Home राजकारण

Category: राजकारण

Post
केंद्रीय क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते 3 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांना प्रशस्तीपत्र, ट्रॉफी प्रदान

केंद्रीय क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते 3 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांना प्रशस्तीपत्र, ट्रॉफी प्रदान

नवी दिल्ली, 18 मे (हिं.स.) : राष्ट्रपतींच्या हस्ते यापूर्वी पुरस्कार स्वीकारू न शकलेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांना आज केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी त्यांच्या निवासस्थानी प्रशस्तीपत्रासह पुरस्कार प्रदान केला. आज एका छोटेखानी कार्यक्रमात भारतीय नेमबाज अंजुम मौदगील (अर्जुन पुरस्कार), हॉकी प्रशिक्षक सरपाल सिंग (द्रोणाचार्य पुरस्कार) आणि दिवंगत टेनिस प्रशिक्षक नरेश...

Post
नाल्यांचे अधिकाधिक खोलीकरण करून पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्या - मुख्यमंत्री

नाल्यांचे अधिकाधिक खोलीकरण करून पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्या – मुख्यमंत्री

मुंबई, 18 मे (हिं.स.) : मुंबईतील सुमारे २२०० कीमी लांबीच्या नाल्यांची सफाई व्यवस्थित आणि खोलपर्यंत केल्यास यंदा पावसाळ्यात पाणी साचण्यापासून मुंबईकरांना होणारा त्रास वाचेल. त्यामुळे किती मेट्रीक गाळ काढला यापेक्षा मुंबईत पाणी कुठे तुंबणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा प्रत्यक्ष जागेवर जात आढावा मुख्यमंत्री...

Post
काँग्रेस नेते हुसेन दलवाई त्र्यंबकेश्वर मंदिरात

काँग्रेस नेते हुसेन दलवाई त्र्यंबकेश्वर मंदिरात

नाशिक, १८ मे (हिं.स.) : त्रंबकेश्वर येथे झालेल्या प्रकारानंतर नेत्यांच्या भेटी या सुरूच असून गुरुवारी काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन राज्य सरकारला काही प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान या वादामध्ये आता साधु महंतांनी देखील उडी घेतली असून महंत अनिकेत शास्त्री यांनी मशिदीत हनुमान चालीसी म्हणायला परवानगी द्या अशी मागणी केली आहे....

Post
केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी केला सागर परिक्रमेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ

केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी केला सागर परिक्रमेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ

मुंबई, 18 मे (हिं.स.) : केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडियापासून सागर परिक्रमेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ झाला. रुपाला यांनी महाराष्ट्रातील रायगड येथील करंजा जेट्टी येथे हितधारकांना संबोधित केले. येत्या दोन दिवसात ते महाराष्ट्र आणि गोवा येथे सहा ठिकाणी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. करंजा जेट्टी येथील कार्यक्रमात केंद्रीय...

Post
सिद्धरामय्या 'सीएम' शिवकुमार 'डीसीएम'

सिद्धरामय्या ‘सीएम’ शिवकुमार ‘डीसीएम’

नवी दिल्ली, 18 मे (हिं.स.) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील. तर, डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार आहे. नवीन सरकारचा उद्या, शनिवारी 20 मे रोजी बेंगळुरू येथे शपथविधी होणार आहे. सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची गुरुवारी संध्याकाळी बैठक बोलावण्यात आली आहे. यानंतर काँग्रेस नेते राज्यपालांची भेट घेऊन...

Post
राज्यातील मुलींची बेपत्ता होण्याची वाढती संख्या चिंताजनक – अंबादास दानवे

राज्यातील मुलींची बेपत्ता होण्याची वाढती संख्या चिंताजनक – अंबादास दानवे

मुंबई, 18 मे (हिं.स.) – महाराष्ट्र राज्य हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारधारेवर चालणारे राज्य असून मागील कित्येक वर्षांच्या राज्य सरकारच्या कारभारातून सिध्द झाले आहे. राज्यातील मुलींची बेपत्ता होण्याची वाढती संख्या ही चिंताजनक बाब असल्याचे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची टीका करत सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात रोज...

Post
भाजपाकडे नेता, नीती, नियती तिन्ही गोष्टी आहेत - जे पी नड्डा

भाजपाकडे नेता, नीती, नियती तिन्ही गोष्टी आहेत – जे पी नड्डा

मुंबई, 18 मे (हिं.स.) : सध्या सर्वच पक्ष परिवारवादी आहेत. ज्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे नियत नाही. ज्यांच्याकडे नियत आहे, त्यांच्याकडे ताकद नाही, अशी देशभरातील राजकीय पक्षांची स्थिती आहे. मात्र भाजप हा एकमेव पक्ष असा आहे. आपल्याकडे नेता आहे, नीती आहे आणि नियती आहे. बाकी सर्व पक्ष परिवार वादासाठी काम करत आहेत, तर भाजपा विकासवादासाठी काम...

Post
गौतमी पाटील हिला जिल्हा बंदी करा – राष्ट्रवादी

गौतमी पाटील हिला जिल्हा बंदी करा – राष्ट्रवादी

नाशिक , 17 मे (हिं.स.) : नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील उपस्थित मद्यपी तरुणांनी मारहाण केली. या घटनेत पत्रकार गंभीर जखमी झाले आहे. गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात हे अनुचित प्रकार घडत असल्याने तिच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करून तिला नाशिक जिल्हा बंदी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या...

Post
पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्या – मुख्यमंत्री

पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्या – मुख्यमंत्री

ठाणे, 17 मे (हिं.स.) अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नेहमीपेक्षा उशिरा मोसमी पावसाचे आगमन होणार असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा थेंबन थेंब वाचविणे आणि तो जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार 2.0, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. तसेच या योजनांमधील कामांना...

Post
मंदिरात घुसखोरीचा प्रयत्न झाल्यास सडेतोड उत्तर देऊ – मिलींद परांडे

मंदिरात घुसखोरीचा प्रयत्न झाल्यास सडेतोड उत्तर देऊ – मिलींद परांडे

नागपूर, 17 मे (हिं.स.) : हिंदूंचे श्रद्धास्थान आणि 12 ज्योतीर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात शनिवारी रात्री मुस्लिम तरुणांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे ते अपयशी ठरले. मागील वर्षीही असाच असफल प्रयत्न झाला होता. यापुढे हिंदुंच्या मंदिरात कोणी अशी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यास हिंदु समाजाकडून सडेतोड उत्तर दिले जाईल असा इशारा विहिंपचे...