Home राजकारण

Category: राजकारण

Post
शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब - खा. सुप्रिया सुळे

शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब – खा. सुप्रिया सुळे

मुंबई, 31 मार्च (हिं.स.) हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली,त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे...

Post
संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स, वंदे भारत एक्सप्रेसला दाखवणार हिरवा झेंडा

संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स, वंदे भारत एक्सप्रेसला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली, 31 मार्च (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 एप्रिल रोजी भोपाळला भेट देत आहेत. सकाळी सुमारे 10 वाजता, पंतप्रधान भोपाळमधील कुशाभाऊ ठाकरे सभागृहात संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स-2023 ला उपस्थित राहतील. त्यानंतर, दुपारी 3:15 वाजता, पंतप्रधान भोपाळ आणि नवी दिल्ली दरम्यान राणी कमलापती रेल्वे स्टेशन,भोपाळ येथून सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवतील....

Post
मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला सरकारने कात्री लावण्याचे केले पाप - जयंत पाटील

मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला सरकारने कात्री लावण्याचे केले पाप – जयंत पाटील

मुंबई, 31 मार्च (हिं.स.) विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर, आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकार करत असून याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध केला आहे. महाविकास आघाडी सरकारने गेल्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयांच्या...

Post
देशातील सर्व 65,000 सक्रिय प्राथमिक कृषी पतसंस्थांचे संगणकीकरण सुरू - अमित शाह

देशातील सर्व 65,000 सक्रिय प्राथमिक कृषी पतसंस्थांचे संगणकीकरण सुरू – अमित शाह

हरिद्वार, 31 मार्च (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “सहकार से समृद्धी” या दृष्टिकोनातून देशात स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केली. सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील सर्व 65,000 सक्रिय प्राथमिक कृषी पतसंस्थांचे संगणकीकरण सुरू झाले आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार आणि गृह मंत्री अमित शाह यांनी दिली. 307 जिल्हा सहकारी बँकांसह अनेक सुविधाही संगणकीकृत करण्यात आल्याचे त्यांनी...

Post
'आरटीआय' अंतर्गत पंतप्रधानांच्या पदव्यांची माहिती देण्याची गरज नाही

‘आरटीआय’ अंतर्गत पंतप्रधानांच्या पदव्यांची माहिती देण्याची गरज नाही

नवी दिल्ली, 31 मार्च (हिं.स.) : पंतप्रधानांच्या शैक्षणिक पदव्यांबाबत ‘आरटीआय’ अंतर्गत माहिती सादर करण्याची गरज नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल गुजरात उच्च न्यायालयाने आज, शुक्रवारी दिली. तेसेच पंतप्रधानांच्या पदवी प्रमाणपत्राचा तपशील मागणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टाने 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पंतप्रधान कार्यालयाचे माहिती अधिकारी (पीआयओ), गुजरात विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठाच्या पीआयओना मोदींच्या पदवी...

Post
पोप फ्रान्सिस लवकर बरे होण्यासाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

पोप फ्रान्सिस लवकर बरे होण्यासाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 31 मार्च (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांना चांगले आरोग्य आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पोप यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले, “पोप फ्रान्सिस यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.” हिंदुस्थान समाचार

Post
राष्ट्रीय सागरी सप्ताहाच्या प्रारंभाच्या पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

राष्ट्रीय सागरी सप्ताहाच्या प्रारंभाच्या पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 31 मार्च (हिं.स.) : राष्ट्रीय सागरी सप्ताहाचा आरंभ हा सध्या बंदरांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासाला आणि बंदरांचा व्यवस्थित उपयोग करून आर्थिक समृद्धी साधण्यास चालना देणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सप्ताहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री सर्वांनंद सोनोवाल यांच्या ट्विट संदेशाला ते उत्तर देत होते. सुरू झालेल्या राष्ट्रीय सागरी सप्ताह निमित्त पंतप्रधानांना...

Post
पश्चिम बंगाल : रामनवमीच्या मिरवणुकीत हिंसाचार वाहनांची जाळपोळ आणि शोभायात्रेवर हल्ले

पश्चिम बंगाल : रामनवमीच्या मिरवणुकीत हिंसाचार

हावडा, 30 मार्च (हिं.स.) : पश्चिम बंगालच्या हावडा येथे रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक करून वाहनांची जाळपोळ केल्याची दुर्दैवी घटना घडली. रामनवमीची मिरवणूक विशिष्ठ धर्मियांच्या परिसरातून जात असताना हा प्रकार घडला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या हिंसाचारात अनेक लोक जखमी झालेत. हिंसाचार व जाळपोळीच्या घटनेची माहिती मिळताच परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पश्चिम...

Post
त्रिपुरा : विधानसभेत पॉर्न पाहिल्याचा आरोप

त्रिपुरा : विधानसभेत पॉर्न पाहिल्याचा आरोप

आगरतला, 30 मार्चा (हिं.स.) : त्रिपुरा विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात बसून सत्ताधारी आमदार मोबाईलवर पॉर्न पाहत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. कथित अश्लिल व्हिडीओ पाहणारे आमदार जादब लाल नाथ बागबासा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व करीत असून सत्ताधारी भाजपचे सदस्य आहेत. दरम्यान हा व्हिडीको कुणी बनवला आणि व्हायरल केला याबाबत अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्रिपुरा हे राज्य...

Post
नगर - रिकाम्या खुर्चीला हार घालून नागरिकांचे अनोखे आंदोलन

नगर – रिकाम्या खुर्चीला हार घालून नागरिकांचे अनोखे आंदोलन

अहमदनगर, 30 मार्च (हिं.स.):- महापौरांच्या प्रभागातील वारुळाचा मारुती मंदिर परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असताना संतप्त नागरिकांनी खड्डेमय रस्त्यात रिकाम्या खुर्चीला हार घालून लोकप्रतिनिधी व प्रशास नाचा निषेध नोंदवला .खड्डेमय रस्ते,धुळीचा फुफाटा व पाणी टंचाईच्या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. युवा सेनेचे शहर प्रमुख महेश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या...