Home एकनाथ शिंदे

Political Leader: एकनाथ शिंदे

Post
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी निकालाची शक्यता

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी निकालाची शक्यता

नवी दिल्ली, 10 मे (हिं.स.) : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणी उद्या, गुरुवारी 11 मे रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात विचाराधिन आहे. याप्रकरणी गुरुवारी सकाळच्या सत्रात निकाल लागू शकतो असे संकेत खुद्द सरन्यायमूर्तींनी दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाह कायद्याप्रकरणी सुनावणी सुरू होती. यावेळी सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी उद्या होणाऱ्या...

Post
तथागतांचा मार्ग चिरकाल अनुसरणीय - मुख्यमंत्री

तथागतांचा मार्ग चिरकाल अनुसरणीय – मुख्यमंत्री

मुंबई, 5 मे (हिं.स.) : ‘तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा मानव, प्राणिमात्रांच्या कल्याण आणि शांतीचा मार्ग त्रिकालाबाधित आणि चिरकाल अनुसरणीय राहील अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी तथागत बुद्धांच्या चरणी अभिवादन अर्पण केले आहेत. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विश्वशांतीचा, सर्व प्राणिमात्राच्या कल्याणाचा...

Post
आता एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवात

आता एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवात

मुंबई, 1 मे (हिं.स.) : एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठीशी असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-शिवनेरी बसचे लोकार्पण, हिंदूह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या...

Post
२०२४ च्या निवडणुका शिंदे-फडणवीस यांच्याच नेतृत्वात - बावनकुळे

२०२४ च्या निवडणुका शिंदे-फडणवीस यांच्याच नेतृत्वात – बावनकुळे

नागपूर, २७ एप्रिल (हिं.स.) : २०२४ च्या विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच होतील, असे ठाम मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे. यामुळे मुख्यमंत्री कोण व्हावे हे पक्षाने ठरवायचे असते. याशिवाय बहुमत सुद्धा महत्वाचे असते. बावनकुळे यांनी यावेळी...

Post
दिघ्यातील धरणाच्या हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दिघ्यातील धरणाच्या हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे, 22 एप्रिल, (हिं.स.) कळवा आणि ऐरोली शहराच्या मध्यस्थानी असणाऱ्या दिघा येथील रेल्वेच्या धरणाकडे कोणाचे लक्ष गेलेले नाही. ब्रिटिशांनी दिघा येथे बांधलेले धरण पूर्ण क्षमतेने भरले असले तरी या पाण्याचा वापरच केला जात नाही. हे रेल्वेचे धरण महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी या आधी करण्यात आली होती, परंतु अद्याप त्यावर ठोस निर्णय झालेला नसल्याने अनेकांनी नाराजी...

Post
मुख्यमंत्र्यांकडून 'अक्षय तृतीया', 'रमजान ईद'च्या शुभेच्छा !

मुख्यमंत्र्यांकडून ‘अक्षय तृतीया’, ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा !

मुंबई, 22 एप्रिल (हिं.स.) : साडेतीन मुहूर्तांपैकी एक ‘अक्षय तृतीया’ अणि पवित्र अशा रमजान अर्थात ‘ईद-उल-फित्र’ या सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या दोन्ही सणांच्या पुर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, आपल्या हिंदू संस्कृतीत अक्षय तृतीया हा दानधर्माचे महत्व सांगणारा सण आहे. या दिवशी शुभारंभ होणाऱ्या गोष्टी अक्षय्य, अखंडपणे...

Post
ठाण्यात 13 एप्रिल रोजी एकदिवसीय राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन

ठाण्यात 13 एप्रिल रोजी एकदिवसीय राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन

ठाणे, १२ एप्रिल, (हिं.स) : महाराष्ट्रातील सर्व मत निर्माते आणि शिक्षणतज्ञांना एकत्र आणण्यासाठी (ठाणे, मुंबई आणि एमएमआर वर लक्ष केंद्रीत करून) एनईपी च्या युगात शैक्षणिक जगताच्या बदलत्या परिस्थितीवर चर्चा व विचारमंथन करण्यासाठी IScholar Knowledge Services Pvt. Ltd. मुंबई यांच्यासंयुक्त विद्यमाने हिरानंदानी मेडोज्, ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृह येथे गुरुवार दि. 13 एप्रिल, 2023 रोजी...

Post
सावरकर जयंती स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करणार – मुख्यमंत्री

सावरकर जयंती स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करणार – मुख्यमंत्री

मुंबई, 11 एप्रिल (हिं.स.) : स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम स्वातंत्र्यवीर गौरव दिनी आयोजित करण्यात येणार आहेत....

Post
मुख्यमंत्र्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

मुख्यमंत्र्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

मुंबई, 11 एप्रिल (हिं.स.) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी पुण्यातील वारजे येथून अटक केलीय. सदर आरोपीने दारूच्या नशेत सोमवारी 10 एप्रिल रोजी रात्री पोलिसांना 112 या क्रमांकावर कॉल करून मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी दिली होती. यासंदर्भातील माहितीनुसार पोलिसांना सोमवारी रात्री 112 क्रमांकावरवर फोन आला ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी...

Post
पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

मुंबई, 10 एप्रिल (हिं.स.) : अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबुजी महाराज संस्थानात सभा मंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देखील त्यांनी जाहीर केली आहे. तसेच शासकीय खर्चाने सर्व जखमींवर व्यवस्थित उपचार करण्यात यावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. या दुर्घटनेत सात...