Home राजकारण ‘मन की बात’च्या 100 व्या भागाला उत्सवी स्वरूप द्यावे – डॉ. जितेंद्र सिंह

‘मन की बात’च्या 100 व्या भागाला उत्सवी स्वरूप द्यावे – डॉ. जितेंद्र सिंह

'मन की बात'च्या 100 व्या भागाला उत्सवी स्वरूप द्यावे - डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्ली, 24 एप्रिल (हिं.स.) : येत्या 30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा 100 वा भाग प्रसारित होणार आहे. हा भाग सर्वांनी ऐकावा. तसेच अनेक लोकांना सामुदायिकरित्या हा कार्यक्रम ऐकता येईल, अशी व्यवस्था करावी. या कार्यक्रमाला उत्सवी स्वरूप देण्यासाठीही प्रयत्न केले जावेत, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केले. त्यांच्या उधमपूर लोकसभा मतदारसंघातील (जम्मू आणि काश्मीर) पंचायत राज व्यवस्थांच्या प्रतिनिधींसोबत ऑनलाइन प्रतिसाद सत्रात बोलत होते.

‘मन की बात’ हा सरकारच्या प्रमुखांचा कोणतेही राजकीय स्वरूप नसलेला कार्यक्रम असून, तो देशाच्या विविध भागात होत असलेल्या विकासाला समर्पित तसेच सरकारच्या कल्याणकारी योजना, समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवणारा कार्यक्रम आहे.

तसेच पहिल्यांदाच शासनप्रमुखाने सातत्याने एकाही महिन्यात खंड पडू न देता आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधण्याची ही पहिलीच घटना आहे. हा एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. त्यामुळे ह्या कार्यक्रमाचा उत्सव होणे अगदी संयुक्तिक आहे, असे जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.