Home राजकारण

Category: राजकारण

Post
आगामी 5 वर्षात इलेक्ट्रिक बसेस सुरू करणार- नितीन गडकरी

आगामी 5 वर्षात इलेक्ट्रिक बसेस सुरू करणार- नितीन गडकरी

नागपूर, 04 जून (हिं.स.) : आगामी 5 वर्षात देशभरात सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रिक बसेसनी व्हावी असा प्रयत्न असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नागपुरात दिली. मोदी सरकारच्या 9 वर्षातील कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. मोदींच्या नेतृत्वातील 9 वर्षे भारताच्या विकासाचे सुवर्ण युग आहे असेही गडकरींनी सांगितले. याप्रसंगी गडकरी म्हणाले...

Post
सुलोचना दीदी यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी - विनोद तावडे

सुलोचना दीदी यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी – विनोद तावडे

मुंबई, 4 जून (हिं.स.) सुलोचना दीदी म्हणजे सांस्कृतिक महाराष्ट्राचा सालस चेहरा. त्यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी साकारलेल्या सोज्वळ भूमिका सर्वांनाच आपल्या घरातील थोरामोठ्यांच्या मायेची आठवण करून देतात. त्यांच्या दर्जेदार अभिनयासाठी त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’, ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज त्यांच्या निधनाने आपल्या कुटुंबातीलच एक ज्येष्ठ आणि मायाळू व्यक्ती हरपल्याची भावना...

Post
भाजपाचे माजी आमदार रामचंद्र अवसरे यांचा निधन

भाजपाचे माजी आमदार रामचंद्र अवसरे यांचा निधन

भंडारा ०३ जुन (हिं. स.) : भंडारा विधानसभा क्षेत्राचे भाजपचे माजी आमदार ऍड. रामचंद्र अवसरे यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी शनिवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंड असा परिवार आहे. उद्या दुपारी तीन वाजता पवनी येथील वज्रेश्वर घाटावर त्यांचा अंतिम संस्कार करण्यात येणार आहे....

Post
माझं राजकारण केवळ लोकांसाठी - पंकजा मुंडे

माझं राजकारण केवळ लोकांसाठी – पंकजा मुंडे

परळी वैजनाथ, ३ जून (हिं.स.) : माझं राजकारण केवळ आणि केवळ लोकांसाठी आहे. त्यामुळं कायम लोकांच्या हिताची भूमिका घ्यायची ही लोकनेते मुंडे साहेबांची शिकवण आहे. मी सत्य, स्वाभिमान आणि वंचितांच्या सेवेचा वसा शेवटपर्यंत सोडणार नाही, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सांगितले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त आज गोपीनाथ गडावर ह.भ.प. रामायणाचार्य ढोक...

Post
रेल्वे अपघातातील दोषींना कठोर शिक्षा मिळेल- पंतप्रधान

रेल्वे अपघातातील दोषींना कठोर शिक्षा मिळेल- पंतप्रधान

बालासोर, 03 जून (हिं.स.) : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 निरपराध नागरिकांचा बळी गेलाय. या गंभीर घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. यात दोषी आढळणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असा स्पष्ट निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज, शनिवारी बालासोरला जाऊन तिथली पाहणी करून मदत आणि...

Post
संजय राऊतांविरोधात शिंदे गटाचे 'जोडे मारो' आंदोलन

संजय राऊतांविरोधात शिंदे गटाचे ‘जोडे मारो’ आंदोलन

अमरावती, 3 जून (हिं.स.) :शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शनिवारी राजकमल चौकात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून ‘जोडे मारो’आंदोलन करण्यात आले. राऊत यांचे मानिसक आरोग्य ठिकाणावर नसल्याने ते बेताल वक्तव्य व कृती करत असल्याची टिका करत, राऊत यांचा प्रतिकात्मक फोटो असलेल्या पोस्टरला चपला मारुन त्यांचा जाहिर निषेध नोंदविण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ...

Post
भाजपा महाजनसंपर्क अभियानातंतर्ग ४८ सभा होणार – आ. देवयानी फरांदे

भाजपा महाजनसंपर्क अभियानातंतर्ग ४८ सभा होणार – आ. देवयानी फरांदे

नाशिक, ०३ जून (हिं.स.) : भाजपा महाजनसंपर्क अभियानात राज्यात ४८ सभा होणार नाशिक लोकसभा जनसंपर्क अभियान प्रभारी आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे देशभरात ३१ मे पासून महिनाभर महा जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून या द्वारे ८० कोटी नागरिकांपर्यंत मोदी सरकारची विकास कामे व कल्याणकारी...

Post
लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदार संघ कॉंग्रेसलाच द्या - यशोमती ठाकूर

लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदार संघ कॉंग्रेसलाच द्या – यशोमती ठाकूर

अमरावती, 3 जून (हिं.स.) अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज मुंबई येथे प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवनात काँग्रेस अध्यक्ष प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार, सोशल मिडिया प्रमुख विशाल मुत्तेमवार, देवानंद पवार, पूनम पटेल, ओबीसी सेलचे प्रमुख अरविंद माळी, माजी मंत्री नसीम...

Post
सिंधी समाजाची जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात तक्रार

सिंधी समाजाची जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात तक्रार

नाशिक, ०३ जून (हिं.स.) : उल्हासनगर येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य केले होते. यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यासाठी सिंधी समाजाच्या वतीने नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास वांजळे यांना निवेदन देण्यात आले. गेल्या २७ मे रोजी उल्हासनगर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी...

Post
विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेत वसतिगृहे व इतर सुविधांसाठी संपूर्ण सहकार्य - चंद्रकांत पाटील

विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेत वसतिगृहे व इतर सुविधांसाठी संपूर्ण सहकार्य – चंद्रकांत पाटील

अमरावती, 3 जून (हिं.स.) : राज्यातील मोजक्या शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांत विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचा समावेश आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेनुसार संस्थेत आवश्यक दोन वसतिगृहांसाठी, तसेच इतर आवश्यक सुविधांसाठी निधी मिळवून देण्यात येईल. याबाबत संस्थेच्या अधिका-यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज येथे...