ठाणे, 30 मार्च (हिं.स.) ठाणे जिल्ह्याचे जिल्हा कोषागार अधिकारी (उपसंचालक संवर्ग) राजेश भोईर यांची वित्त व लेखा सेवेच्या सहसंचालक पदावर पदोन्नती झाली असून मंत्रालयातील ग्रामविकास विभागाच्या उपसचिव व सहसंचालक पदावर नियुक्ती झाली आहे. पदोन्नतीबद्दल श्री. भोईर यांचे जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply