Home राजकारण

Category: राजकारण

Post
शेतकऱ्यांनी आरोग्यदायी भरडधान्य पिकाचे उत्पादन घ्यावे - वर्धा जिल्हाधिकारी

शेतकऱ्यांनी आरोग्यदायी भरडधान्य पिकाचे उत्पादन घ्यावे – वर्धा जिल्हाधिकारी

वर्धा, 24 मार्च (हिं.स.) : सध्याच्या काळात आहारातील पोषक तत्वाअभावी आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आहारात बदल करुन आरोग्यदायी भरडधान्याचा वापर करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी धान्य व मिलेट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले. कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने 25 मार्चपर्यंत द रुरल मॉल येथे...

Post
राहुल गांधींची खासदारकी रद्द

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

नवी दिल्ली, 24 मार्च (हिं.स.) : केरळच्या वायनाड येथील काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सूरतच्या सत्र न्यायालयाने गुरुवारी 2 वर्षाची शिक्षा ठोठावली होती. दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी लोकप्रतिनिधींना शिक्षा झाल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होते. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने राहुल यांची खासदारकी आज, शुक्रवारी रद्द केलीय. मानहानीच्या खटल्यात सूरतच्या जिल्हा कोर्टाने राहुल गांधींना 2 वर्षांची...

Post
खा. नवनीत राणांनी दिल्लीतील निवासस्थानी उभारली गुढी

खा. नवनीत राणांनी दिल्लीतील निवासस्थानी उभारली गुढी

अमरावती, 22 मार्च, (हिं.स.) साडे तीन शुभ मुहूर्ता पैकी एक मुहूर्त आणि मराठी नवीन वर्षाचा दिवस असल्याने राज्यात सध्या गुढीपाडव्याचा उत्साह पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी शोभा यात्रा काढत लोक आपला आनंद दाखवत आहेत. असाच उत्साह राज्याबाहेरही पहायला मिळत आहे. चक्क दिल्लीत ही गुढीपाडव्याचा उत्साह दिसत असून खासदारांच्या निवासस्थानी गुढी उभारल्याचे दिसत आहे. अमरावतीच्या खासदार...

Post
कृषी सहायक पदभरतीबाबत पंधरा दिवसात कार्यवाही - अब्दुल सत्तार

कृषी सहायक पदभरतीबाबत पंधरा दिवसात कार्यवाही – अब्दुल सत्तार

मुंबई, 23 मार्च (हिं.स.) कृषी विभागाचा पदांबाबतचा आकृतीबंधाचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. त्याचे काम पूर्ण करुन कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही तत्काळ सुरु करण्यात येईल. या पदभरतीची जाहिरात येत्या 15 दिवसात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. विधानपरिषदेत सदस्य सतिष चव्हाण यांनी कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याबाबत प्रश्न उपस्थित केला...

Post
दहशतवाद्यांचा बीमोड अखेर दहशतवादानेच होतो - डॉ. जितेंद्र सिंह

दहशतवाद्यांचा बीमोड अखेर दहशतवादानेच होतो – डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्ली, 23 मार्च (हिं.स.) : दहशतवाद्यांचा बीमोड अखेर दहशतवादानेच होतो. जम्मू आणि काश्मीरचा असल्यामुळे ते खात्रीने सांगू शकतात की दहशतवादी पळून जात आहेत आणि दहशतवाद अंतिम टप्प्यात आला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले. शहीद-ए-आझम भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी नवी दिल्ली येथे आयोजित...

Post
पंतप्रधान शुक्रवारी वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला करणार संबोधित

पंतप्रधान शुक्रवारी वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला करणार संबोधित

नवी दिल्ली, 23 मार्च (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (24 मार्च) वाराणसीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला संबोधित करतील. पंतप्रधान दुपारी 12 वाजता, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या मैदानावर 1780 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. वन वर्ल्ड टीबी शिखर परिषद...

Post
डोंबिवलीच्या शोभायात्रेत मुख्यमंत्री सहभागी

डोंबिवलीच्या शोभायात्रेत मुख्यमंत्री सहभागी

डोंबिवली,२२ मार्च (हिं.स.) : २५ व्या चैत्र पाडवा नववर्ष शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मनसे आमदार प्रमोद ( राजू) पाटील या त्रिमूर्तीसह सिनेकलाकरांची उपस्थिती डोंबिवलीत लक्षवेधी होती. भाजपा-शिवसेना-मनसे नेत्यांच्या उपस्थितीमुळे आता पुढील राजकीय वाटचाल एकत्रित होणार का अशी विचारणा डोंबिवलीकरांमध्ये होत होती. मात्र यावर्षी श्रीगणेश मंदिर संस्थान...

Post
सांगोल्याचा विकास करणार- शहाजी बापू पाटील

सांगोल्याचा विकास करणार- शहाजी बापू पाटील

सोलापूर 22 मार्च (हिं.स) : मतदार संघातील गाव विकासासाठी मी कधीही पक्षभेद करीत नाही, करणार नाही. तालुक्याच्या विकास निधीसाठी मी नेहमी कटिबद्ध आहे. विकासाच्या बाबतीत सांगोला तालुक्याची वेगळी ओळख निर्माण करणार असल्याची ग्वाही आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली. सांगोला मतदारसंघातील दलित वस्ती विकास कामांसाठी ५ कोटी ५८ लाख रुपये मंजूर झाली असल्याची माहिती देताना...

Post
वनक्षेत्रात वाढ करण्याची जलदूताचीच मंत्र्यांकडे मागणी

वनक्षेत्रात वाढ करण्याची जलदूताचीच मंत्र्यांकडे मागणी

रत्नागिरी, 22 मार्च, (हिं. स.) : जिल्ह्यातील वनक्षेत्रामध्ये वाढ करून संरक्षण करावे, अशी मागणी चिपळूण येथील जलदूत आणि वाशिष्ठी जगबुडी नदी प्रहरी सदस्य शाहनवाज शाह यांनी वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात प्रामुख्याने अत्यल्प वनक्षेत्र आहे. खासगी जंगलातून चाललेल्या अमर्याद वृक्षतोडीमुळे ऑक्सिजन निर्मितीवर परिणाम होत आहे....

Post
दृढ निरोगी पिढी निर्माण करणे ही काळाची गरज - रोहिणी शेंडगे

दृढ निरोगी पिढी निर्माण करणे ही काळाची गरज – रोहिणी शेंडगे

अहमदनगर, 22 मार्च (हिं.स.):- महानगरपालिकेच्या माध्यमातून बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलने महिलांसाठी आरोग्य सुविधा देऊन नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.गेल्या अनेक वर्षापासून देशपांडे हॉस्पिटलने गोर गरीब रुग्णांसाठी आरोग्य सुविधा दिल्या आहे.केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना थेट रुग्णांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाते.जिल्हाभरातून महिला प्रसुतीसाठी मोठ्या संख्येने येत आहे.त्यांच्या आरोग्याची व नवजात बालकाची काळजी घेतली जाते.बाळासाहेब देशपांडे रुग्णालयामधील...