Home राजकारण दिल्लीगेट चितळे रोड रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन – किशोर डागवाले

दिल्लीगेट चितळे रोड रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन – किशोर डागवाले

दिल्लीगेट चितळे रोड रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन - किशोर डागवाले

अहमदनगर, 26 मार्च (हिं.स.):- शहक शहरातील चितळे रोड ते दिल्लीगेट या रस्त्यासाठी तात्कालीन खासदार स्व.दिलीप गांधी यांनी विशेष निधी अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी १० कोटींचा निधी आणला.त्या निधीतून हे काम तातडीने होणे अपेक्षित होते.मात्र मनपाच्या ढिसाळ नियोजनामुळे काम सुरु करण्यास विलंब झाला.काम सुरु होऊनही कित्येक महिने लोटले तरी अजूनही ते कामपूर्ण झालेले नाही.उद्घाटनप्रसंगी अनेकांनी या कामाचे श्रेय घेण्याचा खटाटोप केला.परंतु याचे खरे श्रेय भाजपाचेच आहे.या रस्त्यांचे काम जर तातडीने सुरु नाही केले तर यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल,असा इशारा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले यांनी व्यक्त केले.

शहर जिल्हा भाजपाच्यावतीने चितळे रोड ते चौपाटी कारंजा ते दिल्लीगेट रस्त्यांचे काम पूर्ण व्हावे,यासाठी चौपाटी कारंजा येथे धरणे आंदोलन सुरु करण्यात आले.

याप्रसंगी अजय चितळे म्हणाले, चितळे रोड ते दिल्लीगेट या रस्त्यांसाठी स्व.खा.दिलीप गांधी यांनी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला.काम सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला त्यानंतर कामास मुहूर्त लागला.परंतु अजूनही ते पूर्ण झालेले नाही.या भागा तील नगरसेवक,नागरिकांनी हे काम पुर्ण करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत होते.शहराचा मध्यवस्तीतील आणि बाजारपेठ असलेल्या रेंगाळलेल्या कामांमुळे नागरिक,व्यवसायिक यांच्याबरोबरच येणार-जाणार्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या रस्त्यांच्या बीबीएमचे काम होऊन महिन्याचा कालावधी लोटला आहे.परंतु ठेकेदाराने अजून रस्त्यावर कारपेट करुन दिले नाही.अवकाळी पावसामुळे रस्त्यावरील खडी उघडी पडली आहे. या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली नाही तर ठेकेदारास काळे फासू,असा इशारा भाजपाच्यावतीने अजय चितळे यांनी दिला आहे.यावेळी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते व काँग्रेसचे संजय झिंजे यांनीही या आंदोलनास पाठिंबा व्यक्त करत विकास कामांसाठी नागरिकांच्या पाठिशी आम्ही उभे राहू व नगरमधील रस्त्यांच्या रखडलेल्या कामांविषयी नापसंती व्यक्त केली.या आंदोलनास फेरीवाले,हॉकर्स संघटना,नागरिक,व्यापारी यांनीही पाठिंबा दर्शविला.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.