अहमदनगर, 26 मे (हिं.स.):- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना,विकासाचे प्रकल्प यांच्या अंमलबजावणी आणि निगराणीसाठी अहमदनगर जिल्हास्तरावर येथे निर्माण करण्यात आले ल्या पालकमंत्री वॉररुमचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महसूल, पशुसंवर्धन,दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,आमदार प्रा.राम शिंदे,आमदार मोनिका राजळे,आमदार बबनराव पाचपुते,विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर या नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.आधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधा यांनी हा कक्ष सुसज्ज करण्यात आला आहे.अपर जिल्हाधिकारी मापारी यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पालकमंत्री नियंत्रण कक्षाच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply