चंद्रपूर 26 एप्रिल (हिं.स.) : चंद्रपूर शहरामध्ये पाणी पुरवठा सुव्यवस्थीत करणेबाबत अनेक तक्रारी महानगर भाजपाला प्राप्त झाल्या नंतर याची दखल भाजपाने घेतली असून या संदर्भातील निवेदन भाजपा तर्फे जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना देण्यात आले.विषयाचे गांभीर्य लक्षात घेत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांनी दिल्याने अनेकांचा जीव सुखावला आहे.
आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेत डॉ.मंगेश गुलवाडे म्हणाले,सद्या उन्हाळ्याचे दिवस असून सर्वत्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या गंभीरबाबीची दखल घेऊन चंद्रपूर शहरामध्ये सर्वत्र पाणी पुरवठा सुव्यवस्थीत करण्यात यावा.बंगाली कॅम्प येथे काही भागात एक ते दिड तास पाणी पुरवठा होतो, तर काही ठिकाणी 24 तास पाणी पुरवठा होत आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले.त्यामुळे याबाबीची दखल घेऊन सर्वाना समान तत्वावर पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने डॉ.गुलवाडे यांनी केली.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply