नवी दिल्ली, 26 मार्च (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 ते 28 मार्च असे दोन दिवस पश्चिम बंगालला भेट देणार आहेत.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रपती कोलकाता येथील नेताजी भवनला 27 मार्च रोजी भेट देतील. त्यानंतर त्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना आदरांजली वाहण्यासाठी जोरसांको ठाकूरबारी या रवींद्रनाथ टागोरांच्या घराला भेट देतील. त्याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रपती, कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियम या बंदिस्त क्रीडागारात त्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या नागरी सत्काराला उपस्थित राहतील. त्यानंतर 28 मार्च रोजी बेलूर मठाला भेट देतील. यूको बँकेला 80 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने कोलकाता इथे आयोजित समारंभातही त्या सहभागी होणार आहेत. पुढे शांतिनिकेतनला भेट देऊन तिथे आयोजित विश्व-भारतीच्या वार्षिक दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply