Home राजकारण उज्ज्वला योजनेच्या सिलेंडर सबसिडीला मुदतवाढ

उज्ज्वला योजनेच्या सिलेंडर सबसिडीला मुदतवाढ

उज्ज्वला योजनेच्या सिलेंडर सबसिडीला मुदतवाढ

नवी दिल्ली, 25 मार्च (हिं.स.) : केंद्र सरकारने एलपीजी गॅसवर सबसिडी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उज्ज्वला योजनेंतर्गत सरकारने प्रति एलपीजी सिलिंडर 200 रुपये सबसिडी एक वर्षासाठी वाढवली आहे. हे अनुदान 14.2 किलोच्या 12 एलपीजी सिलेंडरवर देण्यात येईल. नव्या आर्थिक वर्षात ही सबसिडी लागू असेल. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी एलपीजी सिलेंडर स्वस्त होणार आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की, सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति एलपीजी सिलिंडर 200 रुपये सबसिडी एका वर्षासाठी वाढवली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 1.6 कोटी कुटुंबांना फायदा मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यामुळे सर्वसामान्यांना महागाईच्या झळीतून काहीसा दिलासा मिळणार आहे. केंद्राच्या उज्जला योजनेअंतर्गत वर्षभरात 12 गॅस सिलिंडर दिले जातात. सरकार्या नवीन अधिसूचनेनुसार, उज्ज्वला योजनेच्या 9.59 कोटी लाभार्थ्यांना प्रति वर्ष 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी मिळणार आहे. या योजनेमध्ये सरकारकडून वर्षभरात 12 सिलिंडर देण्यात येतात. उज्जला योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून प्रत्येक सिलिंडरवर 200 रुपयांच्या अनुदान मिळते म्हणजेच केंद्र सरकारकडून एका वर्षात सबसिडीच्या स्वरूपात लाभार्थ्यांना 2400 रुपयांपर्यंत अनुदान मिळते. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, 1 मार्च 2023 पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे 9.59 कोटी लाभार्थी आहेत.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 2022-23 या आर्थिक वर्षासाठी एकूण 6,100 कोटी रुपये आणि 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 7,680 कोटी रुपये खर्च होणार आहे. हा बोजा केंद्र सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. अनेक कारणांमुळे एलपीजीच्या किंमतीत वाढ झाल्याचे केंद्र सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे. अशा परिस्थितीत उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना यापासून संरक्षण देणे गरजेचे आहे. यासाठीच हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.