रत्नागिरी, 25 एप्रिल, (हिं. स.) : बारसू-सोलगाव (ता. राजापूर) येथे सुरू असलेल्या रिफायनरी सर्वेक्षणाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांची भेट रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत बुधवारी (दि. २६ एप्रिल) घेणार आहेत.
राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव येथे प्रस्तावित रिफायनरीला विरोध करणाऱ्या महिला आणि पुरुष रखरखत्या उन्हात उष्णतेचे प्रमाण वाढत असतानाही आंदोलन करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशी सर्वेक्षण रद्द करण्यासाठी पत्रव्यवहार करूनही सर्वेक्षण सुरू आहे. पोलिसांच्या दडपशाहीने ग्रामस्थांचा विरोध चिरडून विनाकारण ग्रामस्थांना अटक करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांची भेट खासदार श्री. राऊत घेणार आहेत. बुधवारी सकाळी ११.३० वाजता ते भेट घेणार असल्याची माहिती श्री. राऊत यांच्या कार्यालयातर्फे प्रसिद्धीली देण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply