Home राजकारण

Category: राजकारण

Post
पत्राचाळ प्रकरणी ईडीची मुंबईसह गोव्यात कारवाई

पत्राचाळ प्रकरणी ईडीची मुंबईसह गोव्यात कारवाई

मुंबई, 03 एप्रिल (हिं.स.) : खासदार संजय राऊत आरोपी असलेल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालायाने (ईडी) आज, सोमवारी मुंबई आणि गोव्यात कारवाई केली. ईडीने राकेश कुमार आणि सारंग कुमार वाधवन यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर असलेली 31.50 कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. ही मालमत्ता मुंबई आणि गोवा येथील आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार,...

Post
भ्रष्टाचार हा न्याय आणि लोकशाहीच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा - पंतप्रधान

भ्रष्टाचार हा न्याय आणि लोकशाहीच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा – पंतप्रधान

नवी दिल्ली, 3 एप्रिल (हिं.स.) : बहुआयामी आणि बहु-शाखीय तपास संस्था म्हणून केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) आपली ओळख निर्माण केली आणि त्याच्या कक्षा आणखी विस्तारत आहेत. देशाला भ्रष्टाचारमुक्त करणे ही सीबीआयची प्रमुख जबाबदारी आहे. भ्रष्टाचार हा काही सामान्य गुन्हा नाही, तो गरीबांचे हक्क हिरावून घेतो, त्यातून इतर अनेक गुन्हे जन्माला येतात, भ्रष्टाचार हा न्याय आणि...

Post
शिक्षणाची उपलब्धता वाढवणे, सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यात इग्नूसारख्या संस्थांची भूमिका महत्वाची - राष्ट्रपती

शिक्षणाची उपलब्धता वाढवणे, सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यात इग्नूसारख्या संस्थांची भूमिका महत्वाची – राष्ट्रपती

नवी दिल्ली, 3 एप्रिल (हिं.स.) : शिक्षणाची उपलब्धता वाढवण्यात, सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यात इग्नू सारख्या संस्थांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. नवी दिल्लीत इग्नू म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा 36 वा दीक्षांत समारंभ झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. दुर्गम भागातील, ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या मागास भागातील विद्यार्थ्यांना या संस्थांमुळे शिक्षणाची...

Post
माजी न्यायमूर्ती टी.बी. राधाकृष्णन यांचे निधन

माजी न्यायमूर्ती टी.बी. राधाकृष्णन यांचे निधन

नवी दिल्ली, 03 एप्रिल (हिं.स.) : उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती थोट्टाथिल बी. राधाकृष्णन यांचे आज, सोमवारी केरळच्या कोची येथे निधन झाले. त्यांच्यावर स्थानिक खासगी रुग्णालयात काही दिवसांपासून उपचार सुरू होते. थोट्टाथिल बी. राधाकृष्णन हे कोलकाता, केरळ, तेलंगणा, हैदराबाद आणि छत्तीसगड उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते. तसेच, ते केरळ लीगल सर्व्हिस अथॉरिटीचे...

Post
हसन मुश्रीफ प्रकरणी पुण्यात ईडीची मोठी कारवाई

हसन मुश्रीफ प्रकरणी पुण्यात ईडीची मोठी कारवाई

पुणे, 3 एप्रिल (हिं.स.) : माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अंमलबजावणी संचनालय यांनी पुण्यात मोठी कारवाई सुरू केली आहे. सोमवारी सकाळीच पुण्यात 9 ठिकाणी एकाचवेळी ईडीची मोठी छापेमारी सुरु झाल्याने खळबळ उडाली आहे. हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील व्यवसायिकांच्या घरी ही कारवाई करण्यात येत आहे. व्यवसायिक विवेक गव्हाणे, सी.ए. जयेश दुधेडीया...

Post
राहुल गांधी आज सूरत कोर्टात याचिका दाखल करणार

राहुल गांधी आज सूरत कोर्टात याचिका दाखल करणार

नवी दिल्ली, 03 एप्रिल (हिं.स.) : काँग्रेस नेते राहुल गांधी आज, सोमवारी सूरत न्यायदंडाधिकारी कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला आव्हान देणार आहेत. राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने अवमानना प्रकरणी 2 वर्षांची शिक्षा ठोठावली असून त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आलीय. या निर्णयाला राहुल गांधी सत्र न्यायालयात आव्हान देणार आहेत. त्यासाठी काँग्रेसच्या कायदेशीर सल्लागारांच्या टीमने याचिका तयार केलीय....

Post
तुम्ही म्हणालं तेच खरं ही मस्ती संपविण्यासाठी मविआची वज्रमूठ - उद्धव ठाकरे

तुम्ही म्हणालं तेच खरं ही मस्ती संपविण्यासाठी मविआची वज्रमूठ – उद्धव ठाकरे

छत्रपती संभाजीनगर, २ एप्रिल (हिं.स.) : सावरकर गौरव यात्रा जरुर काढा, आता हिंदू जनाक्रोश मोर्चा शिवसेना भवनाकडे आणला. या देशाचा पंतप्रधान शक्तीमान असूनही तुम्हाला हिंदू जन आक्रोश यात्रा का काढावी लागते. माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला गेला. घटनेची शपथ घेतल्यावर जातीय तेढ निर्माण करतात. मी काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडले असेल तर मुफ्ती मोहम्मद सोबत...

Post
माउंट एव्हरेस्ट मोहीमेसाठी ठाणे - रायगडचे चौघे सज्ज; मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

माउंट एव्हरेस्ट मोहीमेसाठी ठाणे – रायगडचे चौघे सज्ज; मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

ठाणे, 1 एप्रिल (हिं.स.) भारतीय रेल्वे सेवेत काम करणारे आणि ठाण्याचे सुपुत्र असलेले हेमंत जाधव,संदीप मोकाशी आणि बँकेत काम करणारे धनाजी जाधव यांच्यासह रायगड जिल्ह्यातील कर्जत रहिवाशी असलेले संतोष दगडे असा चार जणांच्या समूहाने आज माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी आगेचूक केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या चमूला भारतीय ध्वज देऊन मोहिम यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा...

Post
कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या दरात कपात

कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या दरात कपात

नवी दिल्ली, 01 एप्रिल (हिं.स.) : केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 91.50 रुपयांनी घट केली आहे. तर, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही. घरगुती एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच रक्कम द्यावी लागणार आहे. गेल्या माहिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 350 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आजपासून व्यावसायिक सिलेंडरची किंमत 91.50...

Post
जालना जिल्ह्यातील 116 गावात पाणी उपसा करण्यास प्रतिबंध

जालना जिल्ह्यातील 116 गावात पाणी उपसा करण्यास प्रतिबंध

जालना, 31 मार्च (हिं.स.) महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठी महाराष्ट्र भूजल(विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 मधील प्रकरण-4 चे कलम 25 नूसार प्रस्तावित क्षेत्रातील 116 गावास टंचाई क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच कलम 20 नूसार प्रस्तावित जिल्ह्यातील 116 गावाच्या क्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत घोषित करुन कलम 21 नूसार 500 मीटरच्या आत पिण्याच्या पाण्याशिवाय...