इम्फाल, 28 मे (हिं.स.) : मणिपूरमध्ये आज, रविवारी पुन्हा राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विद्रोही गट आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक झाली. सुत्रांच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी इम्फाल घाटी आणि आसपासच्या परिसरात 5 ठिकाणी एकसोबतच हल्ला केला. आतापर्यंत राज्यामध्ये 40 अतिरेक्यांना ठार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी दिली.
मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी सुरक्षा यंत्रणा आणि मणिपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती देताना सांगितले की, ज्या दहशतवादी समूहाविरोधात कारवाई करण्यात आली आहे ते लोक अत्याधुनिक शस्त्रांनी हल्ले करत होते. ते नागरिकांवर एम-16 आणि एके-47 असोल्ट रायफल आणि स्नाइपर गनचा वापर करत होते. दहशतवादी समूहाचे लोक अनेक गावांमध्ये घुसून घरं जाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे सेना आणि अन्य सुरक्षा दलांनी फायरिंग सुरु केली. दहशतवादी नि:शस्त्र नागरिकांवर हल्ले करून तोडफोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य सचिवालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, चकमकी दोन समुदायांमध्ये नसून कुकी अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये आहेत. मणिपूरमध्ये हिंसा कमी व्हायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply