Home एकनाथ शिंदे

Political Leader: एकनाथ शिंदे

Post
शासनाच्या धोरणात्मक निर्णयामुळे साताऱ्यातील मनिष गुरवचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण

शासनाच्या धोरणात्मक निर्णयामुळे साताऱ्यातील मनिष गुरवचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण

सातारा, 15 मे (हिं.स.) : पाटण शहरातील मिलींद गुरव हा गेली तीन ते चार वर्ष पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता. अवघ्या दोन ते तीन मार्कांनी त्याच्या पदरी अपयश पडत होते. पण या अपयशाने न खचता तो पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतच होता. त्याच्या या प्रयत्नांना राज्य शासनाने हात दिला आणि त्याचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले....

Post
राजपूत समाजापुढील 'भामटा' हा शब्द काढणार – मुख्यमंत्री

राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार – मुख्यमंत्री

औरंगाबाद, 15 मे (हिं.स.) : सर्वसामान्य, शेतकरी-कष्टकऱ्यांचे हे सरकार असून त्यांच्या कल्याणाचे विविध निर्णय घेऊन जनतेला न्याय देण्याचे काम हे सरकार करीत आहे. राजपूत समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, राजपूत समाजाच्या पुढील ‘भामटा’ हा शब्द काढण्यात येईल आणि केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान, महाराणा प्रतापसिंह...

Post
मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव - मुख्यमंत्री

मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव – मुख्यमंत्री

मुंबई, १४ मे (हिं.स.) : मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे) ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ही घोषणा केली. या महोत्सवाला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आरोग्य मंत्री प्रा. डॅा.तानाजी...

Post
मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासा साठी राज्य सरकार कटिबद्ध

मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासा साठी राज्य सरकार कटिबद्ध

मुंबई, 14 मे (हिं.स.) – मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या परिषदेत दिली. तसेच हे सर्वसामान्य माणसाचे सरकार आहे. सामान्य मुंबईकरांना हक्काचे घर मिळवून देणे हेच आमचे लक्ष असून ते केल्याशिवाय शांत बसणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. भाजप विधान परिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष...

Post
लांज्यातील राजू कुरूप यांच्यासह कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत दाखल

लांज्यातील राजू कुरूप यांच्यासह कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत दाखल

रत्नागिरी, 14 मे, (हिं. स.) : लांज्यातील राजू कुरूप यांच्या नेतृत्वाखाली लांज्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. लांजा शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य खरेदी विक्री संघाचे सदस्य गणेश लाखण आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लांज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला....

Post
कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरवण्याची जबाबदारी शिंदेंवर

कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरवण्याची जबाबदारी शिंदेंवर

सेालापूर , 14 मे (हिं.स.) : कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरविण्यासाठी काँग्रेसने ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह तीन जणांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. शिंदे दुपारी सोलापूर विमानतळावरून खास विमानाने बंगळुरूकडे रवाना झाले. कर्नाटकमध्येकाँग्रेसला स्पष्ट बहुमत आल्यानंतर आता तिथे मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा देशभर रंगली आहे. त्यातच, प्रदेशाध्यक्ष डीके. शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांची नावे प्राधान्याने...

Post
'शासन आपल्या दारी' अभियान अधिक व्यापक करणार - मुख्यमंत्री

‘शासन आपल्या दारी’ अभियान अधिक व्यापक करणार – मुख्यमंत्री

सातारा, 13 मे (हिं.स.) – शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (मरळी) येथे करण्यात आला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. दौलतनगर येथील श्रीमती...

Post
संत चोखोबाराय मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार - मुख्यमंत्री

संत चोखोबाराय मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री

बुलडाणा, 13 मे (हिं.स.) : महाराष्ट्र संतांची भूमी आहे. समाजप्रबोधन तसेच लोकांचे जीवन प्रकाशमान करण्याचे काम संत विचारांनी केले आहे. याच विचारांचा वसा घेऊन शासन वाटचाल करीत आहे. इसरूळ येथील श्री संत चोखोबारायांचे मंदिर आणि ही भूमी तीर्थस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. संत...

Post
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

सातारा, 13 मे (हिं.स.) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभुराज देसाई आदी उपस्थित होते. पालकमंत्री देसाई यांनी यावेळी डॉक्टर आणि रुग्णांशी...

Post
संत चोखोबाराय मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री

संत चोखोबाराय मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री

बुलडाणा, 12 मे (हिं.स.) : महाराष्ट्र संतांची भूमी आहे. समाजप्रबोधन करण्याचे काम संत विचारांनी केले आहे. याच विचारांचा वसा घेऊन शासन वाटचाल करीत आहे. इसरूळ येथील श्री संत चोखोबारायांचे मंदिर आणि ही भूमी तीर्थस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. संत चोखोबारायांची जन्मभूमी असलेल्या मेहुणा...