सोलापूर , 28 मे (हिं.स.) शासन आपल्या दारी ही संकल्पना सर्वसामान्यांच्या हिताची आहे. गटविभाजनाच्या कामात महसूल विभागाने यापूर्वी चांगले सहकार्य केले आहे. तहसीलदार यांनी सर्वसामान्यांना जास्तीत जास्त लाभ घ्यावा. कालव्यात केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना त्वरित घ्या, असे प्रतिपादन आमदार यशवंत माने यांनी केले.
शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या विविध कामासाठी मोहोळ येथे महाशिबिराचे आयोजन केले होते. त्याच्या उद्घाटन प्रसंगी आमदार माने बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार प्रशांत बेडसे, गटविकास अधिकारी आनंद मिरगणे, महिला व बालकल्याण विभागाचे किरण सूर्यवंशी, नूतन तहसीलदार लीना खरात, तालुका कृषी अधिकारी अतुल पवार, नायब तहसीलदार भालचंद्र यादव, जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नेताजी दळवे, यांच्यासह मंडल निरीक्षक, गाव कामगार तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, तसेच तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या सर्व विभागाचे प्रमुख व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply