अहमदनगर, 30 मार्च (हिं.स.):- आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षाचे शिक्षा ठोठावल्यामुळे त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी जिल्हाधिकारी कार्याल यासमोर उपोषण केले.
आमदारकी रद्द होईपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने ८ मार्च २०२३ रोजी दोन वर्षाची शिक्षा सुना वली आहे.तरीदेखील विधिमंडळ सचिवांनी त्यांची आमदारकी रद्द केलेली नसल्याचे भिंगारदिवे यांनी निवेदनात म्हंटले आहे.दोन वर्षाचे शिक्षा ठोठावल्यामुळे आमदार बच्चू कडू यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्याच्या मागणी साठी भिंगारदिवे यांनी उपोषण सुरु केले आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply