ठाणे, 25 एप्रिल (हिं.स.) भारत सध्या जी-२० परिषदेचे यजमान पद भुषवत आहे. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित होत असताना ठाण्यात देखील जी-२० च्या पार्श्वभुमीवर सी -२० च्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
विविधता समावेशीकरण आणि परस्पर सन्मान हे सुत्र डोळयासमोर ठेवुन जी-२० चे उदिष्ट ठरविले पाहिजे. हा संदेश लक्षात घेऊन भारताच्या यजमान पदाच्या काळात विविध ठिकाणी सी -२० चे परिषदेचे आयोजन ठाण्यात केले जात आहे. याचाच एक भाग म्हणुन ठाण्यात दिनांक २७ एप्रिल २०२३ जोशी बेडेकर महाविद्यालयातील, कात्यायन सभागृहात सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत सी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात प्रा. विद्याधर वालावलकर यांचं बीज भाषण असेल.तर समारोप डॉ ललिता नामजोशी करतील. हा कार्यक्रम विवेकानंद केंद्र ठाणे शाखा आणि जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे
विविधता हे मानवसमाजाचे नैसगिक वैशिष्ट आहे. पण शांततापुर्ण सहजीवन आणि आर्थिक सामाजिक विकासासाठी विविध घटकांना एकत्र यावे आणि आर्थिक- सामाजिक विकासासाठी घटकांना बांधताना अनेकदा समावेशी करणाचे जे धोरण अवलंबले जाते त्यात वैवध्यिय नष्ट होण्याचा धोका असतो आणि दुर्बल असंघित घटकांचा आत्मसमान ही पायदळी तुडवला जातो. विभिन्न घटकांचा स्वत:चे म्हणणे मांडण्याचा अधिकार मान्य केला पाहिजे आणि त्यांचे म्हणणे ऐकले जाण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्यांना स्वत: च्या श्रध्देप्रमाणे वागत आले पाहिजे, परंपरांचे पालन करता आले पाहिजे हे दायित्व हया प्रमुख राष्ट्रांचे आहे.
२००५ साली प्रथमच जी-२० च्या सदस्य राष्ट्रांनी विकासाकडे पाहण्याच्या विविधता पुर्ण दृष्टीकोनाची दखल घेतली व नमुद केले की, प्रत्येक देशाने आपल्या स्वभावधर्माशी जुळेल अशी विकासतीती आणि आर्थिक सामाजिक धोरण ठरवण्यास समर्थ झाले पाहिजे. त्यासाठी सी-२० हा समुह जगाला भेडसवण्या-या विविधतेतुन एकात्मते कडे जाण्याच्या प्रवासातील समस्यांचा ऊहापोह करीत आहे व त्या दिशेने होणा-या प्रयत्न विविध सामाजिक संस्थाच्या अनुभवाची नोंद करीत आहे. सर्वांना एकाच मापाचा अंगरखा बसणार नाही हे लक्षात घेऊन सामाजिक संस्था अनेक परिक्षेत्रात करत असलेल्या कार्याचा मागोवा घेणे हा हया सी-२० विभागाने ठरवले आहे. त्या दृष्टीने ही संवाद परिषद विवेकानंद केन्दाची ठाणे शाखा आयोजित करत आहे.
विविधता- समावेशीकरणा आणि परस्परसम्मान या विषयावर काम करणाऱ्या विविध संस्थांना आमंत्रण आहे. यात पर्यावरण, अनाथ मुलं, सिग्नल वर राहणारी मुलं, मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था अशांना आमंत्रित केलं आहे. साधारण २० संस्था असतील. या संस्थांच्या कामाची माहिती मिळेल. संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित असतील.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply