अहमदनगर, 26 मार्च (हिं.स.):- नगर येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक संजय चव्हाण यांनी लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त नगरमधील तपोवन रोड येथील अनाथ,उपेक्षित वंचित आणि आदि वासी बालकांचा लोक सहभागातून चालविला जाणारा शैक्षणिक निवासी पुनर्वसन प्रकल्प बालघर प्रकल्प मधील बालकांना दैनंदिन अन्नधान्य,जीवनावश्यक वस्तू,वह्या,पेन,चित्रकला साहित्यासह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
अतिशय खडतर आयुष्यातून गोरगरीब उपेक्षित वंचित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव राबणारे आ.निलेश लंके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या आयुष्यातील अनुभव सांगून यश मिळविण्या साठी कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही असे सांगितले.बालघर प्रकल्प हा खऱ्या अर्थाने या उपेक्षित वंचित घटकातील बालकांसाठी निरपेक्ष भावनेने कार्य करत असून येथील बालकांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्याने मी ही खूप समाधानी आहे.आज माझ्या वाढदिवसानिमित्त उद्योजक संजय चव्हाण यांनी राबविलेला हा उपक्रम खूपच कौतुकास्पद असून उपेक्षित वंचित निराधारांची सेवा हीच खरी ईश्वराची भक्ती अाहे.बालघर प्रकल्पाचे संचालक युवराज गुंड हे या बालकांसाठी आपले आयुष्य अर्पण करून सेवाकार्य करत असून या पुढे ही बालघर प्रकल्पातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी लंके प्रतिष्ठान व मित्रपरिवार सदैव प्रयत्नशील राहाणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.यावेळी संजय चव्हाण बोलताना म्हणाले की आज लंकेसाहेब हे खऱ्या अर्थाने आज माणसातील देवमाणूस असून ते निरपेक्ष भावनेने समाजाची सेवा करत आहेत.आज लोकनेते यांचा वाढदिवस साजरा करताना आम्हा सर्वांना खूप आनंद होत आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply