशातील सर्व 65,000 सक्रिय प्राथमिक कृषी पतसंस्थांचे संगणकीकरण सुरू – अमित शाह

हरिद्वार, 31 मार्च (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “सहकार से समृद्धी” या दृष्टिकोनातून देशात स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केली. सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील सर्व 65,000 सक्रिय प्राथमिक कृषी पतसंस्थांचे संगणकीकरण सुरू झाले आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार आणि गृह मंत्री अमित शाह यांनी दिली. 307 जिल्हा सहकारी बँकांसह अनेक सुविधाही संगणकीकृत करण्यात आल्याचे त्यांनी...