नाशिक, 26 मार्च (हिं.स.) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमान करणे हे चुकीचे आहे त्यांच्याविषयी आम्हाला आदरच आहे आणि तो कायम राहील. त्यामुळे राहुल गांधी यांनी सावरकरांचा अवमान करू नये, असा सल्ला देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. देशाची परिस्थिती ही हुकूमशाहीकडे चालली आहे, ती थांबविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करून राज्यातील राजकारणावरून आणि नको त्या उद्योगावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरती जोरदार टीका केली.
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी मालेगाव येथे एम एस महाविद्यालय मैदानावरती सभा झाली या सभेला त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, सुभाष देसाई चंद्रकांत खैरे, खासदार संजय राऊत यांसह अनेक नेते उपस्थित होते. मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे उपनेते अव्दैय हिरे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, यांनी शासकीय विश्रामगृहावर त्यांचे स्वागत केले.
ठाकरे यांनी सांगितले की, मी मुख्यमंत्री असताना कधीही हिंदुत्व सोडले नाही आणि हिंदुत्व सोडेल असे निर्णय सुद्धा घेतले नाही परंतु विनाकारण मला बदनाम करण्याच्या हेतूने आणि हा विकास आघाडी मध्ये असलेल्या घटक पक्षांन बरोबर गेल्यामुळे माझी बदनामी केली गेली परंतु माझे हिंदुत्व आजही कायम आहे आणि भविष्यातही कायम राहील विनाकारण त्याविषयी भाऊ केला गेला असा थेट आरोप कोणाचेही नाव न घेता करून उद्धव ठाकरे म्हणाले की , आज कोणी पण यावे आणि बघावे शिवसेनेची ताकद काय आहे विनाकारण माझ्या वडिलांचे नाव आणि पक्षाचे चिन्ह चोरून काही होणार नाही. कारण निष्ठावंत शिवसैनिक आणि नागरी हे माझ्याबरोबर आहेत त्यांचे समर्थन मला आहे त्यामुळे चोर भामटे असणाऱ्या मिधे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी यातून काय समजायचे ते समजून घ्यावे असा सल्ला देऊन उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या बापाने शिवसेनेची स्थापना केली आणि ती वाढवली त्यावर दुसरा कोणाचाही अधिकार नाही गांडुळासारख्या वागणाऱ्या निवडणूक आयोगाने हे बघावे त्याचं परीक्षण करावं आमच्याकडे रद्दी करण्यासाठी म्हणून आम्ही शपथपत्र घेतले नव्हते आणि घेणारी नव्हतो पण आपला आग्रह होता त्यासाठी म्हणूनच आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते नेत्यांपर्यंत सर्वांची शपथपत्र घेऊन हवे ती कागदपत्र आयोगाला पुरवली परंतु असलेलं आयोग हे शेवटी जाती वरती आले . असे स्पष्ट करून ते म्हणाले की यावर आता आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करावी.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आम्ही राहुल गांधी यांच्याबरोबर देशांमध्ये जी लोकशाही धोक्यात आली आहे. त्यासाठी त्यांच्याबरोबर आहोत परंतु त्यांनी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत आदर त्याबाबतचा तिरस्कार किंवा अवमान सहन करणार नाही. त्यांचा आदर हा आजही आम्ही करत आहोत भविष्याची ही करू परंतु त्यांच्याविषयी अवमान कारक वागणाऱ्या गोष्टींचा आम्ही तिरस्कारच करू असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की ही बाब आम्ही कदापि सहन करत नाही आणि भविष्यातही सहन करणार नाही
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply