Home राजकारण

Category: राजकारण

Post
२१ व्या शतकात भारत जागतिक आशा-आकांक्षांचे नेतृत्व करणार - धर्मेंद्र प्रधान

२१ व्या शतकात भारत जागतिक आशा-आकांक्षांचे नेतृत्व करणार – धर्मेंद्र प्रधान

भुवनेश्वर, 24 एप्रिल (हिं.स.) : एकविसावे शतक हे ज्ञान-आधारित आणि तंत्रज्ञान प्रणित असेल. आपल्या सांस्कृतिक मूल्यांचे मार्गदर्शन आणि गुणवत्तेचा नैसर्गिक खजिना असलेले, तसेच एक मोठी बाजारपेठ आणि संसाधने या सगळ्या बळावर, एकविसाव्या शतकात भारत जागतिक आशा-आकांक्षांचे नेतृत्व करणार आहे. केवळ पदव्या नाहीत, तर कौशल्य आणि क्षमता, हेच भविष्याचे दिशादर्शक ठरणार आहेत, असा विश्वास केंद्रीय शिक्षण...

Post
भारतीय रत्ने आणि आभूषणे उद्योगाचे प्रतिकूल जागतिक आर्थिक वातावरणात उत्तम प्रदर्शन - पीयूष गोयल

भारतीय रत्ने आणि आभूषणे उद्योगाचे प्रतिकूल जागतिक आर्थिक वातावरणात उत्तम प्रदर्शन – पीयूष गोयल

मुंबई, 24 एप्रिल (हिं.स.) : भारतीय रत्ने आणि आभूषणे उद्योगाने जगभरात आपली मोहोर उमटवली आहे. प्रतिकूल जागतिक आर्थिक वातावरणात देखील उत्तम प्रदर्शन केले, अशा शब्दात केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी प्रशंसा केली. मुंबईत 49व्या भारतीय रत्ने आणि आभूषणे पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारप्राप्त निर्यातदारांचा सत्कार रविवारी करण्यात आला. रत्ने आणि आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषदेद्वारे (GJEPC) दिल्या...

Post
दिघ्यातील धरणाच्या हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दिघ्यातील धरणाच्या हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे, 22 एप्रिल, (हिं.स.) कळवा आणि ऐरोली शहराच्या मध्यस्थानी असणाऱ्या दिघा येथील रेल्वेच्या धरणाकडे कोणाचे लक्ष गेलेले नाही. ब्रिटिशांनी दिघा येथे बांधलेले धरण पूर्ण क्षमतेने भरले असले तरी या पाण्याचा वापरच केला जात नाही. हे रेल्वेचे धरण महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी या आधी करण्यात आली होती, परंतु अद्याप त्यावर ठोस निर्णय झालेला नसल्याने अनेकांनी नाराजी...

Post
देशाच्या सक्षम आणि तरुण मनुष्यबळाची योग्यरित्या जोपासना करावी - राजनाथ सिंह

देशाच्या सक्षम आणि तरुण मनुष्यबळाची योग्यरित्या जोपासना करावी – राजनाथ सिंह

नवी दिल्ली, 22 एप्रिल (हिं.स.) : देशाला बळकट आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी देशाच्या सक्षम आणि तरुण मनुष्यबळाची योग्यरित्या जोपासना केली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. आयुर्विज्ञान अकादमीच्या 63 व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात ते आभासी माध्यमातून बोलत होते. लोकसंख्या शास्त्रीय लाभांशाचे फायदे सुनिश्चित करण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि...

Post
सुदानमध्ये 3,000 हून अधिक भारतीयांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष, पंतप्रधानांनी घेतला आढावा

सुदानमध्ये 3,000 हून अधिक भारतीयांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष, पंतप्रधानांनी घेतला आढावा

नवी दिल्ली, 22 एप्रिल (हिं.स.) : सुदानमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्चस्तरीय बैठक झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, सुदानमधील भारताचे राजदूत आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीदरम्यान, पंतप्रधानांनी सुदानमधील सद्य घडामोडींचा आढावा घेतला आणि तिथे असलेल्या 3,000 हून अधिक भारतीय नागरिकांच्या...

Post
राष्ट्रपतींनी दिल्या ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा

राष्ट्रपतींनी दिल्या ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 22 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद-उल-फित्रच्या देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “ईद-उल-फित्रच्या शुभ मुहूर्तावर, मी भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व नागरिकांना , विशेषत: आपल्या मुस्लिम बंधू- भगिनींना हार्दिक शुभेच्छा देते. रमजानच्या पवित्र महिना समाप्तीला साजरा केला जाणारा ईद हा सण प्रेम, करुणा आणि स्नेह भावनांचा...

Post
मुख्यमंत्र्यांकडून 'अक्षय तृतीया', 'रमजान ईद'च्या शुभेच्छा !

मुख्यमंत्र्यांकडून ‘अक्षय तृतीया’, ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा !

मुंबई, 22 एप्रिल (हिं.स.) : साडेतीन मुहूर्तांपैकी एक ‘अक्षय तृतीया’ अणि पवित्र अशा रमजान अर्थात ‘ईद-उल-फित्र’ या सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या दोन्ही सणांच्या पुर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, आपल्या हिंदू संस्कृतीत अक्षय तृतीया हा दानधर्माचे महत्व सांगणारा सण आहे. या दिवशी शुभारंभ होणाऱ्या गोष्टी अक्षय्य, अखंडपणे...

Post
येणाऱ्या पिढ्या आणि देशाच्या भविष्यासाठी व्यसनमुक्त भारत अतिशय महत्वाचा - अमित शाह

येणाऱ्या पिढ्या आणि देशाच्या भविष्यासाठी व्यसनमुक्त भारत अतिशय महत्वाचा – अमित शाह

नवी दिल्ली, 20 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनात 2047 मध्ये आपण व्यसनमुक्त भारत निर्माण करू. येणाऱ्या पिढ्या आणि देशाच्या भविष्यासाठी व्यसनमुक्त भारत अतिशय महत्वाचे आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. आज आपण व्यसनाविरुद्धच्या युद्धात अशा ठिकाणी आहोत की इथून दृढसंकल्प, सामूहिक प्रयत्न, एकसंघता आणि संपूर्ण सरकार हा दृष्टीकोन घेऊन पुढे गेलो तर...

Post
सर्व आव्हानांना तोंड देत जगाला अन्नधान्य पुरवणे आपली जबाबदारी - नरेंद्र सिंह तोमर

सर्व आव्हानांना तोंड देत जगाला अन्नधान्य पुरवणे आपली जबाबदारी – नरेंद्र सिंह तोमर

नवी दिल्ली, 20 एप्रिल (हिं.स.) : भारतासाठी कृषी क्षेत्र खूप महत्वाचे आहे. बदलत्या परिस्थितीत याचे महत्त्व वाढले आहे. पूर्वी शेतीद्वारे आपल्या गरजा पूर्ण करणे एवढेच आपले ध्येय होते, मात्र सध्या भारताकडून जगाच्या अपेक्षाही वाढत आहेत. अशा परिस्थितीत शेती, हवामान बदल आदी सर्व आव्हानांना तोंड देत जगाला अन्नधान्य पुरवणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय...

Post
देशातील 100 व्या कृषीविषयक प्रमुख शास्त्रज्ञांच्या जी-20 बैठकीची वाराणसीत यशस्वी सांगता

देशातील 100 व्या कृषीविषयक प्रमुख शास्त्रज्ञांच्या जी-20 बैठकीची वाराणसीत यशस्वी सांगता

वाराणसी, 20 एप्रिल (हिं.स.) : जी-20 सदस्य देशांच्या मुख्य कृषी शास्त्रज्ञांची ‘निरोगी लोक आणि सुदृढ पृथ्वीसाठी शाश्वत कृषी आणि अन्नव्यवस्था’ या विषयावरील बैठकीची बुधवारी वाराणसी इथे यशस्वी सांगता झाली. केंद्रीय नागरी हवामान आणि रस्ते वाहतूक तसेच महामार्ग राज्यमंत्री जनरल डॉ. वी. के. सिंह यांच्या हस्ते सोमवारी (17 एप्रिल) या बैठकीचे उद्घाटन झाले होते. जी-20 सदस्य...