Home Bhartiya Janta Party

Political parties: Bhartiya Janta Party

Post
लोकप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संसदीय आयुधांचा प्रभावी वापर आवश्यक - राहुल नार्वेकर

लोकप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संसदीय आयुधांचा प्रभावी वापर आवश्यक – राहुल नार्वेकर

मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.) : “विधिमंडळ सभागृहाच्या कामकाजाची यशस्विता ही लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागातून निष्पन्न होत असते. या पार्श्वभूमीवर, लोकप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लोकप्रतिनिधींनी संसदीय आयुधांचा प्रभावीरित्या वापर करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर यांनी येथे केले. विधानभवन येथे आयोजित वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्यातर्फे विधानपरिषद सदस्यांसाठीच्या कृतिसत्र कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल...

Post
चंद्रपूर : पाणी पुरवठ्यासाठी भाजपचे आयुक्तांना निवेदन

चंद्रपूर : पाणी पुरवठ्यासाठी भाजपचे आयुक्तांना निवेदन

चंद्रपूर 26 एप्रिल (हिं.स.) : चंद्रपूर शहरामध्ये पाणी पुरवठा सुव्यवस्थीत करणेबाबत अनेक तक्रारी महानगर भाजपाला प्राप्त झाल्या नंतर याची दखल भाजपाने घेतली असून या संदर्भातील निवेदन भाजपा तर्फे जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना देण्यात आले.विषयाचे गांभीर्य लक्षात घेत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांनी दिल्याने अनेकांचा जीव सुखावला आहे....

Post
योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

लखनऊ, 25 एप्रिल (हिं.स.) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात लखनऊ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार करण्याची धमकी आली होती. त्यापाठोपाठ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये आपात्कालीन विभागाकडून 112...

Post
उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते निरंजन डावखरेंचा `कर्तव्यपथ' अहवाल प्रकाशित

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते निरंजन डावखरेंचा `कर्तव्यपथ’ अहवाल प्रकाशित

ठाणे, 24 एप्रिल (हिं.स.) : कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेत प्रतिनिधीत्व करताना आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी पाच वर्षात केलेल्या कार्यावरील `कर्तव्यपथ’ अहवालाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अहवालाचे प्रकाशन करून आमदार निरंजन डावखरे यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. कोकण पदवीधर मतदारसंघात तलासरीपासून दोडामार्ग पर्यंतच्या...

Post
'मन की बात'च्या 100 व्या भागाला उत्सवी स्वरूप द्यावे - डॉ. जितेंद्र सिंह

‘मन की बात’च्या 100 व्या भागाला उत्सवी स्वरूप द्यावे – डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्ली, 24 एप्रिल (हिं.स.) : येत्या 30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा 100 वा भाग प्रसारित होणार आहे. हा भाग सर्वांनी ऐकावा. तसेच अनेक लोकांना सामुदायिकरित्या हा कार्यक्रम ऐकता येईल, अशी व्यवस्था करावी. या कार्यक्रमाला उत्सवी स्वरूप देण्यासाठीही प्रयत्न केले जावेत, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केले....

Post
भारतीय रत्ने आणि आभूषणे उद्योगाचे प्रतिकूल जागतिक आर्थिक वातावरणात उत्तम प्रदर्शन - पीयूष गोयल

भारतीय रत्ने आणि आभूषणे उद्योगाचे प्रतिकूल जागतिक आर्थिक वातावरणात उत्तम प्रदर्शन – पीयूष गोयल

मुंबई, 24 एप्रिल (हिं.स.) : भारतीय रत्ने आणि आभूषणे उद्योगाने जगभरात आपली मोहोर उमटवली आहे. प्रतिकूल जागतिक आर्थिक वातावरणात देखील उत्तम प्रदर्शन केले, अशा शब्दात केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी प्रशंसा केली. मुंबईत 49व्या भारतीय रत्ने आणि आभूषणे पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारप्राप्त निर्यातदारांचा सत्कार रविवारी करण्यात आला. रत्ने आणि आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषदेद्वारे (GJEPC) दिल्या...

Post
देशाच्या सक्षम आणि तरुण मनुष्यबळाची योग्यरित्या जोपासना करावी - राजनाथ सिंह

देशाच्या सक्षम आणि तरुण मनुष्यबळाची योग्यरित्या जोपासना करावी – राजनाथ सिंह

नवी दिल्ली, 22 एप्रिल (हिं.स.) : देशाला बळकट आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी देशाच्या सक्षम आणि तरुण मनुष्यबळाची योग्यरित्या जोपासना केली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. आयुर्विज्ञान अकादमीच्या 63 व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात ते आभासी माध्यमातून बोलत होते. लोकसंख्या शास्त्रीय लाभांशाचे फायदे सुनिश्चित करण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि...

Post
सुदानमध्ये 3,000 हून अधिक भारतीयांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष, पंतप्रधानांनी घेतला आढावा

सुदानमध्ये 3,000 हून अधिक भारतीयांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष, पंतप्रधानांनी घेतला आढावा

नवी दिल्ली, 22 एप्रिल (हिं.स.) : सुदानमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्चस्तरीय बैठक झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, सुदानमधील भारताचे राजदूत आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीदरम्यान, पंतप्रधानांनी सुदानमधील सद्य घडामोडींचा आढावा घेतला आणि तिथे असलेल्या 3,000 हून अधिक भारतीय नागरिकांच्या...

Post
राष्ट्रपतींनी दिल्या ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा

राष्ट्रपतींनी दिल्या ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 22 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद-उल-फित्रच्या देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “ईद-उल-फित्रच्या शुभ मुहूर्तावर, मी भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व नागरिकांना , विशेषत: आपल्या मुस्लिम बंधू- भगिनींना हार्दिक शुभेच्छा देते. रमजानच्या पवित्र महिना समाप्तीला साजरा केला जाणारा ईद हा सण प्रेम, करुणा आणि स्नेह भावनांचा...

Post
येणाऱ्या पिढ्या आणि देशाच्या भविष्यासाठी व्यसनमुक्त भारत अतिशय महत्वाचा - अमित शाह

येणाऱ्या पिढ्या आणि देशाच्या भविष्यासाठी व्यसनमुक्त भारत अतिशय महत्वाचा – अमित शाह

नवी दिल्ली, 20 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनात 2047 मध्ये आपण व्यसनमुक्त भारत निर्माण करू. येणाऱ्या पिढ्या आणि देशाच्या भविष्यासाठी व्यसनमुक्त भारत अतिशय महत्वाचे आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. आज आपण व्यसनाविरुद्धच्या युद्धात अशा ठिकाणी आहोत की इथून दृढसंकल्प, सामूहिक प्रयत्न, एकसंघता आणि संपूर्ण सरकार हा दृष्टीकोन घेऊन पुढे गेलो तर...