Home राजकारण

Category: राजकारण

Post
शहरी व्यवहार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाचा स्मार्ट प्रकल्पासाठी जायकासोबत संयुक्त करार

शहरी व्यवहार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाचा स्मार्ट प्रकल्पासाठी जायकासोबत संयुक्त करार

नवी दिल्ली, 8 मे (हिं.स.) : गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाने संयुक्तपणे जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी -जायका (JICA) सोबत ‘मुंबई-अहमदाबाद शीघ्रगती रेल्वेसह स्थानक क्षेत्र विकास’ (प्रोजेक्ट-SMART) साठी सामंजस्य करार केला आहे. स्मार्ट या प्रकल्पांतर्गत मुंबई – अहमदाबाद शीघ्रगती रेल्वेस्थानकांच्या ( MAHSR) आसपासचा परिसर विकसित करण्यासाठी प्रवाशांची आणि इतर भागधारकांची सुलभता आणि सुविधा...

Post
हवाई दलाच्या वारसा केन्द्राचे संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

हवाई दलाच्या वारसा केन्द्राचे संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

चंदीगड, 8 मे (हिं.स.) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज चंदीगडमध्ये भारतीय हवाई दलाच्या (IAF) वारसा केंद्राचे उद्घाटन केले. भारतीय हवाई दलाच्या समृद्ध इतिहासाचे आणि वारशाचे मूर्त स्वरूप असलेल्या या केंद्रामध्ये विविध कलाकृती, भित्तीचित्रे आणि 3D प्रतिकृतींचा संग्रह आहे.भारतीय हवाई दलाच्या स्थापनेपासून यात कशी उत्क्रांती होत केली याचं दर्शन घडवले आहे.तसेच शौर्यगाथा आणि विमान/उपकरणे...

Post
सहाव्या भारत-कॅनडा व्यापार, गुंतवणूक मंत्रीस्तरीय संवादात भाग घेण्यासाठी पियुष गोयल कॅनडा भेटीवर

सहाव्या भारत-कॅनडा व्यापार, गुंतवणूक मंत्रीस्तरीय संवादात भाग घेण्यासाठी पियुष गोयल कॅनडा भेटीवर

नवी दिल्ली, 8 मे (हिं.स.) : सहाव्या भारत कॅनडा व्यापार आणि गुंतवणूक विषयक चर्चेत केंद्रीय व्यापार आणि वाणिज्य तसेच ग्राहक व्यवहार, खाद्यपदार्थ आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार, निर्यात प्रोत्साहन, लघुउद्योग आणि आर्थिक विकास मंत्री मेरी एनजी यांच्यासोबत सहभागी होणार आहेत. ही चर्चा आज कॅनडाची राजधानी ओटावा इथं होणार आहे. व्यापार...

Post
बजरंग दलावर बंदीची मागणी करणार्या काँग्रेस विरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा - विनोद बंसल, विहिंप

बजरंग दलावर बंदीची मागणी करणार्या काँग्रेस विरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा – विनोद बंसल, विहिंप

नवी दिल्ली, 8 मे (हिं.स.) : ‘बजरंग दला’ची ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) शी तुलना करून बजरंग दलावर बंदीची मागणी कर्नाटक काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्यात केली आहे. बजरंग दलाची बदनामी केली म्हणून बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषदेच्या चंदीगड प्रभागाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कायदेशीर नोटिस पाठवून काँग्रेस पक्षाच्या विरोधात 100 कोटी 10...

Post
खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ देऊ नका - मुनगंटीवार

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ देऊ नका – मुनगंटीवार

चंद्रपूर 8 मे (हिं.स.) : सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र म्हणून ही कृषी क्षेत्राचा नावलौकिक आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात उद्योग आणि सेवा क्षेत्र वाढले असले तरी कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नाही. खरीप हंगामाला आता सुरुवात होत आहे. अतिशय महत्त्वाचे असलेल्या या हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार...

Post
पटसंख्येच्या नावावर शासनाने पाच हजार शाळा समायोजन करू नये - डॉ. श्रीपाद जोशी

पटसंख्येच्या नावावर शासनाने पाच हजार शाळा समायोजन करू नये – डॉ. श्रीपाद जोशी

चंद्रपूर ८ मे (हिं.स.) – पटसंख्येच्या नावावर शासनाने पाच हजार शाळा समायोजन करून बंद करू नयेत, अशी मागणी चळवळीचे प्रमुख संयोजक डॉ. श्रीपाद जोशी यांनी केली आहे. वीस पटसंख्येच्या कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन, पर्यायाने कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार असल्याचे जे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. ती शासनाने नेमलेल्या कोणत्या...

Post
नाशिकमधील माजी नगरसेवक सुदाम कोंबडे यांचा मनसेत प्रवेश

नाशिकमधील माजी नगरसेवक सुदाम कोंबडे यांचा मनसेत प्रवेश

नाशिक, 5 मे (हिं.स.) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच नेते अमित ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन माजी नगरसेवक सुदाम कोंबडे, संदिप जगझाप, भूषण शिरसाठ, कुणाल देवरे आदिनी मोठ्या संख्येने शिवतीर्थ येथे पक्षामध्ये प्रवेश केला आहे . त्यांचे स्वागत ठाकरे पिता पुत्रांनी केले. हिंदुस्थान समाचार

Post
चंद्रपूर : महिला लोकशाही दिन 15 मे रोजी

चंद्रपूर : महिला लोकशाही दिन 15 मे रोजी

चंद्रपूर 5 एप्रिल (हिं.स.):- येत्या 15 मे रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन तर चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मे महिन्याचा लोकशाही दिन 15 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आला आहे. या...

Post
कोरोना काळात आंदोलन, नार्वेकर-लोढांविरुद्ध १७ मे पासून चालणार खटला

कोरोना काळात आंदोलन, नार्वेकर-लोढांविरुद्ध १७ मे पासून चालणार खटला

मुंबई, ५ मे (हिं.स.) : २०२० मध्ये कोरोना काळातील टाळेबंदी दरम्यान वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी नार्वेकर, लोढा यांच्यासह अन्य आरोपींविरोधात गुरुवारी आरोप निश्चित करण्यात आले. दरम्यान सर्व आरोपींनी सर्व आरोप अमान्य केले. त्यामुळे आता १७ मे...

Post
तथागतांचा मार्ग चिरकाल अनुसरणीय - मुख्यमंत्री

तथागतांचा मार्ग चिरकाल अनुसरणीय – मुख्यमंत्री

मुंबई, 5 मे (हिं.स.) : ‘तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा मानव, प्राणिमात्रांच्या कल्याण आणि शांतीचा मार्ग त्रिकालाबाधित आणि चिरकाल अनुसरणीय राहील अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी तथागत बुद्धांच्या चरणी अभिवादन अर्पण केले आहेत. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विश्वशांतीचा, सर्व प्राणिमात्राच्या कल्याणाचा...