Home राजकारण

Category: राजकारण

Post
सहकारातून क्रांती घडविण्याची वरुडची क्षमता – खा. डॉ. अनिल बोंडे

सहकारातून क्रांती घडविण्याची वरुडची क्षमता – खा. डॉ. अनिल बोंडे

अमरावती, 14 मे (हिं.स.): संत्रा प्रक्रिया केंद्र, गुरांचा बाजार, कापसाचे होणारे उत्पादन, शेतकरी गटांच्या माध्यमातून समृद्धीसाठी सुरू असलेले प्रयत्न, पाणी वापर संस्थांनी घेतलेली भरारी यासह शेतकऱ्याला मजबुती देण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या वरुड तालुक्यामध्ये सहकारातून क्रांती घडवण्याची क्षमता असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी येथे केले. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणूकीमध्ये खासदार डॉ.अनिल बोंडे...

Post
संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल

संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल

नाशिक, १४ मे (हिं.स.): सरकारच्या विरोधात चिथावणीखोर बोलणे तसेच पोलिसांची प्रतिमा समाजामध्ये खराब करणे या कारणामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यमान राज्य सरकार बेकायदेशीर असून आगामी तीन महिन्यात हे सरकार कोसळणार आहे. त्यामुळे पोलिसांसह इतर अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर सरकारच्या आदेशाचे पालन करु...

Post
पुढील वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करणार - चंद्रकांत पाटील

पुढील वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करणार – चंद्रकांत पाटील

पुणे, 14 मे (हिं.स.) : पुढील वर्षी राज्य शासनाच्यावतीने किल्ले पुरंदर येथे धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येईल आणि किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. किल्ले पुरंदर येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शासकीय सोहळ्यात...

Post
पुण्यात महिलांसाठी द केरल स्टोरी चित्रपट मोफत; चंद्रकांत पाटलांचा विशेष उपक्रम

पुण्यात महिलांसाठी द केरल स्टोरी चित्रपट मोफत; चंद्रकांत पाटलांचा विशेष उपक्रम

पुणे , 14 मे (हिं.स.) सध्या बहुचर्चित द केरल स्टोरी चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचा बनला असून, समाजातील ज्वलंत विषय अधिकाधिक माहिला आणि तरुणींनी हा विषय समजून घ्यावा, यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष उपक्रम घेतला आहे. कोथरुडमधील दहा हजार पेक्षा जास्त महिला आणि तरुणींना ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखविण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, आजपर्यंत...

Post
कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरवण्याची जबाबदारी शिंदेंवर

कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरवण्याची जबाबदारी शिंदेंवर

सेालापूर , 14 मे (हिं.स.) : कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरविण्यासाठी काँग्रेसने ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह तीन जणांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. शिंदे दुपारी सोलापूर विमानतळावरून खास विमानाने बंगळुरूकडे रवाना झाले. कर्नाटकमध्येकाँग्रेसला स्पष्ट बहुमत आल्यानंतर आता तिथे मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा देशभर रंगली आहे. त्यातच, प्रदेशाध्यक्ष डीके. शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांची नावे प्राधान्याने...

Post
आ.धंगेकरांचा सत्कार, मात्र चर्चा राष्ट्रवादी-शेकाप फायद्याची आणि काँग्रेसच्या गटबाजीची

आ.धंगेकरांचा सत्कार, मात्र चर्चा राष्ट्रवादी-शेकाप फायद्याची आणि काँग्रेसच्या गटबाजीची

सोलापूर , 14 मे (हिं.स.) सांगोला येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याहस्ते नूतन आमदार रवींद्र धंगेकर यांचा सत्काराचा कार्यक्रम लोणारी समाजातर्फे संपन्न झाला. कार्यक्रमाचे निमित्त जरी सत्काराचे असले तरी चर्चा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप पक्षाच्या फायद्या – तोट्याची व काँग्रेसच्या गटबाजीची सुरू झाली आहे. सांगोला येथे लोणारी समाजातर्फे कसबा पेठेतून...

Post
11 उत्तरप्रदेशात 17 महापौर, 99 नगराध्यक्ष भाजपचे

11 उत्तरप्रदेशात 17 महापौर, 99 नगराध्यक्ष भाजपचे

लखनऊ, 13 मे (हिं.स.) : उत्तर प्रदेशातील 17 महापालिकांमधील महापौर पदाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या आहेत, तर नगरपालिकांच्या निवडणुकीत 199 पैकी 99 नगराध्यक्ष पदे देखील पटकावली आहेत. तर समाजवादी पक्षाचे 37, बहुजन समाज पक्षाचे 20 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. दरम्यान काँग्रेसला फक्त 4 नगराध्यक्षपदांवर समाधान मानावे लागले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीबरोबरच उत्तर प्रदेशात...

Post
संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी डीआयएटीच्या दीक्षांत सोहळा

संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी डीआयएटीच्या दीक्षांत सोहळा

पुणे 13 मे (हिं.स) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या खडकवासला येथील संरक्षण तंत्रज्ञानावरील शिक्षण देणाऱ्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा (डीआयएटी) १२ वा दीक्षांत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डीआयएटीचे कुलगुरू डॉ. सी. पी. रामनारायणन यांनी पत्रकार परिषदेत दिली.डीआयएटीचा दीक्षांत सोहळा...

Post
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरास भेट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरास भेट

पुणे 13 मे (हिं.स) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध यांच्यावतीने शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. करिअर घडविण्यासाठी कौशल्य महत्वाचे असून विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाकडे वळावे असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, कौशल्य...

Post
'शासन आपल्या दारी' अभियान अधिक व्यापक करणार - मुख्यमंत्री

‘शासन आपल्या दारी’ अभियान अधिक व्यापक करणार – मुख्यमंत्री

सातारा, 13 मे (हिं.स.) – शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (मरळी) येथे करण्यात आला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. दौलतनगर येथील श्रीमती...