पुणे, 31 मे, (हिं.स) पुणे जिल्ह्यातील २ हजार ९६० शेतकऱ्यांना अद्याप त्यांच्या कृषिपंपासाठी विजेची जोडणी मिळू शकलेली नाही. यामध्ये चालू वर्षातील मागणी असून त्यात आणखी १४ हजार ७२० शेतकऱ्यांच्या मागणीची भर पडणार आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात (२०२३-२४) १७ हजार ६८० शेतकऱ्यांना वीज जोडणीसाठी किमान आणखी वर्षभर प्रतिक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, प्रलंबित वीज जोडण्या देण्यासाठी महावितरण कंपनीने कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार ३१ मार्च २०२४पर्यंत सर्व प्रलंबित जोडण्या पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
महावितरण कंपनीच्यावतीने जिल्ह्यातील खरीप हंगाम आढावा बैठकीत हा कृती आराखडा सादर करण्यात आला. या आराखड्यात त्यांनी गेल्या वर्षभरातील कृषी पंपासाठीच्या वीज जोडण्यांची एकूण मागणी, त्यापैकी अनामत रक्कम भरून झालेले प्रस्ताव, अनामत रक्कम भरलेल्यांपैकी प्रत्यक्षात देण्यात आलेल्या वीज जोडण्या, प्रलंबित वीज जोडण्या, चालू वर्षातील संभाव्य मागणी आणि या सर्व शेतकऱ्यांना वीज जोडण्या देण्यासाठीचे संभाव्य नियोजन आदींची माहिती देण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply