Home राजकारण

Category: राजकारण

Post

ठाणे जिल्हाधिका-यांच्या हस्ते महाराष्ट्र दिन वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण

ठाणे, 1 मे (हिं.स.) – महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य ध्वजारोहण जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते साकेत येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात करण्यात झाले. यावेळी उपस्थित मान्यवर, नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य...

Post

वाशिम : डॉ आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा – गोपाळराव आटोटे

वाशिम, 1 मे (हिं.स.) : देशात स्वातंत्र्य,समता, बंधुता आणि न्यायाचे राज्य निर्माण झाले पाहिजे. जाती-जाती आणि धर्माधर्मातील भेद नाहीसा झाला पाहिजे.फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा देश निर्माण होत नाही तोपर्यंत सामाजिक न्याय पर्व संपले असे म्हणता येणार नाही. नवभारताच्या निर्माणासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण झाला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी...

Post

गेल्या वर्षीच्या तुलनेत जीएसटीत 12 टक्के वाढ

नवी दिल्ली, 01 मे (हिं.स.) : देशात गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या वस्तू व सेवा कराच्या संकलनात (जीएसटी) यावर्षी 12 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल 2022 मध्ये जीएसटी संकलन 1,67,540 कोटी रुपये होते. तर यावर्षी एप्रिल महिन्यात 19,495 कोटी रुपये अधिक जीएसटी जमा झाला आहे. जीएसटी संकलनाचा डेटा जारी करताना, अर्थ मंत्रालयाने सांगितले...

Post

शकुंतला सत्याग्रहींचे महाराष्ट्र दिनाच्या निमित्याने अनोखे आंदोलन

अमरावती, ०१ मे (हिं.स.) :शंकुतला रेल्वे पुन्हा सुरू व्हावी याकरिता शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समितीकडून वेगवेगळ्या टप्प्यावरील आंदोलने सुरू आहेत. याचाच एक भाग व १९ व्या टप्प्याचे आंदोलन म्हणून आज १ मे महाराष्ट्र दिनी याच रेल्वेमार्गावरून अचलपूर ते नौबाग रेल्वे स्टेशन पर्यंत समितीकडून पायदळ तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. हे अंतर पाच किलोमीटरचे होते तर...

Post

देशामध्ये राज्यातील बांधकाम विभाग आग्रस्थानी – रविंद्र चव्हाण

पालघर, 1 मे (हिं.स.) : देशातील विविध राज्यातील बांधकाम विभागापेक्षा महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग कामामध्ये आग्रस्थानी असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हान यांनी सांगितले. बांधकाम भवन या नुतन इमारतीच्या तसेच रेल्वे फाटक क्र. 47 अ कोळगांव येथिल उड्डणपुलाचे लोकार्पण पालकमंत्री रविंद्र...

Post

जिल्ह्यामध्ये 75 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देणार – रविंद्र चव्हाण

पालघर, 1 मे (हिं.स.) : जिल्ह्यामध्ये दिनांक 15 एप्रिल, ते 15 जून,2023 या कालावधीत जत्रा शासकीय योजनांची – सर्व सामान्यांच्या विकासाची हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जन कल्याण कक्षामार्फत करण्यात येणार असून, या उपक्रमाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर उपक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये...

Post

पर्यटन जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याला ओळख मिळवून देणार – शंभूराज देसाई

सातारा, 1 मे (हिं.स.) – सातारा जिल्ह्यात पर्यटनाच्या वाढीला मोठा वाव असून पर्यटन जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रम सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी,...

Post

संसदीय कार्य मंत्रालयाने साजरा केला स्वच्छता पंधरवडा

नवी दिल्ली, 1 मे (हिं.स.) : संसदीय कार्य मंत्रालयाने 16 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा केला. स्वच्छ आणि निरोगी भारत बनवण्याचे महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधानांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मिशन, जो सरकारचा एक महत्त्वाचा प्रमुख उपक्रम आहे, त्या अंतर्गत, संसदीय कामकाज मंत्रालयाने वर्ष 2023 च्या एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात...

Post

सातारा : राष्ट्रीय लोक अदालतीत 3,615 प्रकरणे निकाली

सातारा, 1 मे (हिं.स.) : जिल्ह्यात ३० एप्रिल रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 3 हजार 615 प्रकरणे निकाली निघाल्याची माहिती प्राधिकरणाचे सचिव तथा वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश तृप्ती जाधव यांनी दिली.लोक अदालतीस प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे, अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. जिल्हा न्यायाधीश ए. एस. जाधव, एस. आर. सालकुटे, सर्व पॅनेल प्रमुख न्यायिक अधिकारी, सदस्य...

Post
सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया ! – राज्यपाल

सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया ! – राज्यपाल

मुंबई, 1 मे (हिं.स.) : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात केले. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित समारंभात राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,...