Home राजकारण

Category: राजकारण

Post
स्थानीक पालकमंत्री हवा -नरेंद्र भोंडेकर

स्थानीक पालकमंत्री हवा -नरेंद्र भोंडेकर

भंडारा ०६ जुन (हिं. स.) :- मला मंत्रिपद देत नसाल तर भाजप किंवा शिवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्याला मंत्रिपद द्या. मात्र, बाहेरचा पालकमंत्री दिल्यास त्याला १०० टक्के विरोध असेल, असा इशारा भंडाऱ्यातील शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराचा आता निर्णय घ्यायलाच पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली....

Post
छत्रपती शिवरायांना अभिप्रेत उत्कृष्ट जिल्हा बनवण्यासाठी प्रयत्न करुया - केसरकर

छत्रपती शिवरायांना अभिप्रेत उत्कृष्ट जिल्हा बनवण्यासाठी प्रयत्न करुया – केसरकर

कोल्हापूर, 6 जून (हिं.स.) : कोल्हापूरला छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा उत्कृष्ट जिल्हा बनवण्यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. जिल्हा परिषदेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कागलकर हाऊस येथे शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्याचा कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी पालकमंत्री केसरकर दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलत...

Post
अजित पवार यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊँ माँसाहेब, संभाजीराजेंना वंदन

अजित पवार यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊँ माँसाहेब, संभाजीराजेंना वंदन

मुंबई, ६ जून, (हिं.स) – शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन… राजमाता जिजाऊं माँसाहेबांना वंदन… स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांना वंदन… स्वराज्यस्थापनेत महाराजांना साथ देणाऱ्या तमाम मावळ्यांना वंदन करत सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन कृतज्ञतापूर्वक वंदन...

Post
सर्वात मोठ्या समूह विकास (क्लस्टर) योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सर्वात मोठ्या समूह विकास (क्लस्टर) योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

ठाणे, ६ जून, (हिं. स) : ठाण्यातील समूह पुनर्विकास योजनेचे काम सुरू करणे हे माझे स्वप्न आहे. सुमारे 1500 हेक्टर जमिनीवर वेगवेगळ्या टप्प्यात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे 10 हजार घरांची निर्मिती होणार आहे. हा एक ऐतिहासिक प्रकल्प होणार आहे. ज्या दिवशी या योजनेतील घराची चावी नागरिकांना मिळेल तो दिवस माझ्यासाठी सर्वात...

Post
दाभोळच्या भारती शिपयार्ड कंपनी व्यवस्थापनाशी नीलेश राणे यांची चर्चा

दाभोळच्या भारती शिपयार्ड कंपनी व्यवस्थापनाशी नीलेश राणे यांची चर्चा

रत्नागिरी, 5 जून, (हिं. स.) : नव्या व्यवस्थापनासह पुन्हा सुरू झालेल्या दाभोळ (ता. दापोली) येथील भारती शिपयार्ड कंपनीमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी भाजपा नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी व्यवस्थापनाकडे केली. कामगारांच्या अन्य मागण्यांसाठी व्यवस्थापनासोबत त्यांनी बैठक घेतली. यावेळी दाभोळ येथे कामगार संघटनेची घोषण राणे यांनी केली. दाभोळ येथील भारती शिपयार्ड कंपनी...

Post
महायुती म्हणूनच यापुढील निवडणुका लढविणार – उदय सामंत

महायुती म्हणूनच यापुढील निवडणुका लढविणार – उदय सामंत

रत्नागिरी, 5 जून, (हिं. स.) : राज्यातील यापुढील ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका महायुती म्हणूनच लढविणार आहोत, अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे प्रसारमाध्यमांना दिली. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने रत्नागिरीत आले असता त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

Post
कांदळवन जतन आणि लागवड अतिशय आवश्यक – उदय सामंत

कांदळवन जतन आणि लागवड अतिशय आवश्यक – उदय सामंत

रत्नागिरी, 5 जून, (हिं. स.) : जागतिक तापमान वाढीचा आणि वाढत्या प्रदूषणाचा विचार करता कांदळवनांचे जतन आणि लागवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. आरे (ता. रत्नागिरी) येथे राज्य शासनाचा वन विभाग आणि कांदळवन कक्षाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कांदळवन रोपवन लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते....

Post
सूक्ष्म, लघु ,मध्यम उद्योगांसाठी स्वतंत्र सचिव नेमण्यास राज्य सरकारची मान्यता - नारायण राणे

सूक्ष्म, लघु ,मध्यम उद्योगांसाठी स्वतंत्र सचिव नेमण्यास राज्य सरकारची मान्यता – नारायण राणे

मुंबई, 5 जून (हिं.स.) : राज्यातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी स्वतंत्र सचिव देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. प्रवीण दरेकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ ,...

Post
हवामान संरक्षणासाठी प्रत्येक देशाने निहित स्वार्थापलीकडे जाऊन विचार करावा - पंतप्रधान

हवामान संरक्षणासाठी प्रत्येक देशाने निहित स्वार्थापलीकडे जाऊन विचार करावा – पंतप्रधान

नवी दिल्ली, 5 जून (हिं.स.) : जागतिक पातळीवर हवामान रक्षणासाठी जगातील प्रत्येक देशाने निहित स्वार्थापलीकडे जाऊन विचार केला पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज आयोजित केलेल्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. ते पुढे म्हणाले की, आधी स्वत:च्या देशाचा विकास करण्याबद्दल विचार करायचा आणि त्या नंतर...

Post
ओडिशा रेल्वे अपघातातील मृतकांना काँग्रेसची श्रद्धांजली

ओडिशा रेल्वे अपघातातील मृतकांना काँग्रेसची श्रद्धांजली

अमरावती, 5 जून (हिं.स.) : ओरिसा राज्यातील बालासोर बहनागा बाजार स्टेशन जवळ रेल्वेचा मोठा अपघात झाला, कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीमधे टक्कर झाली असून या अपघातात २७५ प्रवासी मृत्युमुखी पडले तर ११०० पेक्षा जास्त प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत ,ही घटना अतिशय दुःखद व सामान्य माणसांचे मन हेलावणारी असून या रेल्वे अपघातात मोठ्या प्रमाणात जीवित...