Home राजकारण

Category: राजकारण

Post
तुर्किये अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल रस्सेप एर्दोआन यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

तुर्किये अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल रस्सेप एर्दोआन यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

नवी दिल्ली, 29 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्सेप तय्यिप एर्दोआन यांची तुर्कियेचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले; “तुर्कियेचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल @RTErdogan यांचे अभिनंदन! आगामी काळात जागतिक मुद्यांवर आपले द्विपक्षीय संबंध आणि सहकार्य वृद्धिंगत होत राहील असा मला विश्वास आहे.” हिंदुस्थान समाचार

Post
खा. बाळू धानोरकर यांची प्रकृती स्थिर

खा. बाळू धानोरकर यांची प्रकृती स्थिर

चंद्रपूर 29 मे (हिं.स.):खासदार बाळू धानोरकर यांच्यावर दिल्ली येथे उपचार केले जात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असे धानोरकर यांचे जनसंपर्क कार्यालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील ”वेदांता हॉस्पिटल” येथे उपचार सुरू आहेत. ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत....

Post
वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार - मुख्यमंत्री

वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री

मुंबई, 28 मे (हिं.स.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. स्वातंत्र्यवीर...

Post
मणिपूरमध्ये आतापर्यंत 40 अतिरेकी ठार- मुख्यमंत्री

मणिपूरमध्ये आतापर्यंत 40 अतिरेकी ठार- मुख्यमंत्री

इम्फाल, 28 मे (हिं.स.) : मणिपूरमध्ये आज, रविवारी पुन्हा राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विद्रोही गट आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक झाली. सुत्रांच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी इम्फाल घाटी आणि आसपासच्या परिसरात 5 ठिकाणी एकसोबतच हल्ला केला. आतापर्यंत राज्यामध्ये 40 अतिरेक्यांना ठार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी दिली. मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी सुरक्षा यंत्रणा आणि मणिपूर...

Post
सावरकर जयंतीनिमित्त जातिभेदाला तिलांजली देण्याचा संकल्प करा - राज्यपाल

सावरकर जयंतीनिमित्त जातिभेदाला तिलांजली देण्याचा संकल्प करा – राज्यपाल

मुंबई, 28 मे (हिं.स.) : स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर समाजसुधारक होते. सावरकरांनी जातिभेदाला तीव्र विरोध केला. अस्पृश्यता हा देशावरील कलंक आहे असे ते म्हणत, असे सांगून स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त जातिवादाला तिलांजली देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त सावरकरांच्या जीवनकार्यावर आधारित प्रदर्शनाचे उदघाटन राज्यपाल...

Post
संसद भवन लोकार्पण : अमृत काळात प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्कृष्टता गाठण्याच्या भारताच्या प्रवासाची सुरुवात - अमित शहा

संसद भवन लोकार्पण : अमृत काळात प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्कृष्टता गाठण्याच्या भारताच्या प्रवासाची सुरुवात – अमित शहा

नवी दिल्ली, 28 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसद भवनाच्या नव्या वास्तूचे उद्घाटनानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सर्व देशवासियांचे अभिनंदन केले आहे. यानिमित्ताने शहा यांनी काही ट्विट संदेश केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाच्या नव्या वास्तूचे राष्ट्राला लोकार्पण केले आहे असे अमित शहा यांनी आपल्या ट्विट...

Post
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते निळवंडे धरणातून 31 मे रोजी पाणी सोडणार - विखे पाटील

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते निळवंडे धरणातून 31 मे रोजी पाणी सोडणार – विखे पाटील

अहमदनगर, 28 मे (हिं.स.):- उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्या तून पाणी सोडण्याची चाचणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३१ मे रोजी घेण्यात येणार आहे. पाच तालुक्याचे लाभक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. अकोले...

Post
राजकीय गटातटाच्या वादात विकासकामे अडकली

राजकीय गटातटाच्या वादात विकासकामे अडकली

डोंबिवली, २८ मे, (हिं.स) : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर यांच्या निधीतून तलावाच्या विकास कामच भूमिपूजन झालं होतं. खासदार निधी, आमदार निधी, महापालिकेचा निधी, नगरसेवक निधी असा सुमारे करोडो रुपयांचा निधी या विकासकामासाठी खर्ची होणार होता. पण या कामाच्यामध्ये राजकिय हेवेदावे आले आणि हे काम अडकून पडलं आहे. दशक्रिया विधीसाठी दुसरी जागा नाही....

Post
'योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे' चरित्रग्रंथाचा ३० मे रोजी होणार प्रकाशन सोहळा

‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ चरित्रग्रंथाचा ३० मे रोजी होणार प्रकाशन सोहळा

ठाणे, 28 मे (हिं.स.) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी, ३० मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ लेखक...

Post
स्वातंत्र्यवीर सावरकर हे सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त - मुख्यमंत्री

स्वातंत्र्यवीर सावरकर हे सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त – मुख्यमंत्री

नवी दिल्ली, 28 मे (हिं.स.) स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले. महाराष्ट्र सदनाच्या दर्शनी भागात आज विनायक दामोदर सावरकर यांची 140 वी जयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून नम्र अभिवादन केले....